या वर्षभरात काही गोष्टी तरुण जगण्याचा भाग होतील, नवे न्यू नाॅर्मलची रेषा ओलांडून नाॅर्मलच होतील. त्यातून हाताला चार पैसे मिळण्याची आणि जगण्याला अपेक्षित गती देण्याची संधीही मिळेल. जगभरातच तरुण मुलं या काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपलं आयुष्य २०२१ चा हात धरून बेततील, असे आताच प्रसिद्ध झालेले विविध अभ्यास सांगतात.
गिग जॉब्ज
पूर्णवेळ नोकरी मिळणं कोरोनानंतरच्या काळात अवघड आहे, असं जॉब्ज मार्केट अभ्यास सांगतात. मात्र गिग जॉब्ज म्हणजे छोटं कॉण्ट्रॅक्ट, अल्प मुदतीचं काम, विविध कंपन्यांकडून मिळणारं काम हे गिग स्वरूपाचं काम मिळू शकतं. मॉन्स्टर साइटने केलेला अभ्यास सांगतो की, २०२१ मध्ये गिग जॉब्जला आपण पसंती देऊ असं त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ९२ टक्के लोक सांगतात. तर तर ५२ टक्के लोक म्हणतात की, गिग जॉब्जचं दीर्घ मुदत कॉण्ट्रॅक्ट पण फ्लेक्झी वर्क हावर याप्रमाणे काम करायला जास्त पसंती आहे.
गिग जॉब्ज हा २०२१ मध्ये परवलीचा शब्द होऊ शकतो.
...........
वर्क फ्रॉम होम
कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम चांगलंच रुजलं. गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२१ पर्यंत घरून काम करण्याची परवानगी दिली होती ती आता त्यांनी मेपर्यंत वाढवली आहे. वर्क फ्रॉम होम - रिमोट वर्क हे नव्या कामाचं स्वरूप २०२१ मध्येही कायम राहील.
...........
सायबर सिक्युरिटी
विविध प्रकारचे सायबर अटॅक, हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया अकाउंण्ट्स हॅक होणं, पर्सनल डेटावर हल्ला हे सारं २०२१ मध्ये वाढेल; कारण ऑनलाइन कामाचं वाढतं स्वरूप. त्यामुळे सायबर सिक्युरिटी या विषयात जॉब्जही जास्त असतील आणि दुसरीकडे प्रत्येकाला आपल्या सायबर सेफ्टीसह सायबर प्रायव्हसीची काळजी घ्यावी लागेल, तरुणांना जास्तच.
.........
स्किल लर्निंग
कौशल्य शिक्षणाची चर्चा बरीच वर्षे आहे, पण कोरोना काळानं हे दाखवून दिलं की हातात कौशल्य असेल तरच काम मिळू शकतं. त्यामुळे २०२१ मध्ये स्किल लर्निंगवरच तारुण्याचा अधिक भर असेल. भारतातही शासकीय स्तरावर कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला जाईल.
..........
ऑनलाइन एज्युकेशन
ऑनलाइन शिक्षण शक्य आहे हे तर आता जगजाहीर आहे त्यामुळे योग ते भाषा शिक्षण, कौशल्य शिक्षण ते बिग डेटापर्यंत सगळं विविध ऑनलाइन साइट्सवर शिकण्याचा ट्रेण्ड आताच वाढलेला दिसतो आहे.