- श्वेता ढेम्बरे, निर्माण 8
माझा जन्म सातारा जिल्ह्यातील एका छोटय़ाशा खेडेगावात झाला. मी सहा वर्षाची असताना बाबांना मुंबईत सरकारी नोकरी मिळाली म्हणूनआमचे पूर्ण कुटुंब नवी मुंबई येथे स्थायिक झाले. त्यामुळे माझं शालेय ते पदव्युतर शिक्षण हे मुंबईतच झालं. मुंबईमध्ये स्थायिक होण्याआधी माङो बाबा आर्मीत काम करायचे; परंतु मेडिकल डिसॅबिलिटीमुळे त्यांना केवळ दोन वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्ती घ्यावी लागली. बाबांचे आर्मीमधील अनुभव ऐकून देशसेवा म्हणजे सीमेवर शत्रूशी दोन हात करणो अशीच समजूत बनली होती.मी जसजशी मोठी होऊ लागले तसतसे कोण किती मोठय़ा पदावर काम करतो, यावर समाजात किती सन्मान आणि पैसे मिळतील हे ठरते असं समजू लागले होते, म्हणून मीही शासकीय अधिकारी म्हणून कामकरायचे ठरवले. त्यासाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करत होते; पण मला खूप प्रश्न पडायचे की खरंच मी अधिकारी होऊन मला हवे आहे ते काम करू शकतेय का? खूप सारा पैसा कमावून मी खरंच आनंदी असेन का?अधिकारी बनण्याचे कारणच स्पष्टपणो कळत नव्हते. हा गोंधळ सुरूच होता. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू असतानाच मी भौतिकशास्नमधून पदवीचे शिक्षण घेत होते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाले; पण आता पुढे काय, हा प्रश्न पडला होता. ब:याच जणांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे सल्ले दिले. मलाही वाटले की पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यावर माझा आत्मविश्वास वाढेल आणि संशोधनासाठी लागणारी कौशल्यं विकसित होतील म्हणून मी खूप विचार करून मुंबई युनिव्हर्सिटीत जीवभौतिकशास्र या विषयात एमएससीला प्रवेश घेतला. एक प्रोजेक्ट करत असताना मी पूर्णवेळ केवळ लॅबमध्ये टेस्टिंग करून त्याचं अॅनालिसिस असे काम करण्यात समाधानी नाहीये याची जाणीव झाली.
मला नेमकं काय करायचंय याची स्पष्टता नसली तरी माङया कामाचा समाजाला उपयोग होईल असं काहीतरी करायचे आहे हे नक्की माहिती होते. म्हणून मी सामाजिक क्षेत्रत काम करायची संधी शोधत होते. त्याचवेळी मला ‘निर्माण’आणि ‘गांधी फेलोशिप’बद्दल कळाले. एकाचवेळी मी दोन्ही ठिकाणी अर्ज केले. निर्माणचा फॉर्म भरत असताना मला स्वत:विषयी आणि समाजाविषयी खूप विचार करावा लागत होता. इतका विचार मी या आधी कधीच केला नव्हता. नुसता फॉर्म भरत असतानाही मला माङयाचबद्दल काही गोष्टी नव्याने समजल्या. निर्माण शिबिरामध्ये सामील व्हायच्या आधीच मला गांधी फेलोशिपसाठी माझी निवड झाल्याचे कळले; पण मी घेतलेला निर्णय मला आईबाबांना सांगायचे धाडस होत नव्हते.मार्च, 2क्18 मध्ये मी निर्माण शिबिरामध्ये सामील झाली. ते दिवस माङया आयुष्याला वेगळेच वळण देणारे ठरले. शिबिरामधीलप्रत्येक चर्चा, संवाद, उपक्र म हे सगळंच खूप अंतर्मुख करणारे होते. शिबिरामुळे मला स्वची ओळख पटायला खूप मदत झाली. निर्माण शिबिरामध्ये सामील होण्यापूर्वी मित्र-मैत्रिणींसोबत आरक्षण, धर्म-जात, स्री-पुरु ष असमानता याविषयीची मोठंमोठी विधाने करत असताना मी किती अविचारी, असंवेदनशीलपणो वागत होती याची जाणीव शिबिरामध्ये सामील झाल्यावर झाली. वरवरच्या पोकळ गप्पागोष्टी करताना बोलण्यातयेणारी आणि केवळ माङया विचारांमध्ये असणारी सर्वधर्मसमभाव भावना प्रत्यक्षात मात्र जोडीदाराची निवड करताना बिनमहत्त्वाची कशी काय वाटते? त्यावेळी मात्र मी सर्वात आधी तो मुलगा कुठल्या धर्माचा व कुठल्या जातीचा आहे हेच बघत होते. सर्वात जास्त महत्त्वाचं हेच आहे असं माङया मनावर अगदी लहानपणापासूनच बिंबवले होते. यातून समानतेविषयी मी किती मोठी ढोंगी आहे याचे प्रथमच दर्शन झाले. चिंतनशील जीवन जगण्याची सुरु वात या शिबिरामुळेच झाली. या सर्व गोष्टींमुळे माङया निर्णय प्रक्रि येत अमूलाग्रबदल झाला. आपण प्रत्येकजण वैयक्तिक संपत्ती मिळवण्यासाठी सामाजिक साधनसंपत्तीचा खूप मोठा वापर करतो त्यामुळे समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच मी जून 2018 ते 31 मे 2020 मध्ये गांधी फेलो म्हणून अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद या तालुक्यात काम केले. या दोन वर्षात मी सानंदमधील सरकारी शाळेत मुलांना चांगल्या दर्जेचे शिक्षण मिळावे म्हणून प्रत्यक्षात 5 शाळा आणि 5 गावांमध्ये, तर अप्रत्यक्षपणो संपूर्ण टीमसोबत सानंदमधील 112 शाळांमध्ये काम केले. गांधी फेलो म्हणून शिक्षकांची शिकवण्याची कौशल्यं आणि संकल्पनात्मक समज वाढवण्यासाठी व मुख्याध्यापकांना व्यवस्थापनाचे कौशल्ये विकसित व्हावं यासाठी प्रशिक्षण देणं, शाळेत वाचनालय, बालसंसद, प्रार्थना यामध्ये विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा यासाठी बालकेंद्री उपक्र म सुरू करणं, गावामधील तरु ण मुले-मुली, स्कूल मॅनेजमेंट कमिटी आणि पालकांचा शाळेच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग वाढावा यासाठी काम करणं या मुख्य जबाबदारी होत्या. या जबाबदा:या पार पाडत असताना मला गावक:यांसोबत राहून त्यांच्यासारखे आयुष्य जगून त्यांच्या समस्या समजून घेण्याची संधी मिळाली. ज्यामुळे मी प्रॉब्लेम शोधून त्यावर उपाय शोधायला शिकले. गावात स्रीशिक्षणासाठी जागरूकता नसल्यामुळे गावातील मुलींना आठवीनंतर इच्छा नसतानाही शालेय शिक्षण सोडून द्यावे लागते. म्हणून मी ‘बोल चेखला’ हा प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टमधून चेखला या गावातील शिक्षणासाठी आणि नोकरी करण्यासाठी संघर्ष करणा:या स्रियांना बोलण्याची संधी मिळाली व इतर पालकांना त्यांचे अनुभव ऐकून स्वत:च्या मुलीच्या शिक्षणासाठी स्टॅण्ड घेण्याची प्रेरणा मिळाली.गावातील व शाळेतील तरु ण मुलींना मासिक पाळीविषयी बरेच प्रश्न असायचे, काही गैरसमजुतीसुद्धा असायच्या; पण या विषयावर उघड बोलण्याची सोय नव्हती म्हणून मी व माङया मैत्रिणीने प्रोजेक्ट सक्षमची सुरु वात केली. या दोन वर्षात शिक्षणाचे व स्रियांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असताना मला मुलांसाठी कन्टेन्ट डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट डिझाइनिंग व प्रशिक्षण देणं या कामात खूप रस आहे हे लक्षात आलं.म्हणून फेलोशिप संपल्यावर या प्रकारचे काम निवडत असतानाच क्वेस्ट(क्वॉलिटी सपोर्ट ट्रस्ट)ने आयोजित केलेल्या शिक्षणशास्नच्या ऑनलाइन कोर्सेसमध्ये सहभाग घेऊन शिक्षणशास्र शिकत आहे व सोबतच वोपा या संस्थेला मुलांसाठी कल्पक कन्टेन्ट बनवण्यासाठी मदत करते आहे.अशाच कृतीतून शिक्षण आणि शिक्षणातून जीवन हा प्रवास सुरू ठेवतयेत्या काळात शिक्षण क्षेत्रतच काम करण्याचे ठरवलं आहे.***
निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?
तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.