शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

स्कोप कशाला?

By admin | Published: June 03, 2016 12:34 PM

येत्या काही वर्षात कुठल्या क्षेत्रतल्या करिअर्सना जास्त स्कोप असेल? याचं उत्तर देणारी एक नवी दिशा

‘ज्याला स्कोप असेल ना पुढे, तेच कर!’
असं सगळे सांगतात, पण पुढे स्कोप कशाला आहे, हे कशावरून ठरवणार?
***
‘मॅडम असं काहीतरी सांगा, ज्याला आज स्कोप नसेलही, पण फ्युचरमध्ये खूप स्कोप असेल, ती साइड कुठली ते सांगा!’
***
‘माङो मित्र म्हणतात आता काही इलेक्ट्रिकलला आणि इलेक्ट्रॉनिक्सला स्कोप नाही, आपण सगळे सिव्हिलच करू, आपल्या देशात भविष्यात सिव्हिलला स्कोप असेल. पण मला सिव्हिल ङोपेल असं वाटत नाही, पण तरी स्कोप आहे म्हणून करू का सिव्हिल?’
***
‘मला अनेक गोष्टी आवडतात, पण त्यातून आपलं ‘करिअर’ बनेल अशी गोष्ट कोणती असेल?’
***
‘आता आपण एक निवडू आणि भविष्यात ती लाइनच ढपली तर काय?’
*********
असे प्रश्न घेऊन आता या अॅडमिशन मोसमात मुलं आणि त्यांचे पालकही हमखास येतात.
त्यांना आपल्या या सा:या प्रश्नांची हे कराच आणि हे अजिबात करू नका अशी हमखास ‘निर्णय’वाली उत्तरं हवी असतात. पण एक कायम लक्षात ठेवायला हवं की, कुठलाही कौन्सिलर, मार्गदर्शक तुमच्या स्वभावाला, गुणवत्तेला, बुद्धिमत्तेला अनुसरून आणि तुमचा कल ओळखून साजेसे करिअर पर्याय सुचवू शकतो. त्या पर्यायातूनही पुढे भविष्यात अधिक स्कोप साधारण कशाला असेल आणि ते काम करताना तुम्हाला आनंद मिळेल की नाही याचे आडाखे बांधू शकतो.
पण आपल्यासाठी करिअरचीच नाही तर अभ्यासक्रमाची दिशा आपल्यालाच ठरवावी लागते. आणि मुख्य म्हणजे ती आपणच ठरवणं गरजेचं असतं. कारण आपले आनंद आणि आपलं मन भविष्यात कशात रमेल याचा पुरता अंदाज कुणाहीपेक्षा आपल्यालाच जास्त असतो.
त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवत असाल आणि कुणीतरी म्हणतं की भविष्यात प्युअर सायन्सला जास्त स्कोप आहे, तू बीएस्सी कर म्हणून तेच करायला जायचं असं करू नका.
किंवा त्याउलटही सगळे करत असतील. इंजिनिअरिंग आणि तुमची क्षमता अगदी आयआयटीत जाण्याची आहे असंही सांगत असतील. पण तुमचं मन म्हणत असेल की, आपण केमिस्ट्रीत बीएस्सी, एमएस्सी करू. त्यात पुढे संशोधन करू तर तेच करा.
कारण स्कोप कशाला या प्रश्नाचं उत्तर जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मला काय आवडतं या प्रश्नाचं उत्तरही महत्त्वाचं आहे. आणि ज्याला आपण स्कोप म्हणतो ते म्हणजे आपल्या लेखी नक्की काय हेदेखील स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे.
त्यामुळे येत्या साधारण दहा वर्षात कुठल्या करिअरना थोडी जास्त ‘डिमाण्ड’ असेल, त्या दिशांना अधिकाधिक संधी, पैसा उपलब्ध असेल याची एक साधारण यादी आपण करूच!
मात्र त्यासोबतच आपल्याला आपला ‘कल’-‘कुवत’ माहिती असणंही अत्यंत गरजेचं आहे.
नाहीतर अमुक एका गोष्टीला स्कोप असेल म्हणून लोंढय़ासह आपणही पळत सुटलो तर त्या लोंढा लाटेत आपण मागेच पडणार किंवा बाहेर फेकले जाणार. हे कटू असलं तरी वास्तव आहे. 
त्यामुळे ‘स्कोप कशाला आहे?’
हा प्रश्नच आपल्या संदर्भात आपण बदलून घेऊ. आणि मग स्वत:सह इतरांनाही विचारू की,
‘मला स्कोप कशात असेल?’
या व्यक्तिगत प्रश्नाचं उत्तर शोधणं मग सोपं जाऊ शकतं!
आणि आपल्या आनंदासह योग्य वेळी, योग्य करिअरही आपण पदरात पाडून घेऊ शकतो!
त्यामुळे आपली आवड, आपला कल या दोन गोष्टी प्राधान्यक्रमावर ठेवा आणि मगच नव्या स्कोपवाल्या करिअरमध्ये आपल्या आवडीचं काम शोधा!
कारण स्कोप सर्वच क्षेत्रत, सर्वोत्तम कामाला सदैव असतो.
फक्त आपण त्या ‘सर्वोत्तम’ श्रेणीत असणं गरजेचं आहे, याची मनाशी खुणगाठ बांधा.
 
 
‘स्कोप’ म्हणजे नक्की काय?
 
अमूक गोष्टीला भविष्यात स्कोप आहे, आणि तमूकला अजिबात नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या स्कोप या शब्दात आपल्याला नेमकं काय अभिप्रेत असतं?
साधारणत: पालक आणि मुलं स्कोप हा शब्द विशिष्ट संदर्भानंच वापरतात.
1) असं क्षेत्रं ज्याच्यात भविष्यात अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध असतील.
2) या क्षेत्रत भरपूर पैसा मिळेल. पैशानं सुबत्ता येईल.
3) परदेशी जाण्याची आणि तिथंही भरपूर पैसा कमावण्याची संधी असेल.
पण स्कोप म्हणजे एवढंच नव्हे.
भरपूर रोजगार संधी मिळणं, आपण ज्या क्षेत्रत काम करणार ते क्षेत्रच भरभराटीस लागलेलं असणं, त्यातून भरपूर पैसा मिळणं हे सारं तर स्कोप या शब्दात अपेक्षित आहेच.
ते असायलाच हवं.
मात्र त्यासोबत स्कोप कशाला हे तपासताना आपण काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
1) या क्षेत्रत नवीन प्रयोगांची, नव्या कामाची किती संधी आहे.
2) आपल्याला ते काम, प्रयोग करताना किती आनंद मिळेल.
 3) आयुष्यभर तेच काम करायला आपल्याला आवडेल की आपल्या वाढीसोबत त्या क्षेत्रतली नवीन आव्हानंही आपल्याला पेलायला मिळतील.
4) आपल्या आनंदाची आणि त्या क्षेत्रची सांगड घातली जाते आहे का? कारण कामात आनंद नसेल तर नुस्ता पैसा मिळूनही कामाचं समाधान मिळत नाही.
5) त्यामुळेच यासा:याचा विचार करुन आपल्यासाठीचा ‘स्कोप’ निवडावा.
 
इंजिनिअरिंग/एमबीए महत्त्वाचंच, पण..
 
इंजिनिअरिंगच्या अमुक साइडला काही भाव नाही, अमुक साइडलाच जास्त भाव आहे असं मुलंही सर्रास म्हणतात. आणि मग आपल्याला हवी असलेली साइड मिळाली नाही तर कॉम्प्रमाइज करत सरळ मिळेल ती साइड घेतात. ज्यांना बीईला अॅडमिशन मिळत नाही ते सर्रास डिप्लोमा करतात.
पण हे सारं करताना एक लक्षात ठेवायला हवं की, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर इंजिनिअरिंगच करा. त्याबाबत मनात किंतू आणू नका.
मात्र कुठल्याही गल्लीबोळातल्या, कुठल्याही खासगी महागडय़ा पण फारसं नाव नसलेल्या कॉलेजातून इंजिनिअरिंग करण्यात काहीही अर्थ नाही.
कॅम्पस प्लेसमेण्टची सध्या मारामार आहेच. त्यात आपल्या नुस्त्या डिग्रीला काही किंमत नाही. त्यापेक्षा आपण कुठल्या नामांकित कॉलेजातून इंजिनिअरिंग करतो आहोत याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सर्वोत्तम इंजिनिअर व्हायचं मनात असेल तर सर्वोत्तम कॉलेजच निवडायचा आणि त्यासाठी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.
जे इंजिनिअरिंगचं तेच एमबीएचंही.
अगदी पत्रव्यवहारानंही अनेकजण एमबीए करतात. मात्र त्यालाही अर्थ नाही.
त्यामुळेच नामांकित संस्थेतून एमबीए हेच तुमचं ध्येय असणं उत्तम.
 
 
 
आपलं मन काय म्हणतंय.
 
आपला कल कुठे आहे, आपलं मन काय म्हणतंय, आपल्याला मनापासून काय करायला आवडतं, आवडणार आहे त्याचंच शिक्षण घ्या. अगदी लोकांच्या लेखी त्या सा:याला काहीही किंमत नसली तरीही!
त्यामुळे तुमचं मन नेहमीच्या रूळलेल्या वाटांना नाही म्हणत असेल, तुम्हाला भलतंच काही शिकायचं असेल किंवा आवडत्या क्षेत्रत प्रत्यक्ष काम करून अनुभव घ्यायचा असेल तर ते करा.
आपण जे करू त्याला स्कोप असेल यावरही विश्वास ठेवायला हरकत नाही. पण त्यासाठी आपण जे काम करू, जे शिकू त्यावर आपलाच पूर्ण विश्वास हवा.
 
 
 
भविष्यातले HOT JOBS
 
प्रत्येक काळाची एक गरज असते. त्या गरजेनुसार त्या काळाच्या विशिष्ट टप्प्यात विशिष्ट कामांना अत्यंत मागणी असते. आणि त्या क्षेत्रत भरपूर रोजगारनिर्मिती होते, पैसाही मिळतो. एकेकाळी बॅँका, एलआयसी, सरकारी नोक:यांमध्ये या सा:या संधी निर्माण झाल्या. त्यानंतर आयटीची लाट आली.
आता स्मार्ट टेक्नॉलॉजीसह निर्माण होणारे नवीन प्रश्न, नवीन लाइफस्टाइल यासह सव्र्हिस इंडस्ट्रीत अनेक नवे रोजगार, नवी क्षेत्रं विकसित होत आहेत.
त्यापैकी काही क्षेत्रंना भविष्यात विशेष भरभराट लाभेल.
त्यांचीच ही एक यादी.
करिअर निवडताना ही नवीन ‘स्कोप’वाली करिअर्स तुमच्या नजरेसमोर असावीत.
 
1) कॉमर्स
 
नेहमीच्या ग्रॅज्युएशनच्या रुटीन वाटेत कॉमर्स या शाखेकडे विद्याथ्र्याचा ओढा आहेच.
मात्र आगामी काळात कॉमर्सचा अभ्यास केलेल्या विद्याथ्र्याना अनेक क्षेत्रत संधी असतील. आणि बी.कॉम. या पदवीच्या पायावर अधिक अभ्यास करून अनेक क्षेत्रत करिअरच्या वाटा फुटतील. त्यामुळे दहावीनंतर कुठं जावं हे कळत नसेल तर ते कळेर्पयत कॉमर्सच्या वाटेनं जायला हरकत नाही. मात्र आपला कल तपासून या वाटेनं गेलं तर अधिक संधी नक्की असतील. मात्र बीएएफ म्हणजेच बॅचलर ऑफ अकाउण्ट्स अॅण्ड फायनान्स, बीएफएम म्हणजे बॅचलर ऑफ फायनान्स मॅनेजमेण्ट असे पदवी अभ्यासक्रमही सध्या उपयुक्त आहेत.
 
2) लॉ
 
वकील होऊन काय होणार, लॉ करून पुढं स्कोप किती, कशी चालणार प्रॅक्टिस हे सारे प्रश्न पडतात हे खरंय; मात्र भविष्यात कायदा विषयातल्या स्पेशलायङोशनला विशेष महत्त्व येणार आहे. आजच त्या विशेष कायदेविषयांचा अभ्यास करणारे, त्यात काम करणारे विशेषज्ञ कमी आहेत.
*कॉर्पोरेट लॉ 
आपल्याकडे कॉर्पोरेट कल्चर वाढतं आहे. त्यानुसार कार्पोरेट क्षेत्रतील विविध कायद्यांचा अभ्यास करून त्यातले झगडे सोडवणारे तज्ज्ञही लागतीलच. त्यामुळे कार्पोरेट लॉ हा येत्या काळात महत्त्वाचा विषय असेल.
* प्रॉपर्टी लॉ
या विषयातही अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयात अभ्यास करणारे तुलनेनं आजही कमी आहेत.
* सायबर लॉ
हे तर अत्यंत नवीन वेगळं क्षेत्र.
एटीएम ते सायबर गुन्हे, ते समाज माध्यमं, ते ऑनलाइन वॉर्पयत विविध विषयांत, विविध टप्प्यांत काम करणारे अनेक तज्ज्ञ या सायबर लॉचा भाग आहेत.
 
3) सीएस
जितकं सीए होणं महत्त्वाचं तितकंच येत्या काळात सीएसला महत्त्व असेल. कारण सर्व लिस्टेड कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी नेमणं यापुढे बंधनकारक झालं आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी अर्थात सीएसचं महत्त्व वाढतं आहे.
 
4) हेल्थ केअर
या क्षेत्रत तर इतक्या संधी उपलब्ध होत आहेत, ज्या आज वैद्यकीय क्षेत्रतही नाहीत. त्यामुळेच नुस्तं मिळेल त्या शाखेतून डॉक्टर होण्यापेक्षा या वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांकडे लक्ष देणंही जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
आणि या क्षेत्रत अजून तरी कुशल मनुष्यबळाची वानवा आहे.
* रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल्स.
* फिजिओथेरपिस्ट.
*ऑक्युपेशनल थेरपिस्ट.
* न्यूट्रिशन्स
* स्पोर्ट न्यूट्रिशन्स
* डाएटिशियन.
* पॅरा मेडिकल टेक्निशियन.
हे सारे कोर्सेस सायन्सच्या विद्याथ्र्यासह काही संदर्भात होम सायन्स शिकणा:यांसाठीही उपलब्ध आहेत. बारावीनंतर आणि पदवीनंतरही या विषयातले कोर्सेस करता येऊ शकतात.
 
5) जाहिरात/मार्केटिंग/डिजिटल मार्केटिंग
 
जाहिरात/मार्केटिंग या क्षेत्रंची क्षितिजं प्रचंड विस्तारत आहेत. क्रिएटिव्हिटी ते पूर्ण व्यवहार अशी कक्षा असलेला हा विषय.
आणि आता त्यात डिजिटल मार्केटिंग ही नवीन शाखा समाविष्ट झाली आहे. मोबाइल, अॅप्स, वेबसाइट्स, सोशल मीडियावरचं मार्केटिंग, ब्रॅण्ड बिल्डिंग या सा:याचा या डिजिटल मार्केटिंगमध्ये समावेश होतो.
अजून हे क्षेत्रच नवीन आहे. पण पुढच्या काही वर्षात मार्केटिंग आणि जाहिरातींचा सगळा फोकसच डिजिटल मार्केटिंगवर असेल.
सध्या यासाठी खास कोर्सेस उपलब्ध नसले तरी सध्याचे अनेक कोर्सेस त्यासाठी उपयुक्त ठरतील.
* बॅचलर ऑफ मीडिया मॅनेजमेण्ट.
* बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स
* बॅचलर ऑफ जर्नालिझम
 
6) डाटा अॅनालिसिस्ट
हे क्षेत्रही नवीन आहे. प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत असलेला डाटाचे विश्लेषण हे नवीन काम. आणि माहिती कुठलीही असो, ती कुठल्या संदर्भात वापरली जाते त्यानुसार त्याचं विश्लेषण करावं लागतं.
या क्षेत्रत स्टॅटिस्टिक्सचे पदवीधर ते मीडिया मॅनेजमेण्ट ते पत्रकार या सा:यांना संधी असू शकते.
 
7) होम हेल्प
होम हेल्प ही सव्र्हिस इंडस्ट्री म्हणून उभी राहत आहे. त्यासाठी अॅप भविष्यात विकसित होतील किंवा तुम्ही करू शकाल.
एका क्लिकवर घरकाम करणा:या व्यक्तीपासून ते प्लंबर, सुतार ते ज्येष्ठांसोबत देखभालीसाठी राहणारे प्रथमोपचार जाणणारे सेवक या सा:या सेवा एका छताखाली येतील. होम हेल्प इंडस्ट्री ही सगळ्यात वेगानं विकसित होणारी सेवा आहे. त्यामुळे अकुशल व्यक्तींनाही यात संधी उपलब्ध होऊ शकते.
 
- अनुराधा प्रभुदेसाई
(लेखिका दिशा कौन्सिलिंग सेण्टर या नामांकित संस्थेच्या संचालक आणि कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहेत.)
 
anuradha@dishaforu.com