शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

आत्महत्या का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 6:26 PM

तरुण मुलांच्या आत्महत्या. काळीज कापत जाणारा, सध्या चर्चेत असणारा हा विषय. अलीकडेच एका तरुणानं मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलात रूम बुक केली.

- प्राची पाठक 

तरुण मुलांच्या आत्महत्या.काळीज कापत जाणारा,सध्या चर्चेत असणारा हा विषय.अलीकडेच एका तरुणानं मुंबईतएका पंचतारांकित हॉटेलातरूम बुक केली.आणि जीव देतानासुसाईड ट्युटोरिअल लाइव्ह केली फेसबुकवरून.दुसरा एक आयटीवाला पुण्यातला.त्याचे मित्र बाहेरच्या खोलीत बसलेले असतानायानं गळफास लावून आत्महत्या केली.आणि आॅटो मोडवर कॅमेºयात ते सारंमित्रांसाठी शूट करून ठेवलं.आपला मित्र आत गळफास लावून घेतोयहे बाहेर बसलेल्या मित्रांना कळलंही नाही.अलीकडे तर फेसबुकवरसुसाइड नोट लिहून दोघांनी आत्महत्या केली.त्या पोस्टला लाइक करणारेही होतेआणि त्यांच्या शब्दांना गांभीर्यानं न घेणारेही.बाकी, परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून,प्रेमभंग झाला म्हणून,आईवडिलांनी अमुक गोष्ट दिली नाही म्हणूनअगदी शाळकरी, कॉलेजात जाणारेमुलंमुलीही आत्महत्या करत असल्याच्या घटनाआपण माध्यमांतून वाचतो आहोत.तरुणांचं आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे का?आकडेवारी सांगते की,१५ ते २९ या वयोगटातला एक तरुणभारतात दर तासाला आत्महत्या करतो.सर्वाधिक तरुण आत्महत्या होणाºयादेशांत भारत सहावा आहे.या विषण्ण करणाºया आकडेवारीला जबाबदार कोण?तरुण मुलांनीच स्वत:लाआणि इतर तरुण दोस्तांना सावरायलापुढे व्हायला हवं.मन मोकळं करायला हवं.पण ते कसं जमावं?

‘टेस्ट आॅफ चेरी’ नावाचा इराणी सिनेमा बघितलाय?साधारण पन्नाशीचा माणूस.त्याला आत्महत्या करायची असते.अगदी पक्कं ठरलेलं असतं त्याचं. पण नुसतंच कुठेतरी जाऊन जीव देणं त्याच्या डोक्यात नाही. कुठून उडी मारून त्याला मरायचं नाही. आपण मेलो, तर आपल्या प्रेताचीदेखील नीट विल्हेवाट लागावी, ते नीटसं पुरलं जावं अशी त्याची इच्छा असते. त्याशिवाय त्याला जीव संपवायचा नसतो. आपल्या प्रेताला नीट पुरलं जावं म्हणून तो एका टेकडीवर खड्डादेखील खणून ठेवतो. आता टेकडीपासून खालच्या आणि आजूबाजूच्या परिसरात स्वत: मेल्यावर प्रेतावर फावड्यानं माती लोटायला माणूस शोधत फिरतो. या कामासाठी भरपूर मोबदला द्यायला तयार होतो.सुरुवातीला एका कामगाराला विनंती करतो. हा कामगार तुटपुंज्या पैशात कसंबसं बिचारा जगत असतो. हा माणूस त्याला विचारायला जातो की माझं एक काम करशील का? पण याचं काहीच न ऐकून घेता तो एक ठोसा लगावेन, अशा आविर्भावात याला हाकलून देतो. मग तो टेकडीवर कचरा वेचणाºया माणसाला गाठतो. इकडचं तिकडचं विचारतो. त्याच्या अंगावरचे कपडे बघतो. त्याला पैशाची किती गरज आहे याचा अंदाज घेतो. मग काम सांगायला जातो. तो माणूसदेखील याचं काम न ऐकताच सुसाट पळत सुटतो. याची परत शोधाशोध सुरू होते. आत्महत्येचा प्लॅन तर डोक्यात फिक्स एकदम.मग तो एका तरु ण ट्रेनी शिपायाला गाठतो. ‘गरज पडली, तर तू बंदूक चालवशील. पण माझ्या प्रेतावर फावडे चालवून माती टाकायला नकार देतोस’, असे एकदम भावनिक आणि लॉजिकल अपील करतो. त्याचं काम ऐकून तो शिपाईदेखील टेकडीवरून उडी मारून पळून जातो. ‘माझ्या देवाला मी असं केलेलं चालणार नाही’, असं त्याला सांगतो. आता त्याला थेट धर्मगुरू होण्याचं शिक्षण घेणारा माणूस सापडतो. त्याला तरी असं काम करायला विशेष आडकाठी नसेल, असं मानून काम सांगतो. तो याला लेक्चर देत बसतो. ‘अरे, लेक्चर ऐकायचंच असतं तर जरा बºया आणि आधीच शिकून तयार झालेल्या माणसाकडे नसतो का गेलो मी?’, असं हा त्याला सांगतो. मग तोही वैतागून नकार देऊन निघून जातो.आता हा फारच हताश होतो. वाटेत त्याला मेलेल्या प्राण्यांमध्ये भुसा भरून मॉडेल्स तयार करणारा टॅक्सीडर्मीस्ट भेटतो. त्याच्या आजारी मुलाच्या उपचारासाठी पैशाची गरज असते. तोदेखील काम ऐकून याचीच उलट तपासणी सुरू करतो. अरे, तू कोण कुठला, तुला का मरायचं आहे? असं कोणतं दु:ख आहे? वगैरे चौकश्या सुरू करतो. हा काहीही सांगायला नकार देतो. मग तो टॅक्सीडर्मीस्ट त्याच्याही आयुष्यात असे प्रसंग आले होते, जेव्हा जीव नकोसा झाला होता अगदी, असं सांगायला लागतो. एकदा तो झाडाला गळफास लावून घ्यायला घरातून निघतो. रात्री झाडावर जाऊन बसतो दोर घेऊन! आता मरणार, तर त्याचवेळी त्याला झाडावर चेरीची फळे लागलेली दिसतात. तो चाखतो ती. पहाटेचा सूर्य उगवताना बघतो. मग बायकोची अगदी आतून आठवण येते आणि मग कसा लगोलग तो दोर टाकून घरी पळत सुटतो, ते त्याला सांगतो. निसर्गात वेगवेगळे ॠतू असतात आणि प्रत्येक ॠतूची काही फळं असतात. ती आपण चाखावी, आयुष्याशी लढावं वगैरे सांगू लागतो.पण हा ढिम्म! काहीच ऐकायच्या मूडमध्ये नाही. शेवटी तो टॅक्सीडर्मीस्ट पैसे घेऊन काम करायला तयार होतो. दोन काय, चार दगड मारून आधी तू मेलास का, ते खड्ड्यात तपासेन आणि मगच मी माती लोटेन, असं त्याला कबूल करतो. पुढं काय होतं ते आपण सिनेमात शोधत राहतो. आपल्या मनातदेखील असा संथ आणि शांत सिनेमा पाहून खूप चलबिचल होत राहते. कंटाळा येतो त्या सिनेमाचा, पण बघितल्याशिवाय राहवतदेखील नाही. एकदाचं याचं होतं काय, अशी शोध घेत राहते नजर. आपण उत्तर शोधू लागतो, का त्या माणसाला आयुष्य संपवायचं आहे, कोण आहे तो, पैसे आहेत, गाडी आहे, चांगला धट्टाकट्टा तर दिसतोय, असे अंदाज बांधत राहतो. काय होईल शेवटी? अशी काळजी करतो. आपल्या मनात आयुष्य आणि मरण याविषयीच्या वेगवेगळ्या विचारांच्या लाटा उसळतात, त्या अनुभवत राहतो..आणि ते सारं होताना आपण आजवर ऐकलेल्या-वाचलेल्या आत्महत्येच्या घटना आपल्याला आठवतात. कुणी आत्महत्या केली तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. वाटतं, का असं करत असतील लोक? अशी कोणती दु:खं असतात, जी आयुष्य नकोसं करून टाकतात? ते खूप खचलेले असतात मनानं का? पण मग त्याही खचलेल्या मानसिक अवस्थेत स्वत:चा जीव संपवायचं कठोर काम कसं काय करू शकतात?लहानपणी आपण टीव्हीवर एखाद्या सिनेमात बघतो, कोणीतरी कसल्याश्या गोळ्या खाऊन जीव द्यायचा प्रयत्न करतं. कुणी पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहतो आणि सगळं गाव जमा करतो. सगळ्यांचं लक्ष त्या माणसाकडे लागतं. स्वत:च्या जिवाचं काहीतरी बरंवाईट करून घेईन या धमकीच्या आडून तो निदान काही काळासाठी त्याचं म्हणणं सांगायची संधी शोधतो. त्याचं म्हणणं ऐकलं की सगळे एकदम सेंटी होतात. त्याला ऐकणारा कान मिळतो. इतरांना त्यानं काय काय सोसलं आहे, याची जाणीव होते. मग शेवटी तो चुपचाप पाण्याच्या टाकीवरून, कुठल्याशा खांबावरून खाली येतो.तू कसा आम्हाला महत्त्वाचा आहेस, तू कशी प्रेमाचा आहेस ते लोक सांगतात आणि चुटकीसरशी एक घटनाचक्र फिरतं आणि आयुष्य सुकर होतं. त्यानंतर सगळ्या समस्या मिटतात असे हे सिनेमे दाखवतात. सगळे त्या व्यक्तीला आपलंसं करतात, आपल्या म्हणण्यानुसार वागतात. असं काही केलं तर असंही कुठेतरी मनात दडलेलं असतं ते यानिमित्तानं सुखावतं.पण सिनेमातल्या सारखं सारं प्रत्यक्षात कुठं होतं?या सगळ्या गदारोळात फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या करणारे, लाइव्ह आत्महत्या करणारे, आपण गळफास कसा घेतला याचं आॅटो शूट करून ठेवणारेदेखील असतात. आणि आपल्याला बातमी कळेपर्यंत त्यांचं जगणं संपलेलं असतं.पुढे होतात त्या फक्त चर्चा.त्या चर्चांनी सारेच धास्तावतात. परीक्षेच्या आधी, परीक्षेच्या निकालाच्या आधी पालक आडून आडून मुलांना सुचवतात.. ‘बाबा रे/बाई गं, तसलं काही करू नकोस. कमी मार्क्स मिळाले, पेपर अवघड गेला, तरी सुखरूप घरी या.’ म्हणजे असं काही मुलांच्या मनात नसलं तरी ते मनात टाकून देतंच कुणीतरी!पण तरी निकालानंतर आत्महत्यांच्या बातम्या येतात. काही लेख, तज्ज्ञ सांगतात की काल ठरवलं म्हणून आज जाऊन कोणी आत्महत्या करत नाहीत. त्यापाठी अनेक दिवस, रात्रं, महिने काहीतरी अस्वस्थता सुरू असते.पण मग काही दिवसांनी नव्या बातम्या.हवा तसा शर्ट नाही मिळाला, हवं ते खेळणं नाही मिळालं, मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून एखादा लहानगा आत्महत्या करतो. त्याच्या मनात अशी किती वर्षांची चिलबिचल असणार? ते आपण शोधत राहतो.आठ-दहा वर्षांच्या आयुष्यात असं घडतं काय की मुलं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात? डोक्याचा भुगा होतो नुसता. उत्तरं सापडत नाहीत. हळहळ वाटते. वरवरच्या माहितीवर, गप्पांवर अंदाज बांधत राहतो. ‘रेल की पटरी’ तर सगळ्या प्रेमभंगाचे हत्यार होऊन जाते. सिनेमांतून सतत आपल्या डोळ्यांवर आदळते. गड-किल्ल्यांवर स्युसाइड पॉइंट्सचे बोर्ड लागलेले दिसतात. तिथं जाऊन कोण कसं पडलं याच्या स्टोºया ऐकत राहतो. पुन्हा एक गूढ मनात घेऊन घरी येतो! गॉसिप करतो.पण ते गॉसिप करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, घुसमटीतून कोणी आत्महत्येसारखा निर्णय घेतला, तर समाज म्हणून कुठेतरी आपणच त्याला ‘जगणं छान आहे, टिकशील इथेही राजा, होईल सगळं ठीक राणी’ असा आत्मविश्वास द्यायला कमी पडत असतो, हे लक्षातच घेत नाही.फक्त गेलेल्याच्या पाठी गॉसिप करायला मोकळे. तसं करण्यातून काय कमावतो आपण?त्यापेक्षा मन मोकळं केलं, कुणाला आपल्यापाशी मन मोकळं करता येईल याचा भरवसा दिला, तर जिंदगी जगण्याचं बळ तरी मिळेल.. आपल्याला, सगळ्यांनाच!- प्राची पाठकवाटतं मरून जावं;असं आपल्या मनात येतं तेव्हा..अवतीभोवती घडणाºया आत्महत्यांबद्दल, त्या रोखण्याबद्दल आपण काय करू शकतो ते आपल्याला माहीत नसतं. आणि कधीतर क्वचित आपल्याही मनात येतं की, फार झालं, नको झाला जीव! जावं मरून एकदाचं!भीतीच वाटते की, हे काय आलं आपल्या मनात? या भावनेला स्युसायडल टेंडन्सी म्हणायचं की नाही? अर्थात तेही आपल्याला माहीत नसतं. एकीकडे जगभरातल्या माहितीचा प्रचंड मारा आणि दुसरीकडे जगण्याच्या मूलभूत प्रश्नांबद्दल आपल्याला पटेल, झेपेल, समजेल अशी उत्तरे नसणं या कात्रीत आपण सापडतो.जरा काही झालं की मरून जावंसं वाटतं. लढायची ताकद संपल्यासारखं वाटतं. कोणीतरी निदान आपलं ऐकून घ्यावं असं वाटतं. कळत अथवा नकळत आपण इतरांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करू लागतो. लोक एकदा लक्ष देतील, दोनदा देतील. नेहमीचंच झालं तर दुर्लक्ष करू लागतील. गॉसिप करतील, अशी भीती पण असते.मग कोणी म्हणतात, ‘अरे, जो बोलतो ना तो कधीच जीव देत नाही’.‘साला, पंख्याला लटकला तर पंखा तुटेल, हा कसला मरतोय’, असे जोक्स पसरतात. पुलावरून कोणी आत्महत्या करायला उडी मारली, पण नदीला पाणीच नव्हतं, हात पाय मोडून घरी आला, असे जोक्स व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतात.पण हे इतकं सोपं नाही.आत्महत्यांसंदर्भात तर नाहीच नाही.आत्महत्येच्या बाबतीत बोलेल तो करेल काय हे तितकंसं खरं नसतं. आत्महत्या करणारे अनेकदा कळत नकळत सुचवत असतात, त्यांच्या असहायतेबद्दल. त्या सूचना नीटशा ऐकल्या जातातच असं नाही. मुळात ही निव्वळ धमकी आहे की खरंच असं कुणाला वाटतं आहे, की हा लक्ष वेधून घ्यायचा.

वाटतं मरून जावं;  असं आपल्या मनात येतं तेव्हा..अवतीभोवती घडणा-या आत्महत्यांबद्दल, त्या रोखण्याबद्दल आपण काय करू शकतो ते आपल्याला माहीत नसतं. आणि कधीतर क्वचित आपल्याही मनात येतं की, फार झालं, नको झाला जीव! जावं मरून एकदाचं!भीतीच वाटते की, हे काय आलं आपल्या मनात? या भावनेला स्युसायडल टेंडन्सी म्हणायचं की नाही? अर्थात तेही आपल्याला माहीत नसतं. एकीकडे जगभरातल्या माहितीचा प्रचंड मारा आणि दुसरीकडे जगण्याच्या मूलभूत प्रश्नांबद्दल आपल्याला पटेल, झेपेल, समजेल अशी उत्तरे नसणं या कात्रीत आपण सापडतो.जरा काही झालं की मरून जावंसं वाटतं. लढायची ताकद संपल्यासारखं वाटतं. कोणीतरी निदान आपलं ऐकून घ्यावं असं वाटतं. कळत अथवा नकळत आपण इतरांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करू लागतो. लोक एकदा लक्ष देतील, दोनदा देतील. नेहमीचंच झालं तर दुर्लक्ष करू लागतील. गॉसिप करतील, अशी भीती पण असते.मग कोणी म्हणतात, ‘अरे, जो बोलतो ना तो कधीच जीव देत नाही’.‘साला, पंख्याला लटकला तर पंखा तुटेल, हा कसला मरतोय’, असे जोक्स पसरतात. पुलावरून कोणी आत्महत्या करायला उडी मारली, पण नदीला पाणीच नव्हतं, हात पाय मोडून घरी आला, असे जोक्स व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतात.पण हे इतकं सोपं नाही.आत्महत्यांसंदर्भात तर नाहीच नाही.आत्महत्येच्या बाबतीत बोलेल तो करेल काय हे तितकंसं खरं नसतं. आत्महत्या करणारे अनेकदा कळत नकळत सुचवत असतात, त्यांच्या असहायतेबद्दल. त्या सूचना नीटशा ऐकल्या जातातच असं नाही. मुळात ही निव्वळ धमकी आहे की खरंच असं कुणाला वाटतं आहे, की हा लक्ष वेधून घ्यायचा प्रकार आहे, ते आपल्याला कळत नसतं. आत्महत्या करण्यामागे जेनेटिक कारणंदेखील असतात. फॅमिली हिस्ट्री शोधली तर ती सापडतातदेखील. एकाच कुटुंबातल्या अनेक जणांनी आत्महत्या केलेल्या असल्याचं लक्षात येतं. पण कुणाची अशी हिस्ट्री नसली तरी आत्महत्या होतात आणि ‘कोणाच्या मनाचं काही सांगू शकत नाही बाबा’, अशा नोटवर या सगळ्या गप्पा शांत होतात!मन मोकळं करायचंय? मग बोला!त्यात काय शिकायचं असं वाटतं लोकांना. पण आपण मन मोकळं करायला शिकायला हवं. ते कसं करायचं याचं तंत्र शिकायला हवं. नवीन मोबाइल घेतला की कसा त्याचा वापर चटचट शिकतो आपण? अर्थात, तितक्या वेगात मनातलं बोलायला जमणार नाही. पण मन मोकळं करता येणं ही एक कला आहे आणि ती आपल्याला शिकायची आहे, हे स्वत:ला सांगायला लागून तसा सराव करता येतो.ते कसं?१) मनातली घुसमट बाहेर काढायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनात येणारे विचार, भावना समजून घेणं. ते तसे मोकळेपणी निदान स्वत:समोर तरी ठेवता येणं, गरजेचं वाटल्यास तशी एखादी तरी हक्काची व्यक्ती आयुष्यात असणं जिथं आपल्याला मनमोकळं बोलता येईल. समोरच्याचे ऐकूनदेखील घेता येईल! चुका लक्षात येतील आणि त्या सुधारायला एक प्रेमाचा हात सोबत असेल.२) असं प्रेमाचं कोणी असणं, असं कोणी मिळणं छानच असतं. पण तसं कोणी नसेल, तर ‘माझ्या आयुष्यात प्रेमाची माणसंच नाहीत’, असं रडत बसायची गरज नसते. शेअरिंग वाढवता येतं. अशी माणसंदेखील शोधावी लागतात. त्यांनाही समजून घ्यावं लागतं. मैत्री टिकवावी लागते. हे सगळं करायला वेळ लागतो. समान आवडीनिवडी शोधाव्या लागतात. मतभेदांवर काम करावे लागते. अ‍ॅडजस्ट करावं लागतं. काहीतरी कारणानं भेटीगाठी, फोनवर बोलणं करावं लागतं.३) आपल्या मनातली चिलबिचल किती तीव्र आहे, त्यानुसार आपण हा मार्ग स्वीकारू शकतो. पण त्याही वाटेने जाताना एक चांगला समुपदेशक सोबत असेल तर उत्तम! एक त्रयस्थ आणि सुरक्षित कोपरा आपल्या भावभावनांना हा समुपदेशक पुरवू शकतो. म्हणून काऊन्सिलरकडे जाणं उत्तम.४) घरात शेअरिंग वाढवणं हा सर्वोत्तम पर्याय असतो, हे तरुण मुलामुलींना सातत्यानं सांगावं लागतं. आपली आई टीव्हीसमोर बसलेली असते, घरकामात बिझी असते, आॅफिसला जाते. वेळ नसतो. वडिलांशी तर बोलायलाच प्रॉब्लेम असतो अनेकांना. तेही घरी असले की टीव्हीसमोर बसलेले असतात, असं आपल्याला वाटत असतं. मग मनातलं केव्हा बोलणार? तर आपल्याला बोलावंसं वाटलं की आपण पुढाकार घेऊन बोलावं.५) हवे तसे मित्रमैत्रिणी मिळत नाहीत. असलेले टिकत नाहीत. काहीतरी स्पर्धा, ईर्ष्या सुरू होते. नोकरीच्या ठिकाणी जपून राहा, शेजारी पाजारी जपून राहा, असं आपणच स्वत:ला बजावलेलं असतं. सगळीकडे जपून राहा, तर मग मनातल्या मनात घुसमटा! हे कशाला करायचं?एखादा मित्र/मैत्रीण जीव नको झाला म्हणत असेल तर?आपल्या किंवा आपल्या आसपासच्या कोणाच्या मनात सतत आत्महत्येबद्दल विचार येत असतील, तसे थेट किंवा आडून कोणी सुचवत असेल तर त्या व्यक्तीला मन मोकळे करायला एक तातडीचा कप्पा हवा आहे, हे लक्षात घ्या.त्याला समुपदेशकाकडे न्या. अनेक हेल्पलाइन्सदेखील आजकाल उपलब्ध असतात. त्यांची माहिती नेटवर मिळते. एरवी आपण नेटवरून हवं ते डाउनलोड करतोच ना?त्यांच्याशी बोला.गांभीर्यानं घ्या. बोलल्यानं त्या-त्या वेळची ऊर्मी बरीच कमी होते. अशा संभाव्य गटात आत्महत्या रोखता येतात.तुमच्या मनात ‘तसले’ काही विचार आलेच तर..१. वरचेवर मनात आत्महत्येचे विचार आले, तर त्याविषयी जवळच्या लोकांकडे बोला.२. किती काळ असं वाटतं आहे, ते स्वत:ला विचारून बघा. जवळचा समुपदेशक न लाजता गाठा. घरच्यांना तसं सांगा.३. घरात, मित्र-मैत्रिणींमध्ये मनमोकळेपणे बोलायला लागा.४. आसपास असं कोणी असेल, तर त्याला कशाप्रकारे समजून घेता येईल, काय मदत करता येईल, हे ठरवा.५. एकमेकांसाठी आधार गट बनवता येतो का ते बघा. त्या त्या गटात मनमोकळेपणे कोणी काहीही बोलले तर त्याचा बोभाटा करणार नाही, याची खात्री एकमेकांना द्या.६. मोकळं बोलून मन हलकं होतं याची खात्री असू द्या. नुसते बोलून प्रश्न सुटणार नाहीतदेखील; पण ‘सुटेल यार हा प्रश्न’ असा धीर मात्र नक्की मिळेल. नवे मार्ग दिसू शकतील. उमेद वाढेल.