शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

ब्रॅण्ड कुठला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:16 PM

जॉर्जो अर्मानी, गेस, केल्विन क्लाईन, रॅल्फ लॉरेन, शनेल, लकास्ट लुई वीटां असे अशा अमेरिकन, फ्रेंच, युरोपियन डिझायनर लेबल्सबद्दल आपण वाचत, ऐकत असतो.

- आदिती मोघे 

जॉर्जो अर्मानी, गेस, केल्विन क्लाईन, रॅल्फ लॉरेन, शनेल, लकास्ट लुई वीटां असे अशा अमेरिकन, फ्रेंच, युरोपियन डिझायनर लेबल्सबद्दल आपण वाचत, ऐकत असतो. रितू कुमार, सब्यसाचीपासून ते मसाबा गुप्तापर्यंतच्या गाजलेल्या भारतीय डिझायनर्सबद्दलची माहितीसुद्धा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचवत असतो.मोठमोठे ब्रॅण्ड आपल्याला मोहात पाडतात.हे ब्रॅण्ड आले कुठून?मुळात ही ब्रॅण्ड क्रि एट करायची सुरुवात झाली ती १९व्या शतकात, जेव्हा चार्ल्स फ्रेडरिक वर्थ नावाच्या फॅशन डिझायनरने पहिल्यांदा त्याच्या डिझाइनर गाउन्सवर स्वत:च्या नावाचं लेबल लावलं. ‘औट कटूअर’ म्हणजे हाय एंड फॅशन, श्रीमंत लोकांनी स्वत:साठी बनवून घेतलेले टेलर मेड, हॅण्डमेड कपडे असं प्रकरण सुरू झालं.अशा लोकांमध्ये फॅशन सुरू झाली जिथे डिस्प्लेला, प्रदर्शनाला प्रचंड महत्त्व होतं. त्यामुळे अर्थातच ती राजघराण्यातल्या आणि अतिश्रीमंत लोकांपुरती मर्यादित होती.प्रिन्सेस डायनाने तिच्या लग्नात सव्वा लाख डॉलर्स किमतीचा वेडिंग गाऊन घातला होता. तेव्हापासून जगातल्या सगळ्यात महागड्या वेडिंग गाउनवर डायमंड्स आहेत या अशा बातम्या सगळीकडे चर्चिल्या जाऊ लागल्या. अजूनही चर्चेत असतात. करिना कपूरने साडे बारा लाख रु पयांची एरम्सची पर्स घेतली वगैरे बातम्या पेपरमध्ये येत असतातच. जिंदगी ना मिलेगी दोबारा नावाच्या सिनेमामध्ये याचा एक मजेशीर संदर्भ आहे. त्यातही अशीच एक महागडी बॅग आहे, जिला फरहान अख्तर तिच्या अव्वाच्या सव्वा किमतीमुळे ‘बॅगवती’ म्हणत असतो. शनेल, प्राडा, गुची हे असे ब्रॅण्ड्स सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाच्या पलीकडचेच असतात.फॅशन शोजमध्ये घातले जाणारे, रॅम्प वॉक करणाºया मॉडेल्सचे कपडे कोणासाठी असतात हा खूप मजेशीर प्रश्न आहे. कारण पैसे बाजूला राहूदेत, ते कपडे, शूज, हॅट्स, बॅग घालून काही कामं किंवा अ‍ॅक्टिव्हिटीज करता येणंही अशक्य आहे.मात्र तरी ते फॅशन जगात दिसतात. कारण आपण किती श्रीमंत आहोत याचं स्टेटमेंट करण्यासाठी कायमच फॅशनचा वापर होत आला आहे. त्यामुळे त्या फॅशनची आणि उरलेल्या जगासाठीची फॅशनची व्याख्या यामध्ये कायमच तफावत होती आणि असेल.खरं तर आपण उठून दिसावं, चार लोकांमध्ये आपलं वेगळेपण लक्षात यावं या इच्छेतून वेगवगेळे ट्रेण्ड्स येत असतात. गंमत म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या वेळचे ट्रेण्ड्स अनेकदा रिपिट होतानाही दिसतात.आॅड्री हेपबर्न नावाची एक अत्यंत हुशार ब्रिटिश अभिनेत्री होऊन गेली. सुंदर होतीच ती; पण त्याहीपेक्षा स्वत:सोबत कम्फर्टेबल असल्यामुळे उठून दिसली. स्वत:चे विचार असल्यामुळे लक्षात राहिली. तिचे कपडे स्टेटमेंट करणारे असायचे आणि तिची स्टेटमेंट्स विचार करायला भाग पाडायची.ती म्हणायची, लाईफ पार्टीसारखं आहे. त्यानुसार कपडे घालूया. कशाला हवाय बदल. प्रत्येकाची स्वत:ची एक स्टाइल असते. ती सापडल्यावर तीच धरून ठेवावी किंवा स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या कपड्यांमध्ये नसून तिच्या डोळ्यात आहे, असं ती म्हणत असे. आॅड्रीला फॅशनचा सुवर्णमध्य सापडला होता. छान असणं आणि छान राहणं याचा सुवर्णमध्य. म्हणून जगातल्या सगळ्यात गाजलेल्या फॅशन आयकॉन्समध्ये तीचं नाव खूप महत्त्वाचं आहे.मुद्दा काय, जगात काय चाललं आहे, काय ट्रेण्ड्स आहेत, काय इन आहे, याबद्दल माहीत असणं ही एक गोष्ट आहे आणि त्यानं प्रभावित होणं ही दुसरी.ऐश्वर्या रायने जांभळी लिपिस्टक लावली म्हणून सगळ्यांनी ती लावणं यात स्वत:चा काहीच विचार नसतो. फॅशनच्या अनेक लाटा अशाच विचार न करता मान्य केल्या जातात, फॉलो केल्या जातात.मात्र फॅशन ही स्वान्तसुखाय करायचं ठरवलं आपण तर सगळेच उठून दिसू. आपण कसे आहोत हे आपण आपल्या पद्धतीने सांगणं हेच तर वेगळेपण असतं. म्हणूनच अनेकदा केसात चाफा लेवलेली, कॉटनची साडी नेसलेली आजी प्रयत्न न करताच भारी दिसते. कारण तो चाफा तिने स्वत:साठी माळलेला असतो. तो खणाचा ब्लाऊज स्वत: बेतलेला असतोे. कुठल्याही कपड्यांमध्ये स्मिता पाटील लक्षातच राहते. लक्ष कपड्यांकडे जात नाही, तिच्या चमकणाºया तेजस्वी डोळ्यांकडे जातं. फॅशन ही स्वत:मधली जादू ओळखल्यानंतर कशातूनही साधता येते. स्वान्तसुखाय. दॅट इज द की !