- हेरंब कुलकर्णी
‘लग्न एक इव्हेण्ट’ या माझ्या लेखाला (लोकमत मंथन 27 मे 2018) या लेखावर तरुण मुलांनी आपल्या भरपूर प्रतिक्रिया पाठवल्या. अनेकांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या. आपले अनुभव सांगितले. लग्न हे किती खर्चिक होतंय, कसा त्यापायी जीव गुदमरतोय हे तपशिलानं सांगितलं. लग्नाचं हे वास्तव महाराष्ट्रात कोकणवगळता जवळपास सर्वच भागात आहे असं अनेकाशी बोलून लक्षातही आलं.लग्नसाठीचा खर्च, त्यातली आधुनिक फॅशन हे सारं भयंकर जिकिरीचं होत असताना एक प्रश्न समोर आला की, हे कमी व्हावं, हा प्रश्न सुटावा म्हणून पुढाकार कुणी घ्यायचा? ज्यांच्या मुला-मुलींची लग्न लवकरच व्हायची आहेत किंवा ज्या तरुण-तरुणींची लग्न व्हायची आहेत, ठरली आहेत, त्यांनीच पुढाकार घेत काही बदल घडवून आणला तर? ठरवलंच की, कोण काय करतंय यापेक्षा मी माझं लग्न साधेपणानं करीन तर.?इच्छा असून किंवा नसूनही पालक काही याप्रकरणी पुढाकार घेणार नाहीत. कारण एकतर ते परंपराचे गुलाम असतात किंवा तेही प्रतिष्ठा कल्पनेचे बळी आहेत. तेव्हा हे सुधारण्याची शेवटची आशा हीच की ज्यांची लग्न होणार आहेत अशा तरुण-तरुणींच विचारी व्हावं, प्रश्न करावेत स्वतर्ला की, आपण जे करतोय ते गरजेचं आहे का? एवढा खर्च आपण का करतोय? या पैशाचा अधिक सुयोग्य वापर आपल्या भवितव्यासाठी करता येईल का? या प्रश्नांतून मिळालेली उत्तरं अमलात आली तरच या लग्नाच्या इव्हेण्टला चाप लागू शकेल.तरुण मुलामुलींनी याबाबत सरळ सरळ व्यावहारिक भूमिका घ्यावी. सांगावं पालकांना, तुम्हाला आमच्यासाठी पैसे खर्च करायचे ना तर ती रक्कम सरळ आमच्या नावावर बॅँकेत ठेवा. आम्ही त्यातून आमच्या संसाराला उपयुक्त गोष्टी घेऊ. गावखेडय़ातले बहुतेक तरुण तालुक्याच्या गावी किंवा शहरात नोकरी करीत असतात. तिथे घर घेणं ही त्यांची पहिली गरज असते. लग्नात दहा लाख रुपये खर्च होणार असतील तर त्यातून ते स्वतर्साठी घर, अन्य उपयोगी वस्तू घेऊ शकतील. त्यामुळे हा मुद्दा केवळ नैतिक किंवा सामाजिक सुधारणेचा नाही तर व्यावहारिकही आहे. पण यात अडथळा काहीसा आपल्या तरुण पिढीचाच आहे. आज जे तरुण प्रथम वर्ग अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत किंवा भ्रष्टाचाराची संधी असलेल्या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांचे हुंडे ठरलेले आहेत. तेच हुंडा मिळावा म्हणून आग्रही आहेत. पुन्हा स्वतर्चं लग्न एकदम हटकं व्हावं, अशी मानसिकता असणारेही अनेक तरुण-तरुणी आहेत. चित्नपटात दाखवली जाणारी लग्नं विशेषतर् ‘हम आपके है कौन’ या चित्नपटानं तर लग्न अधिक महाग करायला हातभार लावला. त्याप्रकारचे कपडे हे लग्नाचे पोशाख झाले आणि मुली तर असं लग्नं आपलंही व्हावं असं स्वप्न पाहू लागल्या.लग्नापूर्वीचं प्री-वेडिंग फोटोसेशन आता खेडय़ापाडय़ातही सुरू झालं. नवरीचा मेकअप, व्हिडीओ शुटिंग आणि फोटोसाठी ड्रोन कॅमेरा, इथपासून संगीत मंगलाष्टके म्हणायला खास नाशिक, पुणे अशा ठिकाणाहून आलेला ऑर्केस्ट्राहे सारं काय आहे? मुलामुलींचीच हौस? मुलीच्या बापाला हा खर्च परवडतोय की नाही हा प्रश्नच राहिला नाही. लगA म्हटलं की हे सारं अपरिहार्य होत चाललेलं आहे. त्यासाठी खूप खर्च केला जातो. शहरातील पाहुण्यांना, मुलांच्या ऑफिसात गावाकडची पत्रिका कशी चालेल म्हणत इंग्रजीतून किंवा महागडी पत्रिका छापली जाते.. हे सारे खर्च खरंच अत्यावश्यक आहेत की निव्वळ शो ऑफ?हे प्रश्न तरुण मुलामुलींनीच स्वतर्ला विचारायला हवेत. राजकीय नेत्यांनी लग्नात येऊ नये, लग्नावर खर्च कमी व्हावा, लग्नात कमीत कमी लोक असावेत हे सारे मुद्दे तरुणांनी विचारात घ्यायला हवेत. अकायदेशीर आदेश काढून हे प्रश्न सुटत नाहीत. राजकीय नेते स्वतर् होऊन काही लग्नात जाऊन भाषणं बंद करणार नाहीत.हे सारं बंद झालंच, कमी झालंच तर त्यासाठी तरुण मुलामुलींनीच पुढाकार घ्यायला हवा. लग्न साधी, कमी गर्दीची व्हावीत असं वाटणार्या तरुण-तरुणींनी काही नक्की भूमिका घ्यावी. त्यातून या प्रथा बदलू शकतील.
तरुण मुलंमुली हे करू शकतील का?
तरुण मुलामुलींसमोर हे काही मुद्दे मांडतोय. त्याचा विचार करा, ठरवा हे आपल्याला जमेल का, जमवता येईल का? आपल्याच भवितव्यासाठी.* मी लग्न नोंदणी पद्धतीनं करीन!* परिसरात जर सामुदायिक लग्न ठरत असेल तर मी त्यात नोंदणी करेन.* प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हुंडा घेणार/देणार नाही.* साखरपुडय़ातच लग्न हा पर्याय अमलात आणण्याचा प्रयत्न करीन.* लग्नात कोणतेच धार्मिक विधी करणार नाही.* लग्नपत्रिका न छापता आमंत्रण तोंडी किंवा सोशल मीडियातून देईन.* लग्नपत्रिका छापली तरी त्यात राजकीय नेत्यांची नावं आशीर्वाद/प्रेषक म्हणून टाकणार नाही.* दोन्ही बाजूचे अत्यंत जवळचे नातेवाईक मिळून 50 पेक्षा जास्त लोक लगAाला बोलावणार नाही.* लग्नात डीजे लावणार नाही, संगीत मंगलाष्टकांसाठी स्वतंत्न गायक बोलावून खर्च वाढवणार नाही.* महागडे मंगल कार्यालय, रोषणाई, फोटोग्राफी, व्हिडीओ यावर खर्च कमीत कमी करीन.* वरात काढणार नाही.* वरात काढली तरी डीजे लावणार नाही, कोणीही दारू पिणार नाही याची पूर्ण काळजी घेईल.* लग्नाचा एकूण जो खर्च होईल तो आम्ही वधू व वराकडचे निम्मा निम्मा करू.* लग्नानिमित्त सामाजिक संस्थेला देणगी देऊ.* लग्नात कोणाचेही सत्कार करणार नाही, फेटे बांधणार नाही.* लग्नात विशिष्ट व्यक्तींचे स्वागत करणार नाही.* लग्नात कोणीही राजकीय व्यक्ती किंवा इतर भाषणरूपी आशीर्वाद देणार नाही.* अक्षता म्हणून तांदूळ न देता प्रत्येकाला फुलं देऊ. * जेवणात कमीत कमी पदार्थ ठेवून अन्न खर्च कमी ठेवू.