शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

नाही म्हणजे नाहीच्च!, ही नकारघंटा कायम आपल्यासाठीच वाजते असं का वाटत असेल आपल्याला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 2:05 PM

जे हवं ना, ते मला कधीच मिळत नाही. कायम नकार. जिथं जाऊ तिथं नन्नाचा पाढाच. साध्या साध्या गोष्टी मला मिळत नाहीत, की हव्या त्या माणसाचं प्रेम मिळत नाही. जे हवं ते मिळणार नाहीच, असंच होतं नेहमी? - असं वाटतं ना तुम्हाला अनेकदा?

- प्राची पाठककधीतरी एखादं स्पेसिफिक आइस्क्रीम खायची हुक्की येते. आपण घड्याळ बघतो. लक्षात येतं की यावेळी कदाचित दुकानं बंद झाली असतील जवळपासची; पण खूपच हुक्की आलेली असेल आइस्क्रीम खायची, तर आपण एक चान्स घेऊन बघतो. दुकानं बंद असू शकतात हे माहीत असूनही बाहेर पडतो. जवळचं दुकान बंद असतं. किंवा सुरूही असतं, पण वीज गायब असते. किंवा दुकानदार म्हणतो, ‘तुम्हाला हवं ते आइस्क्रीम खूप खाली आहे. तितक्या वेळ फ्रीज उघडा ठेवता येणार नाही. लाइट यायला अजून दोन तास आहेत. बाकीचं आइस्क्र ीम वितळून जाईल.’म्हणजे पाहा, अवेळी दुकान सुरू आहे, समोर आइस्क्र ीम दिसतं आहे, पण तरीही आपल्याला ते मिळत नाही.आणि कधी तर एक दुकान बंद, मग दुसरं मग तिसरं असं करत आपण फिरतो; पण आपल्याला हवं ते मिळतंच नाही.म्हणजे काय तर आपल्या तोंडावर नकार आदळलेला असतो.फक्त समोर थेट कोणी नसल्यानं आणि असलं तरी त्यांचा आपला विशेष संबंध नसल्यानं, परिस्थिती आपल्याला माहीत असल्यानं हा नकार आपण पचवतो. त्याक्षणी आपल्याला आइस्क्र ीम कितीही हवं असलं तरी ते या-या कारणांनी आपल्याला मिळालेलं नाहीये हे आपण लक्षात घेतो. प्रसंगी चिडचिडतोही; पण स्वीकारतोही. मग आइस्क्रीम नाही तर वेगळं काही घेता येईल का, त्याचा जरासा विचार करतो. क्वचित स्वत:शी म्हणतोही की, आइस्क्रीममध्ये काय इतकंभारी लागून चाललंय? तेच का आपल्याला हवंय! आणि कधीतरी अनायसे घराबाहेर पडलोच असतो, तर आइस्क्र ीम जरी मिळालं नाही तरी वेगळंच काहीतरी खास मिळतं. कोणी अचानक भेटतं. नवीन काही कळतं. काहीतरी मस्त दिसतं. अशावेळी आइस्क्र ीम जरी आज मिळालं नाही तरी मिळेल यार उद्या, परवा अशी स्वत:चीच समजूत घालून आपण छान कुणाला तरी भेटून घरी परत जातो. आइस्क्र ीम नंतर खाऊ, इतकी काय तल्लफ यावी असाही विचार होतो. यातून एक कळतं की सगळे ‘नाही-नसणे’ म्हणजे कायमस्वरूपी नकार नसतात. त्यावेळी ते तसं घडलेलं असतं इतकंच. कायमच असं होईल असं नाही. कधी आपल्याला हवं ते मिळत नाही; पण दुसरं कुठलं तरी आइस्क्र ीम सहज मिळत असतं. एरवी जे आपण चाखलंच नसतं ते आपण तेव्हा ट्राय करून बघतो. ते ही काही वाईट नाही, उलट जास्त भारी आहे असंही वाटतं. किंवा ‘छे, आपलं आवडीचंच चांगलं आहे.’ अशी जाण घेऊन आपण परततो.म्हणजेच काय की नकार किंवा नसणं आणि कशाचा अभाव असणं आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवतं.हे नाही बाबा, तर मग काय उपाय? असे मार्ग काढायला शिकवतो.आपल्या आजूबाजूच्या वातावरणात काय वैविध्य आहे, ते आपसूकच बघायची संधी या ‘नसण्यानं’ आपल्याला मिळते. सगळंच जर सहजसाध्य असतं, तर एरवी आपण एखाद्या गोष्टीची उपलब्धता, तिचं असणं गृहीत धरून टाकतो; पण एक नकार, एक अभाव, एक नाकारलं जाणं आपल्याला इतकं काही सहजच शिकवून जाऊ शकते.शेवटी आपल्याला काय हवं असतं, आईस्क्रीम.ते काही आपलं जेवण नसतंच. त्यामुळे एक गोष्ट नाही मिळाली, उशिरा मिळाली म्हणून आपला वर्तमान खराब करायची गरज नाही, हे आपल्याला कळतं. ते मिळविण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केलेले आहेत, ही खात्री असते आपली. तरीही ते मिळालं नाही, हा डेटा असतो सोबत. हे कळलं की नकारासोबत येणारा स्ट्रेस, भीती, नैराश्य यांच्याशी चार हात करायची दिशा मिळू शकते.आणि मुख्य म्हणजे अशा अनेक गोष्टी, वस्तू आपल्याला हव्या असतात, ज्या मिळत नाहीत. म्हणजे शक्यता त्या वस्तूच्या उपलब्धतेबद्दल आहे. ती वस्तू काही आपल्या विरु द्ध कट-कारस्थान रचत नाहीये. ती आपल्याला मुद्दाम टाळत नाही की नकार देत नाही.पण हीच वस्तू चालती-बोलती व्यक्ती असेल तर?तर त्याक्षणी याच नकाराला शेकडो वेगवेगळे पैलू जोडले जातात.केवळ असणं-नसणं यावर ते अवलंबून राहात नाही. त्याही व्यक्तीचा चॉईस, समज, परिस्थिती तिथे लक्षात घ्यावी लागते. त्यातले सगळेच बारकावे आपल्याला माहीत असतात असंही नाही. म्हणूनच कोणी एखाद्यानं आपल्याला नाही म्हणणं, नाकारणं, आपलं मन नुसतं व्यापून टाकत नाही, तर सगळा मनाचा ताबा घेऊन टाकतं. हवालदिल करतं. कधी सूड उगवायला बघतं. कधी नैराश्यात लोटतं. कधी तणाव निर्माण करतं. कधी अशाच सर्व मिळत्या-जुळत्या गोष्टींची मनात भीती बसते. नव्यानं काही बघता येत नाही. मनात तीच टेप रिपीट मोडला सुरू राहते. काय करावं ते तर सुचत नाहीच; पण कुणाशी बोलावं, ते ही कळत नाही. कुठं बोलू आणि कोण कसे अर्थ काढेल, ते ही कळत नाही. तुटून जायला होतं.पण तसं झालं तरी हे लक्षात ठेवायला हवं की, त्यापायी आपण आपला वर्तमानकाळ नासवू नये..ते कसं जमावं?याबद्दल अधिक पुढच्या भागात..आगे तो बढो..होकार मिळण्याची, हवं ते असेलच, आहेच हे गृहीत धरायची सवय आपल्या इतकी अंगी मुरते हळूहळू की अभाव-नसणं- नकार आपल्याला मिळूच कसे शकतात, इथेच गाडी अडकते. आपल्याकडे काय काय आहे, ते आपण या गृहीत धरण्यानं सहज विसरून जाऊ शकतो. दहातल्या आठ वेळी आपल्याला आइस्क्र ीम अगदी सहज मिळालेलं असते. एकावेळी जरा जास्त फिरून मिळतं आणि एखाद्याच वेळी अजिबात मिळत नाही. साधारण असंच सत्य असायची शक्यता जास्त असते; पण एखाद्याच वेळी एखादी गोष्ट सहज न मिळणं आपल्या मेंदूत जास्तच फिट होऊन जाते. तो अनुभव सतत आठवणीत वर येतो. कधी कधी मनात खूपच जागा व्यापून बसतो. अरे, आठ वेळा चटकन मिळाली ही गोष्ट, हे कोपºयात इवलंसं होऊन बसतं! पण एकदा न मिळणं सगळं मन व्यापून टाकतं. हे अनेकदा आपण मुद्दाम करत नसतो. मेंदूचा केमिकल लोचाच असतो तो. नसलेल्याला प्राधान्य द्यायचा; पण आपण त्यावर मात करू शकतो. जुळवून घेऊन, नकार स्वीकारून. हा टप्पा जितका पटकन पार पडेल, तितकं नवं काही चटकन गवसेल. गाडी एकाच जागी थांबून राहणार नाही. वह चल पडेगी।(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे prachi333@hotmail.com