- प्रज्ञा शिदोरे
ऑगस्ट जवळ आला ना की मला कायम दोन पुस्तकं आठवतात. एक म्हणजे भा. द. खेर यांनी लिहिलेली हिरोशिमा नावाची कादंबरी. या कादंबरीत त्यांनी 1939 पासूनचा कालखंड रंगवलेला आहे. जपानने पर्ल हार्बरवर दिलेली धडक, अणुबॉम्बनिर्मितीचे प्रयोग, जपानवर बॉम्बफेक, त्यामुळे भाजून निघालेले तेथील नागरिकांचे जीवन आणि अखेर हिरोशिमा, नागासाकीवर कोसळलेले अणुबॉम्ब हा चित्तथरारक भाग कादंबरीत वाचायला मिळतो. युद्धानंतरचे जपान आणि राखेतून फिनिक्सप्रमाणे झेप घेतलेला जपानही आपल्याला अनुभवायला मिळतो. या पुस्तकानं तुमचा युद्ध, अणुबॉम्ब, मानवता याबद्दलची मतं खूप पक्की घडतात असं वाटतं. संहाराचं चित्न पक्कं होतं. आणि वैर्यावरही येऊ नये असं वाटतं. जपानचं या मोठय़ा संहारातून बाहेर पडून असा विकास करणं हे ही आश्चर्यकारक वाटत. दुसरं पुस्तक म्हणजे ‘तोत्ताेचान’. एका लहान मुलीची, तिच्या शाळेची गोष्ट आहे ही. आणि बॅकग्राउंडला अर्थातच दुसरं महायुद्ध आणि बॉम्ब. मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी हिनं तिच्या स्वतर्च्याच आयुष्यावर लिहिलेलं पुस्तक.तोत्ताेचान ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, तिची लाडकी तोमोई शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्र म, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास. हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं ‘तोत्ताेचान’ हे पुस्तक. कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतर् चांगलीच असतात. तो चांगुलपणा रूजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्र ीडा, संगीत, निसर्ग, चित्नकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्र म पाठय़पुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्र म, खेळ, गमती आपल्या शिक्षण पद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही एका वेगळ्या पद्धतीच्या शाळेबद्दल वाचायचं असेल तर हे पुस्तक नक्की नक्की वाचा!या पुस्तकामधून या शाळेबरोबरच जपान कळायला मदत होईल. ‘तोत्ताेचान’चा मराठीमध्ये उत्कृष्ट अनुवाद चेतना सरदेशमुख यांनी केला आहे.
हिरोशिमा-नागासाकी आणि दुसरं महायुद्ध याबद्दल यू टय़ूबवर भरपूर डॉक्युमेण्टरीज आहेत. त्या बाउझ करून बघायला विसरू नका!