शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

WHITE + NEON

By admin | Published: April 14, 2016 6:00 PM

या उन्हाळ्याचा फॅशन कलर कोणता? व्हाइट! फक्त त्या व्हाइटला यंदा हलकासा निऑन तडका मारला जातोय. आणि मग बनतेय रंगीली फॅशन!

 
 
समर फॅशनचा एक कूल मिक्स मामला
 
टिपिकल वाक्य आहे,
पण ते आणि तेवढंच फॅशनच्या जगात कायम खरं ठरतं आणि ते म्हणजे ‘फॅशन हे चक्र आहे, जुनंच फिरून फिरून पुन्हा येत राहतं!’
- यंदाच्या उन्हाळ्यात अगदी तेच खरं आहे.
पूर्वी उन्हाळा आला की लोक सरसकट पांढरेच कपडे वापरायचे. स्वच्छ. शुभ्र. नाहीतर मग पेस्टल शेडचे सुती, कॉटनचे कपडे हे सगळ्यात सोयीचे. आपलं हवामान कायमच उष्ण. त्यामुळे तसंही आपल्याकडे ‘समर’चं पाश्चिमात्य जगाला असतं तसं काही कौतुक नसतं. पण तिकडे ज्याची लाट ते स्वीकारायचं असा एक टप्पा येऊन गेल्यानं मधली काही वर्षे पाश्चिमात्य समर कलेक्शन्स आपल्याकडेही लॉँच होऊ लागली.
शेवटी एकदाचं आपल्या तारुण्याला कळलं की, आपल्याकडचा उन्हाळा वेगळा, त्या उन्हाच्या झळांपासून वाचायचं तर आपले पर्याय आपल्याला शोधायला हवेत. अर्थात हे असं एका रात्रीत काही कळत नसतंच. बदल हळूहळूच होतात. तेच बदल आता काही अंशी तरी आपल्याकडे दिसू लागले आहेत.
आणि म्हणूनच आपल्याकडच्या उन्हाळ्यात यंदा कुठला रंग ‘इन’ आहे असं विचाराल तर त्याचं उत्तर ‘पांढरा’ असंच द्यावं लागेल.
पांढरा रंग आणि फ्लोरल प्रिण्ट्स हाच यंदाचा सगळ्यात मोठा ट्रेण्ड. आणि हा ट्रेण्डच एक ट्रेण्डसेटर असल्यानं आता तो बराच काळ टिकेल अशी शक्यता आहे.
त्यामुळे मस्त शुभ्र सफेद उन्हाळी कपडे हीच आपली फॅशन असं मानायला काही हरकत नाही.
पण तरीही तारुण्याला इतर रंगांची मोहिनी पडतेच. त्यामुळे पांढ:या रंगाचे कपडे घातले म्हणून त्यांचं जग फिकं, बोअर होण्याची शक्यता नाही.
कारण या व्हाइटचा हात धरून निऑन आणि फ्लोरोसण्ट कलर्स पुन्हा तरुण जगण्यात दाखल झाले होते. मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच. फक्त त्यांचं रूप आता बदलतं आहे.
व्हाइट+निऑन
हे यंदाचं उन्हाळी फॅशन स्टेटमेण्ट आहे.
साधे, पांढरे कपडेही थोडय़ाशा चमकिल्या रंगांनी फॅशन स्टेटमेण्ट ठरू शकतात. हा उन्हाळा हेच तर सांगतो आहे.
 
समर निऑन नेल्स
 
नेल आर्ट हा प्रकार तर आताशा खूप लोकप्रिय आहे. त्यातही निऑन नेल आर्ट हा तरुण मुलींच्या जगातला एक अत्यंत लेटेस्ट ट्रेण्ड आहे. निऑन कलर्स नखांवर स्टायलिशली मिरवायला जिगर लागते म्हणतात.
आता समर निऑन नेल्स हे त्याच्या पुढचं पाऊल. म्हणजे काय तर बाकी सगळा पोषाख पांढरा, पेस्टल शेड्समध्ये असेल तर हे निऑन नेल्स सगळा माहोलच रंगीला करतात. त्यामुळे एक-दोन-चार निऑन कलर्स एकत्र वापरून निऑन नेलपेण्ट्स लावणं ही या उन्हाळ्यातली सगळ्यात धाडसी कृती म्हणायला हवी.
आणि त्यासाठी नेल आर्टच कशाला हवी, निऑन कलरच्या नेलपेण्ट काय कुणीही वापरूच शकतं.
 
ग्रीन आयलायनर
उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या तर कोण कशाला मेकप करेल. कितीही वॉटरप्रूफ असला मेकप तरी नकोच वाटतात ती पुटं चेह:यावर. मग त्यावर हा सोपा उपाय. काळं काजळ किंवा आयलायनरला उन्हाळी सुट्टी द्यायची आणि कलर काजळ किंवा आयलायनर वापरायचं. त्यातही सध्या ग्रीन आयलायनर तरुण जगात एकदम मशहुर आहे.
 
जांभळ्या-निळ्या-गुलाबी आयश्ॉडो
 
संध्याकाळी फिरायला जायचंय, छोटं गेट टु गेदर पार्टी आहे तर किती नटून जाणार? त्यातही गरम होण्याचा धोका. त्यामुळे एकच काहीतरी कलरफुल पण ठळकपणो करणं हा सध्याचा ट्रेण्ड. म्हणून मग बाकी मेकपला सुट्टी. अगदी लिपस्टिकलाही सुट्टी द्यायची. आणि फक्त डोळ्यांना जांभळी, निळी, गुलाबी असे आयश्ॉडो वापरायचे.
 
हातात/कानात निऑन
 
पांढरे/सोबर/पेस्टल शेड्सचे ड्रेसेस. पण त्याला कॉण्ट्रास्ट डार्क निऑन कलर्सचे नुस्ते चमचमते खडे असलेले कानातले म्हणजेच स्टड घालता येतात. हातात एखादंच निऑन ब्रेसलेट घातलं तरी आपला लूक कलरफुल दिसतो.
 
झागरमागर चपला
डेअरिंग लागतंच कलरफुल चपला घालायला. एकदम ब्राइट कलरफुल चपला जे कॅरी करू शकतात तेच खरे जिगरबाज फॅशनवाले असं म्हणतात. सध्या तो ट्रेण्ड आहे. चमकिल्या, गोंडेवाल्या, लेसवाल्या, चमचमते खडे लावलेल्या चपला घालून मिरवणं हे काही सोपं काम नाही.
 
केसात रंगीली बट
हे सगळ्यात सेफ पण भारी काम. आपला आत्ताचा लूक आहे तसाच ठेवायचा, पण केसातली एकच बट कुठल्या तरी झटॅक रंगात रंगवायची. बाकी रंगरूप तेच. या एका रंगीत बटमुळे सगळे फॅशनचे इफ अॅण्ड बट्सच संपून जातात.