शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

By admin | Published: April 04, 2017 6:35 PM

वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी?

नाशिक, प्रतिनिधीवयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी? आणि मग अत्यंत निष्ठूर होत त्यांनी स्वत:लाच संपवावं? याला पळवाट म्हणायची का? असे किती प्रश्न २३ वर्षाच्या एक मुलाच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. आपण मरण्यापूर्वी इतरांना आत्महत्येचे धडे देण्याइतपत फेसबूक लाईव्ह करुन ते व्हिडीओ करुन ठेवण्यापर्यंत असं काय डाचत असेल त्याला?२३ वर्षाच्या अनुज भारद्वाज नावाच्या तरुण मुलानं फाईव्हस्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली आणि थेट १९व्या मजल्यावर जावून त्यानं आत्महत्याच केली. तो डिप्रेशनमध्येच होता असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यानिमित्तानं भारतातली आत्महत्यांची आकडेवारी जरी नुस्ती डोळ्याखालून घातली तरी वास्तवाचं भयाण चित्र दिसेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले १ लाख ३५ हजार भारतात राहतात. १९८७ ते २००७ या काळात भारतातल्या आत्महत्येचा दर वेगानं वाढला. विशेषत: दक्षिण आणि पुर्वोत्तर काळात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या या काळात अधिक होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१० साली भारतात १ लाख ३४ हजार ६०० लोकांनी आत्महत्या केल्या. २०११ मध्ये १,३५, ५८५, तर २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५ आणि २०१३ मध्ये म लाख ३४ हजार ७९९ जणांनी आत्महत्या केल्या?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के लोक हे शिक्षित होते त्यांनी उच्च माध्यमिक टप्प्यापर्यंत तरी सरासरी शिक्षण घेतलेलं होतं. पण मग त्यांनी का आत्महत्या केल्या?ं आत्महत्येची काही कारण ठळकपणे दिसतात. नकोसं आजारपण, हुंडा, त्यानं छळ, ड्रग्ज, परीक्षेत आलेलं अपयश, घरघुती कलह, प्रेमभंग किंवा प्रेमात फसवणूक, गरीबी, बेरोजगारी, जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू, सामाजिक अप्रतिष्ठा, दिवाळखोरी.साधारण या कारणांमुळे आत्महत्या होते असं पोलिसांचं रेर्कार्ड सांगतं.आता या साऱ्या कारणांतून वाट काढणं, त्यातून तोडगे शोधणं, मदत मागणं हे सारं अशक्य आहे का? जगात कितीतरी लोक या कारणांशी दोन हात करतच असतात..पण निराशेच्या टोकावर जावून अनेकजण स्वत:ला संपवतात कारण ते मदत मागत नाही..मदत शोधा.. मदत मागा..आणि जगा.. मनापासून!