शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

शिक्षण , नोकरी , पैसा  हा  क्रम एक तरुण  तोडतो  तेव्हा ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:42 PM

घरची परिस्थिती जेमतेमच होती, त्यामुळे लहानपणापासून डोक्यात एकच होतं, शिकायचं, नोकरी करायची, पैसा कमवायचा. पण मग कळलं की, हेच म्हणजे जगणं नव्हे, आणि मग जगण्याच्या शोधात निघालो.

प्रवीण डोनगावे, निर्माण 7

माझा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका छोटय़ा गावात झालं. नंतर पुण्यात आलो तिथं बारावीर्पयतचं शिक्षण हे एकदम साचेबद्ध पद्धतीने झालं. त्यात काहीही वेगळेपण नव्हतं. नियमित शाळा, अभ्यास, खेळ एवढा मोजकाच दिनक्र म असायचा. वडील आणि आई दोघेपण स्थानिक मार्केटमध्ये भाजी विक्र ी करून कुटुंबाचा सांभाळ करायचे. कधी घरभाडे वेळेत दिले नाही तर मालक वडिलांना बोलायचा, कधी योग्य पैसे भाजीतून मिळाले नाहीत तर वडील-आई नाराज दिसायचे. त्यामुळे जगण्यासाठी (आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी) पैसे खूप महत्त्वाचे असतात हे आधीपासून डोक्यात बसलं होतं. यामुळेच खूप अभ्यास करून चांगली नोकरी शोधणं आणि पैसे कमावणं हे खूप लहान वयात लक्षात आलं होतं. दहावी आणि बारावीला चांगली टक्केवारी मिळाल्यावर जेव्हा कुठे अॅडमिशन घ्यायचं यावर चर्चा सुरू झाली तेव्हा इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला एका शिकलेल्या नातेवाइकाने आई-वडिलांना दिला, जेणोकरून चांगली नोकरी मिळेल. भविष्य सुखात जाईल.

मी स्वत:देखील इंजिनिअरिंग निवडताना ‘नोकरी मिळवण्यासाठीच डिग्री’ यापलीकडे जाऊन कधी विचार केला नव्हता. दरम्यानच्या काळात अवांतर वाचन वाढलं होतं, वेगवेगळ्या गोष्टी बघायला - ऐकायला लागलो होतो. दोन वर्षे इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे करतोय ते काही मनाला पटत नव्हतं. फक्त पैसा कमावणं आणि चैन करण्यात आयुष्य घालवणं हे विचार खटकू लागले होते. आपण स्वत:साठी न जगता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं खूप वाटू लागलं; पण करायचं काय हे कळत नव्हतं.एका मित्रने एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी होऊन लोकांसाठी काम करू शकतो असे सुचवले. मला हा पर्याय खूप आवडला, वाटलं हे किती चांगलं आहे की आपण लोकांसाठी शासन जे धोरणं आखतं, योजना राबवतं त्या यंत्रणोचा भाग बनून समाजासाठी आपलं योगदान देऊ. स्पर्धा परीक्षेची जोरात तयारी लास्ट इअरला असताना सुरू केली. डिग्री झाली; पण नोकरी बघायचं नाही असं ठरवलं होतं, अभ्यास पूर्णवेळ सुरू होताच.एकदा सहज पेपर वाचत असताना ‘लोकमत ऑक्सिजन’मधील निर्माणबद्दलचे लेख वाचण्यात आले, त्यातील विचार वाचून असं वाटलं की आपल्यालापण असंच काहीतरी करायचं आहे. उत्सुकता वाढल्याने निर्माणबद्दल आणखी माहिती काढली, फॉर्म भरला आणि इंटरव्ह्यू देऊन निवडदेखील झाली. सगळचं माङयासाठी नवीन होत, पहिल्यांदा मी वेगळं काहीतरी करतोय हे जाणवत होतं. निर्माणचा फॉर्म भरल्यापासून ते गडचिरोलीला जाण्यार्पयत सगळचं माङयासाठी कन्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासारखे होतं.निर्माण कॅम्पमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा स्वत:बद्दल खोलात जाऊन विचार केला - मी म्हणजे नक्की कोण आहे, स्वत:ला ओळखण्यापासून ते समाजासाठी व्यापक योगदान आपण कसे देऊ शकतो, याचा विचार करायला मी शिकलो. जगत असताना आपण आपली इच्छा आणि गरज काय यातील फरक करायलाच विसरून जातो, निर्माणमुळे मला तो विचार करता आला. प्रत्येक बाबतीत आपण फक्त कन्ङयुमर न बनता, प्रोडय़ूसर बनलो पाहिजे हे कळलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट करून बघितल्याशिवाय, त्यात उतरल्याशिवाय त्यातला आनंद कळत नाही हे कळलं. सामाजिक क्षेत्रत आपापल्या परीने योगदान देणा:या समविचारी मित्रंशी परिचय झाला, लोकांना भेटता आलं. नायनांचं (डॉ. अभय बंग) एक वाक्य मनाला खूप लागलं, की आपल्याला मिळणार आयुष्य एकच आहे आणि जगात पैसा भरपूर आहे, तर जे कमी आहे ते अमूल्य असते अर्थात आयुष्य! आपल्या जगण्याला हेतू देता येणं महत्त्वाचं.कॅम्प झाल्यानंतर तारु ण्याचा महत्त्वपूर्ण कालावधी फक्त अभ्यास करत घालवायचा की प्रत्यक्ष कामाला सुरु वात करायची यामधील निवड करणो सोपे झालं.प्रत्यक्ष कामात पडून, आपल्याला ते जमतंय का नाही हे बघण्याचं ठरवलं आणि पानी फाउण्डेशनला अर्ज केला. निवड होण्याआधी गावाकडचं जीवन समजून घेण्यासाठी व पाणलोटाचा अभ्यास समजण्यासाठी काकडदरा या छोटय़ाशा पूर्णपणो आदिवासी लोकसंख्या असणा:या गावात एक महिनाभर जाऊन राहिलो. तिथल्या लोकांची जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न केला. विविध यंत्रणांचा परिचय झाला.वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेअंतर्गत तालुका समन्वयक म्हणून नेमणूक झाल्यानंतर आपल्याला हे जमेल की नाही हे प्रश्न मनात होतेच; परंतु गावपातळीवर आधीपासूनच काम करत असलेल्या मंदार देशपांडे, कुणाल परदेशी तसेच निखिल जोशी व प्रफुल्ल शशिकांत या निर्माणीमित्रंनी खूप गोष्टी शिकवल्या. तालुका समन्वयक म्हणून गावक:यांर्पयत जलसंधारणाचे महत्त्व ग्रामसभेच्या माध्यमातून पोहोचवणो, गावक:यांना पाणलोट क्षेत्र विकासाचं ट्रेनिंग देणं, जलसंधारणसोबतच मनसंधारणाची चळवळ गावोगावी रुजवणं, सरकारी योजना - जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना यांचे लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय करत राहाणं, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्याकडून गावांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहाणं अशा विविधांगी जबाबदा:या पार पाडल्या. ‘निसर्गाची धमाल शाळा’सारख्या उपक्रमातून शालेय विद्याथ्र्यामध्ये निसर्गाप्रति प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला.दुस:या वर्षी हेच काम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात केलं. हे सर्व करत असताना फील्डवर काम करण्याचा, लोकांशी बोलून त्यांना समजून घेण्याचा आणि प्रश्नांना वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याचा उत्तम अनुभव आणि शिक्षण मिळालं. काम करण्यासाठी कुठलेतरी सरकारी अधिकारी पद असावेच लागतं या विचाराला फारकत मिळाली. ब:याच वेळा चुका झाल्या, गंडलो; पण त्यातूनही अनुभव मिळत गेले. एकटं एकटं राहायला आवडण्यापासून ते सगळ्या गावक:यांपुढे उभा राहून सहजपणो ग्रामसभा घेण्यार्पयतचा हा प्रवास भन्नाटच होता.सध्या मी पुण्यातील आय टीच स्कूल्स नावाच्या संस्थेत, जी समाजातील वंचित घटकांच्या मुलांना मोफत इंग्लिश माध्यमातून माध्यमिक शिक्षण देते तिथे कम्युनिटी रिलेशन असोसिएट या पदावर काम करत आहे. इथे आम्ही महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत काम करत आहोत. महानगरपालिका इयत्ता सातवीर्पयतच मोफत इंग्लिश माध्यमातून शिक्षण पुरवते. त्यापुढे मुलांना खासगी शाळेचा पर्याय असतो जे त्यांना न परवडणारे असते, कारण बहुतांश मुले ही आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकात मोडतात किंवा ते मराठी माध्यमाकडे वळतात; पण सातवीर्पयत इंग्रजी शिकून पुन्हा मराठी माध्यमात शिकणो त्यांना अवघड जाते आणि पर्यायाने ते शाळा सोडतात. ही गरज ओळखून आठवी ते दहावी मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आय टीच संस्था देते. कामाचं स्वरूप जरी बदललं असलं तरी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची, त्यांच्या गरजा आणि आपली क्षमता यांचा मेळ बसवण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ही प्रक्रिया आणि त्यातून मिळणारं समाधान मला मोलाचं आहे.

****

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.