शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

शवपेटीतल्या घरात राहतं कोण?

By admin | Published: June 22, 2017 8:33 AM

विकासाचे दावे करणाऱ्या चीनचा एक वेगळाच चेहराही समजून घेतलेला बरा.

- निशांत महाजन

शवपेटीतल्या घरात राहतं कोण?विकासाचे दावे करणाऱ्या चीनचा एक वेगळाच चेहराही समजून घेतलेला बरा.चीन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठाल्या बाजारपेठा, भरपूर श्रीमंती आणि अर्थातच श्रीमंत लोकांची मोठी घरं. चीनमध्ये गेल्या पाच वर्षांत अब्जाधीश मोठ्या प्रमाणात वाढले, त्यांची मालमत्ता वाढली. पण त्याबरोबर वाढली तिथली गरिबी, बकाली आणि प्रदूषण. आपण जेव्हा चीनसारखं होऊ असं म्हणतो ना तेव्हा आपल्याला हे चित्र दाखवलंच जात नाही. मग आपल्याला खरी परिस्थिती कळणार तरी कशी? चीनमधल्या अनेक शहरांमध्ये जसजसे नवीन उद्योग निर्माण झाले, तिथे काम करण्यासाठी कामगार लागायला लागले, मग त्या कामगारांना राहायला जागा हवी. चीनच्या खेड्यापाड्यांतून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी तिथल्या सरकारने काही जागा तयार केल्या. तुम्ही म्हणाल की मग बरं आहे की, आपलं सरकार तर तेही करत नाही. आणि त्यामुळे झोपड्या वाढतात. पण आपल्याकडच्या या झोपड्या हे उघड सत्य आहे. चीन एक प्रगत देश म्हणून दाखवला जातो आणि तिथल्या सर्व मोठ्या शहरांमधली अर्ध्याहून अधिक जनता ही अतिशय म्हणजे अतिशय वाईट पद्धतीत राहत असते. या छोट्या छोट्या अपार्टमेण्ट्सना हे लोकं कॅफिन अपार्टमेण्ट असंही म्हणतात. कारण अक्षरश: तेवढीच जागा त्यांना राहायला मिळाली असते. बेनी लॅम नावाच्या एका फोटोग्राफरने सत्य काय आहे हे पडताळून पाहायचं ठरवलं. पहिले तर त्याला अशा इमारतींमध्ये कॅमेरा घेऊन जायला कोणी परवानगीच देईना. पण हळूहळू लोकांची मनं वळवून त्यानं लोकांना आपली पेटी वजा घरे दाखवायची तयारी दर्शविली. तर शांघायमधली ही इमारत जी त्यानं पहिल्यांदा पाहिली ती होती वीस मजली. आणि या २० मजली इमारतीमध्ये २० चौरस फुटाच्या काही अपार्टमेण्ट्स होत्या आणि मोठ्या ६० चौरस फुटांच्या असंख्य अपार्टमेण्ट्स होत्या. अनेकांनी अक्षरश: काही फळकुटांवर आपला संसार रचला होता. तिथेच शिजवायचं, तिथेच झोपायचं. स्वच्छतागृहही तिथेच. फार भयंकर अवस्थेत लोक तिथं राहतात. कशा दिसतात या अपार्टमेण्ट्स, लोकं कशी राहतात इथे हे पाहण्यासाठी गुगलवर कॉफीन अपार्टमेण्ट्स असं सर्च करा. तुम्हाला याविषयी अनेक लेख वाचायला मिळतील आणि तिथल्या लोकांचे अनुभव समजतील. हे फोटो पाहिले, लेख वाचले की आपल्याला आपलं मुंबई शहर किंवा आपली कोणतीही शहरे खरंच शांघाय किंवा हॉँगकॉँगसारखी व्हायला हवी आहेत का? - या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायला मदत होईल. त्यासाठी या लिंक पहा- ‘कॉफीन अपार्टमेंट्स’ 

http://www.dailymail.co.uk/travel/travel_news/article-4306496/Coffin-apartments-Hong-Kong-one-room-families-LA.html
 
https://www.theguardian.com/cities/gallery/2017/jun/07/boxed-life-inside-hong-kong-coffin-cubicles-cage-homes-in-pictures?CMP=fb_gu
 
 
 

इंधन- ही फिल्म पाहा, विचारांनाही इंधन मिळेलच.इंधन आपल्या आधुनिक जगाचा अविभाज्य भाग आहे. खरंतर १५० वर्षांपूर्वी जेव्हा खनिज तेलाचा वापर सुरू झाला तेव्हापासून या तेलानेच आपण आज जे जग पाहतो आहोत ते घडवलं (किंवा बिघडवलं) आहे.आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे खनिज तेलच लागतं. खनिज तेल आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. हे आपल्याला उष्मा देतं, आपल्याला आवश्यक वस्तू आपल्यापर्यंत पोचवत. आपल्याला आपल्या आप्तेष्टांच्या जवळ नेतं. यानेच आपलं जग आपल्या जवळ आणलं आहे. आपण ज्या प्रमाणात हे तेल वापरतो आहोत, ज्या प्रकारे हे मिळवतो आहोत त्याच्या मुळाशी खूप मोठी आव्हाने आहेत. कारण या तेलानेच खूप मोठी युद्धेही झाली आहेत. जॉश टिकेल यांनी २००८ मध्ये प्रकाशित आपल्या ह्यऋवएछह्ण या लघुपटात या राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या ज्वलंत अशा खनिज तेलाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे. जॉश यांनी या तेलामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्या आत्ताच पावले उचलली तर कशा टाळल्याही जाऊ शकतात यावर भाष्य केले आहे. तेव्हा हा मनोरंजक आणि आपल्या रोजच्या जगण्यामध्ये काही सकारात्मक बदल करण्यासाठी, आपल्याला आपल्या वाढलेल्या, आपणच वाढवून ठेवलेल्या गरजांबद्दल पुनर्विचार करायला लावणारा हा लघुपट आजच पाहा.

 
झोपेचं सोशल खोबरं
आपण जास्त झोपा काढतोय का? - तपासा.

सोशल जेट लॅग.अशी एक नवीनच संकल्पना गेल्या आठवड्यात चर्चेत होती. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर ती खूपच गाजली. त्यावर अनेकांनी लगेच लेख लिहिले, अनेक ग्रुप्समध्ये या विषयांवर चर्चा तापली.मुद्दा काय, हा सोशल जेट लॅग असतो काय?शब्दांवरून असं वाटू शकेल की हे प्रकरण काहीतरी सोशल मीडियाशीच संबंधित असलं पाहिजे. पण ते तसं नाही. सोशल मीडियाशी संबंधित नसूनही गेल्या आठवड्यात सोशल मीडियात या विषयाची प्रचंड चर्चा झाली.कारण सोशल मीडिया वापरणारे बहुसंख्य आपण या सोशल जेट लॅगच्या त्रासानं बाधित आहोत की काय हे तपासून पाहू लागलो.त्याच्या मुळाशी आहे, सध्याचं विकेण्ड कल्चर. आठवड्याचे पाच दिवस मरमर काम करायचं. रात्रीबेरात्री झोपायचं, सकाळी उठून पुन्हा आॅफिस. सोशल लाइफ फक्त आॅनलाइनच उरलेलं असतं. त्यात झोप होत नाही. म्हणून मग अनेकजण सुटीच्या दिवशी खूप झोपतात. दुपारी उठतात. जेवतात. पुन्हा झोेपतात. पण या अती झोपण्यानं शरीराचं घड्याळ बिघडतं, हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता वाढते असं एका अभ्यासात समोर आलं आहे. आणि त्यालाच म्हणतात सोशल जेट लॅग. प्रवास करून आल्यावर जशी झोप उडते, शरीराचं झोपेचं चक्र बिघडतं तसंच हे चक्र विकेण्डला बिघडतं. आणि मग त्यातून अनेक व्याधी सुरू होतात.या सोशल जेट लॅगची खूप चर्चा सोशल मीडियातही गाजली. अनेकजण आपापले अनुभव शेअर करत मध्यरात्रीपर्यंत जागले. लवकर निजे, लवकर उठे हेच बरोबर होतं असं म्हणत अनेक जणांनी झोपेच्या वेळा पाळायचं ठरवलं. मात्र तसं सारं काही प्रत्यक्षात येईल का? हाच खरा प्रश्न आहे.कारण ते सध्या प्रत्यक्षात येत नाही. आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळेच अनेकजण रात्रीबेरात्री जागेच असतात. झोपेतून जाग आली तरी तेवढ्या रात्री व्हॉट्सअ‍ॅप चेक करतात. त्यावर काहीबाही वाचून अस्वस्थही होतात. हे सारं असंच चालू राहिलं तर आपला झोपेचं खोबरं होणं अटळ आहे. आणि त्याचे तब्येतीवरचे दुष्परिणाम?