शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

माणसं अशी का वागतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:21 PM

डेसमंड मॉरिसची पुस्तकं वाचा किंवा यू ट्यूब व्हिडीओ पहा, कळेल..

- प्रज्ञा शिदोरेडेसमंड मॉरिसची पुस्तकं वाचा किंवा यू ट्यूब व्हिडीओ पहा, कळेल.. जगभरात सतत, अनेक, मोठे अभ्यास होत असतात. विविध विषयांवर ज्ञान पुढे जात असतं. सामान्य माणूस यातलं किती नि काय वाचू शकतो? वाचलं तरी भाषा शास्त्रीय? कळणार कशी? कारण शास्त्रीय भाषा अशी सहज आणि वाचनीय कुठे असते? मात्र काही शास्त्रज्ञ तसा प्रयत्न करतात. त्यांच्या विषयाची, सामान्य माणसाला कळतील अशा भाषेत पुस्तकं लिहितात.त्यातलाच एक आवडता लेखक डेसमंड मॉरिस. हा लेखक म्हणजे मूळचा शास्त्रज्ञ, तोही झुलॉजी म्हणजेच प्राणिशास्त्र विषयाचा. त्यानं पुढे जाऊन सोशिओ- बॉयोलॉजी या विषयावर विस्तृत लेखन केलं. माणसाची जडणघडण कशी झाली? त्याच्या अशा घडण्यामागे तेव्हाच्या समाजाचा, टोळीचा काय हात होता, मानवी शरीर, लकबी, चालीरीती या कशा घडत आल्या, असा साधारण त्याच्या लेखनाचा विषय आहे.ब्रिटनमध्ये मॉरिस बरीच वर्षं चिम्पाझीबद्दल अभ्यास करत होता. त्यामध्ये मानवी वंश आणि चिम्पाझी यामधली साम्यं त्यानं शोधण्याचा प्रयत्न केला. चिम्पाझीने रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शनही त्यानं आॅक्सफोर्डमध्ये भरवलं होतं. या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कदाचित यातूनच त्याला त्याचं पाहिलं पुस्तक, ‘द नेकेड एप’ लिहिल्याचं सुचलं असावं. हे पुस्तक बरंच गाजलं. त्यानंतर मॉरिसने याचा दुसरा भागही लिहिला. त्यानंतर त्याने अशी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली.मॅन वॉचिंग हे आणि पीपल वॉचिंग ही त्यांची दोन पुस्तकंही गाजली. यामध्ये मॉरिसने आपल्या पूर्वज कसे टोळीत राहत असतील, त्यांचं आयुष्य, दिनक्रम कसा असेल. कोणाला कशी कामं दिली जात असतील याचं सुंदर वर्णन केलं आहे. याबरोबरच, आपल्या गुहेमधील आयुष्याचा आजही आपल्या वागण्यामध्ये, हावभाव व लकबींमध्ये कसा दिसून येतो हे त्याने दाखवून दिले आहे.‘माणसं अशी का वागतात’, असा प्रश्न तुम्हाला एकदातरी पडला असेल तर तुम्ही त्याची ही पुस्तके नक्की वाचा.आणि हो, यू ट्यूबवर एक ६ भागांची ‘द ह्युमन सेक्सेस’ नावाची मॉरिसची अप्रतिम सिरीज् आहे. त्यामध्ये पुरु ष आणि स्त्री यांमधले काही बेसिक शारीरिक फरक, त्यामुळे त्यांच्या विचारात, वागण्यात येणारे फरक यावर भाष्य केलं आहे. पाहा जरुरँ३३स्र२://६६६.८ङ्म४३४ुी.ूङ्मे/६ं३ूँ?५=ॉाल्ल-ीङ्मश्व_६स्र१ंल्लि८ं.२ँ्रङ्मि१ी@ॅें्र’.ूङ्मे