शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पायजे कशाला हा फालतूचा पैका?

By admin | Published: February 25, 2016 9:32 PM

हुंडा घेतला नाही किंवा घेणार नाही असं स्वत:च्या अनुभवातून सांगणारी काही पत्रं या गठ्ठ्यात मिळाली आणि तिही ग्रामीण भागातून आलेली!

 हुंडा घेतला नाहीकिंवा घेणार नाहीअसं स्वत:च्या अनुभवातून सांगणारीकाही पत्रं या गठ्ठ्यात मिळालीआणि तिही ग्रामीण भागातून आलेली!त्यातले काही नमुने..कशाला हवीखोटी प्रतिष्ठा??आम्ही तीन भाऊ. एकानेही लग्नात हुंडा घेतला नाही. वडिलांनी मागितला नाही. माझ्या सगळ्यात मोठ्या भावाच्या लग्नात पन्नासच्या आत वऱ्हाडीमंडळी नेली. आपल्या घरी पाहुण्यांना रिसेप्शन दिले. माझे लग्न साखरपुड्यातच आटोपले. माझी सासू मुलीच्या लग्नासाठी व हुंड्यासाठी शेती विकणार होती ती वाचली. माझ्या लहान भावाने आंतरजातीय आंतरप्रांतीय विवाह केला. ही सगळी लग्न साधेपणानं झाली. वरातीसाठी घोड्याचा वापर नाही. फटाके फोडणं, रस्त्यावर नाचगाणं नाही. अहेर घेणं-देणं नाही. वर-वधूचे कपडे आपापले घ्यावेत असं ठरलं. लग्नाच्या वेळी प्रतिष्ठित लोकांचे सत्कार ठेवले नाहीत. कारण येणारा प्रत्येकजण आमच्यासाठी प्रतिष्ठितच होता. मुलीच्या बापाकडून पैसे घेऊन त्यातच नवरदेवाचे अंडरपॅण्ट, बनियन, बूट, सॉक्सपासूनचे कपडे घेणं, घोड्यावर बसणं, वरातीच्या गाड्या आणणं, फटाके फोडणं, यात मला तरी काही भूषण वाटत नाही. आणि माझे वडीलही या मताचे आहेत, ते अत्यंत सुधारणावादी व पुरोगामी आहेत.- राजू छगन शिराळे,बुलडाणातो त्रास इतरांना कशाला?मी एकुलता. एक माझे वय २५ वर्षं आहे. माझे लग्न झालेले नाही. पण घरात लग्नाचा विषय निघाला की मी म्हणतो हुंडा घेणार नाही. तेव्हा माझे आई-वडील खूप चिडतात. कारण मला चार बहिणी आहेत. त्यापैकी तीन बहिणींची लग्न झालेली आहे आणि एकीचे बाकी आहे. त्या तिघींचे लग्न झाले तेव्हा पहिलीला ५१ हजार रुपये, दुसरीला ३ लाख रुपये, तिसरीला २ लाख ५१ हजार रुपये इतका हुंडा दिलेला आहे. आणि चौथ्या बहिणीच्या लग्नात ३-४ लाख रुपये हुंडा द्यावा लागेलच.आणि मग तू का घेणार नाहीस हुंडा, असा माझ्या आई-वडिलांचा मला प्रश्न. पण तरीपण माझे मन म्हणते की जो त्रास आपण भोगला तो इतरांना नको. मी हुंडा घेणार नाही आणि लग्न पण सामूहिक विवाहसोहळ्यातच करीन. बघू कसं जमतंय.- गणेश, बीडताई, जिजूआणि त्यांचा संसारताईला बघण्यासाठी जिजू आले. १०-१५ नातेवाइकांसोबतच. पाहण्याचा कार्यक्रम होता, मात्र त्यांनी लगेच, तेव्हाच लग्न करून ताईला नेले. दहेज-हुंडा, दाग-दागिने म्हणून त्यांनी काहीच मागितलं नाही. ताईसाठी आधीपासूनच घरात घेऊन ठेवलेल्या वस्तूही त्यांनी नेल्या नाहीत. लग्नानंतर त्यांनीच गावपंगत दिली. ताई बीएड आहे. जिजूंनीच तिला नोकरीला लावले. आज ती शिक्षिका आहे. जिजू स्वत: वकील आहेत. इतक्या घाई-गडबडीत झालेलं लग्न पाहून समाजात, नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. सुरुवातीला आम्हाला आणि त्यांनाही लोकांचे टोमणे ऐकावे लागले पण आज ताईच्या लग्नाला साडेपाच वर्षे होऊन गेली. तिच्या सासूबाई कधी म्हणाल्या नाही, की माहेरून अमुक-तमुक वस्तू आणं. पैसे आण. तिचा संसार सुखानं सुरू आहे.सांगण्याचा अर्थ एवढाच की, समाजात अशा ही व्यक्ती आहेत ज्या स्त्रियांचा इतका आदर करतात. ते अपवाद समाजासमोर यायला हवेत. एखाद्या मुलाने हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला दूषणे न देता सपोर्ट करायला हवा. नुसताच हुंडाबंदीचा कायदा कागदावर न राहता तो अमलात आणला गेला पाहिजे.- तसलिम,औरंगाबाद...अरे आज्या,कशाले, फालतूचं?माझ्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. तालुक्याच्या ठिकाणी कापड दुकानातून खरेदी करण्यासाठी आमचे चुलते, मामे, शेजारी-पाजारी मिळून २०-२२ लोकं ही लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायला दोन काळी-पिवळी गाडीनं तालुक्याला आली होती. ५-६ जण एसटीने आले. अमुक-अमुक दुकानात कपडे खरेदी करायचे ठरले. आम्ही तेथे १०-१५ लोकं अगोदर पोहचलो. मी दुकानात उभा राहून म्हणालो, तो पॅण्ट पीस, तो शर्ट पीस आणि पुन्हा एक पांढरा पॅण्ट पीस आणि पांढरा शर्ट पीस, अमुक-अमुक कंपनीचे दोन बनियन, त्या गठ्ठ्यातल्या दोन साड्या, टावेल टोपी बस् एवढे द्या. लगेच बील विचारले त्याने ११०० रु. मुलाचे आणि मुलीचे कपडे मिळून झाले असं सांगितलं. मी लगेच खिशातून तेवढे पैसे काढले अन् दुकानदाराच्या हाती दिले आणि म्हणालो, बांधा तो सर्व बस्ता... अन् द्या इकडं! कपडे घेतले व पायात चप्पल घातली बाहेर निघालो. माझ्यासोबतची माणसं आवाक्क झाली. त्यातली बरीचशी कुजबुज करत होती की, ‘तुलाच तुझ्या हाताने कपडे घ्यायचे होते तर आम्ही एवढे लोक येऊन इथं काय फायदा?’ म्हटलं फायद्या-तोट्याचं गणित नाही. कपडे घेतले आता चला. बाजारातून गावात एक तासातच परत आल्यामुळे शेजारी-पाजारी विचारू लागले.‘‘काय सोयरीक फिसकटली की काय...?’’म्हटलं, अरे, कपडे घेण्यासाठी २५-३० माणसं कशाला पाहिजेत? विनाकारण टाइमपास करायचा. बडे-बुढे म्हणत, ‘‘अरे एकतर हुंडा घेतला नाही बराबर. सगळ्याचीच बचत करतोसकी काय? एकदाच तर लग्न होते आयुष्यात...’’मी म्हणालो, आज्या, कपडे जन्माला पुरत नसतात अन् हुंडाही काही पुरायचा नाही. मग कशाले फालतूचं...?साध्या-सुध्या प्रकारे लग्न झालं. काही दिवसांनी मी ‘स्क्रीन प्रिंटींग’ करू लागलो. पत्रिका छापायला येणाऱ्या माणसासोबत किती हुंडा घेतला? काय करते मुलगी? किती शिकली? अशा चर्चा व्हायच्या त्यावेळेस मी त्यांना हुंडा न घेता लग्न करा, असं सांगत रहायचो.आता तर मला वाटतं, ‘जो मागेल हुंडा, तो एक नंबरचा गुंडा’ असा फलक घेऊन नवरदेवाच्या वरातीत घुसलं पाहिजेत! फरक पडेलच हळूहळू का होईना..- प्रा. बंदू वानखेडे मुंगळा, जि. वाशिम