शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
3
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
4
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
5
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
6
पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?
7
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
8
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
9
तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?
10
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
11
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
12
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
13
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
14
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
15
Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो
16
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
17
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
18
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
19
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
20
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

world internet day- आपण इंटरनेट वापरतोय की वापरले जातोय इंटरनेट कडून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:36 PM

येत्या सोमवारी जागतिक इंटरनेट दिन त्यानिमित्त ही चर्चा, इंटरनेटच्या बेटर वापराची.एव्हरी क्लिक मॅटर्स..

ठळक मुद्देइंटरनेट आपल्या आयुष्यात आलं; पण आपल्याला ते उमगलं किती?

-विनायक पाचलग

इंटरनेट आणि सोशल मीडिया आता भारतात स्थिरावलं आहे असं म्हणायला हरकत नाही.  सोशल मीडिया चांगला का वाईट? त्याचे काय परिणाम/दुष्परिणाम झालेत वगैरे निबंध टाइप प्रश्नाच्या आपण सगळेच पुढं आलो आहोत. वास्तव हेच आहे की, आज आपल्या देशात शौचालयांपेक्षा जास्त मोबाइल कनेक्शन आहेत आणि त्यातल्या बहुतेकांवर इंटरनेट आहे. डाटा पॅक मारणे हा शब्दप्रयोग मराठीत रूळला त्यालाही आता काळ उलटला असं म्हणावं लागेल. त्यामुळे, गल्ली ते दिल्लीत सर्वदूर भारतात आता एक ‘व्हॉट्सअप/फेसबुक जनरेशन’ आहे. पिढय़ांचं अंतर वेगळं आणि हे इंटरनेटवरचे नेटिव्ह म्हणजेच मूळ रहिवासी वेगळे अशी वर्गवारीही अभ्यासकांनी सुरू केली. त्यात तरुण मुलंच जास्त आहेत ही आता नवीन रिअ‍ॅलिटी आहे.मग आता पुढचा मुद्दा येतो.इंटरनेट तर आपल्या आयुष्यात आलं, अन्न-वस्र-निवारा आणि इंटरनेट या चार माणसांच्या जीवनावश्यक गरजा आहेत वगैरे असे जोकही फॉरवर्ड करून झालेत. पण प्रश्न असा की या इंटरनेटचा आपल्या भल्यासाठी जास्तीत जास्त वापर कसा करता येईल. कारण, एकाचवेळी  समाजात व्हॉट्सअ‍ॅपमुळे मॉब लिंचिंग होत आहेत, अफवांचं पीक येत आहे, वाट्टेल ती माहिती डोळे झाकून दामटून पुढं ढकलली जाते. नेटवर आलंय म्हणजे खरंच असेल हा भाबडेपणा आपण संपवायलाच तयार नाही.दुसरीकडे या माध्यमाची विधायक ताकदही मोठी आहे. ट्विटरवर टाकलेल्या एखाद्या पोस्टनं भारताच्या फुटबॉल मॅचला प्रचंड गर्दी झाली हे आपण पाहिलं, वाचलं. अशी एक ना अनेक उदाहरणे सांगता येतील.शेवटी इंटरनेट हे एक टूल आहे म्हटल्यावर त्याच्या चांगल्या-वाईट दोन्ही बाजू असणारच. पण आता आपण मात्न यावर फोकस केला पाहिजे की हे इंटरनेट आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कसं वापरायचं? काय काय गोष्टी आहेत, ज्या आपण केल्या तर इंटरनेटचा त्नास कमी आणि फायदे जास्त होतील? मुळात इंटरनेटनं आपल्याला वापरण्यापेक्षा आपण इंटरनेट जास्तीत जास्त आपल्या प्रगतीसाठी कसं वापरू शकू.त्यासाठीच या काही साध्यासोप्या गोष्टी.त्या करून पहा, इंटरनेट आपल्याही आयुष्यात समृद्धीचे रंग भरू लागेल.

5 मिनिटांचा मंत्रखरं सांगायचं तर या प्रश्नाचं एक अत्यंत सोपं-सहज उत्तर आहे. एक सोपा मंत्न आहे, तो म्हणजे ‘थिंक ट्वाइस’. आजचा सोशल मीडिया हा ‘इम्पलसिव्ह’ आहे. आपल्या मनात ज्याक्षणी जी काही रिअ‍ॅक्शन येते त्यानुसार आपण या माध्यमावर वागत असतो. एखादी पोस्ट भारी वाटली तर फॉरवर्ड करतो, एखादं सुंदर चित्न, फोटो, जोक असं काही दिसलं तर लाइक करतो. लगेच अंगठेबहाद्दर होत अंगठे उंचावतो. एखाद्या गोष्टीचा राग आला तर सॅड इमोजी टाकतो. नाहीतर लाल तांबडा चेहरा पोस्टून मोकळे होतो. पण, जे काही करतो ते एका क्षणात करतो. आता हा हावरा क्षण आपण तेवढा टाऊ शकू का याचा विचार करता यायला हवा. एखाद्या पोस्टला लाइक करायच्या आधी आपण फक्त 5 मिनिटं विचार करायचा की हे मला का आवडलंय, मी लाइक करतोय म्हणजे काय? आता सांगा, आजवर इतका विचार करून लाइक करायचा निर्णय घेतला असं कधी झाल्याचं आठवतंय का तुम्हाला?सगळा काही क्षणांचा खेळ !या एका क्षणामध्ये आपल्याला सर्व बाजूंनी विचार करायला वेळ मिळतोच असं नाही. समोर जी गोष्ट आहे ती नक्की खरीच आहे का? खरी असेल तर आपल्याला दिसते आहे तेवढीच बाजू त्याला आहे का? आणि जे काही आपल्यासमोर आहे ते खरंच फॉरवर्ड करायची गरज आहे का? यातला काहीच विचार त्याक्षणी होत नाही आणि मग त्या क्षणाच्या धुंदीत फेक न्यूज, हेट न्यूज, अश्लील गोष्टी या सगळ्या गोष्टी पसरतात.खरं सांगायचं तर हे सगळं टाळायला आपण 5 मिनिटं वगैरे विचार करत बसायचीही गरज नाही. फक्त तो अवकाश आपण स्वतर्‍ला द्यायला हवा, तशी सवय लावून घ्यायला हवी. 

सावधान! क्लिक करताय.

प्रत्येक क्लिक करायच्या आधी फक्त एक क्षणभर थांबायला पाहिजे. त्या क्षणभरात आलेले विचार निघून गेले आणि पुन्हा एकदा विचार केल्यावर जर का आपल्याला ती कृती (लाइक, शेअर इ) करावी वाटली तर आपल्याला ते खरच करायचं आहे हे नक्की. मग जरूर ती कृती करावी. पण, या छोटय़ाशा उपायामुळे आपण सोशल मीडियावर  ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ न राहता ‘रिस्पॉन्सिव्ह’ बनतो. आपण जी काही गोष्ट करू ती फक्त मग प्रतिक्रि या राहणार नाही. आपण प्रतिक्रिया न देता, प्रतिसाद देऊ शकू. आपण असं सतत रिअ‍ॅक्टिव्ह राहणं काही बरं नव्हे. तेव्हा समोर लिहिलेलं, फोटो, व्हिडीओ जे काही आहे ते आपल्याला पटलंय, तेच खरं अशी आपली खात्रीच असेल तर पुढं ढकलावं, शेअर करावं. नाही तर वाचलं, ठीक आहे म्हणत सोडून द्यावं. या छोटय़ाशा काही सेकंदाच्या उपायांमुळे आपण जवळपास 90 टक्के गोष्टी ज्या आपण उगाचच करत असतो त्या करायच्या थांबवतो. बाकी, त्यातून डेटा पॅकही वाचतो, हा आणखी एक फायदा.

जे दिसतं, तेच खरं नव्हे !

दुसरी कायम लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इंटरनेटवर जेवढं दिसतं तेव्हढेच सत्य नसते. एखाद्या गोष्टीला दुसरी अणि तेवढीच व्हॅलीड बाजू असते, असू शकते जी इंटरनेटवर आपल्याला दिसत नाही कारण सर्व इंटरनेट हे अल्गोरिदम्स वर चालतं. आणि हे अल्गोरिदम असे डिझाइन केलेले असतात की तुम्हाला जे आवडतं तेच सतत दिसत राहील. म्हणजे, तुम्ही ज्या राजकीय विचाराचे आहेत, ज्या सेलिब्रिटीचे फॅन आहेत त्यांच्याबद्दलच सतत तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसत राहतं, तुम्हाला या सोशल मीडियावर यावंसं वाटावं यासाठीची ती मेख आहे. त्यामुळे असं वाटू शकते की आपण जे पाहत आहोत तेच खरं आहे कारण सगळं जग तेच म्हणत आहे; पण रिअ‍ॅलिटी अशी असते की जे आपल्या विचारांचं आहे तेवढंच जग आपल्याला दिसेल अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे आपण जे पाहतो त्याच्यापुढे ही बरंच काही आहे एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी इंटरनेटमुळे आपण एक समाज म्हणून टोकांवर जगणार नाही. इंटरनेटने माणसं तोडण्यापेक्षा जोडली जातील.

.इथं काहीच खासगी नाही

या अल्गोरिदममुळे घडलेली अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपली कोणतीही माहिती खासगी उरलेली नाही. कारण हे सर्व इंटरनेट आणि विशेषतर्‍ सोशल मीडिया या आपल्या वैयक्तिक माहितीच्या जिवावर चालते. तो या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे, खासगीपण उरलं आहे का नाही? वगैरे डिबेट करत बसण्यापेक्षा ‘कॉन्शस डाटा शेअरिंग’चा मार्ग स्वीकारावा म्हणजे आपली माहिती वापरली जाणारच आहे याचे भान ठेवून आपण इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर वावरलो आणि गरजेपुरतीच स्वतर्‍ची माहिती या माध्यमावर शेअर केली तर नंतर होणारा बराच त्नास कमी होईल. जसे ‘सीसीटीव्ही’ आहे असं लक्षात आलं की आपलं वागणं नकळत बदलतं तसं सोशल मीडियाच्या बाबतीतही आपण स्वतर्‍ ला ट्रेन केलं तर आपल्या खासगी आयुष्याची लक्तरं सोशल मीडियात, इंटरनेटवर झळकणार नाहीत.

सोशल मीडिया म्हणजे इंटरनेट नव्हे!

सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त सोशल मीडिया म्हणजे इंटरनेट नव्हे. त्यामुळे रोज निदान थोडावेळ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवगळता आपण इंटरनेटवर घालवला तर जाम मजा येईल. आता झालं आहे असे की आपण गेलोय अलिबाबाच्या गुहेत; पण एक पेटीवगळता बाकी काही उघडतच नाही. हेही सहज टाळता येईल आपल्याला. मग अगदी पिण्टरेस्टपासून ते टेडर्पयत आणि विकिपीडियापासून ते कवोरार्पयत असंख्य अ‍ॅप आणि वेबसाइट तुमच्या दिमतीला उभ्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेळ सार्थकी लागले अशा एक से एक गोष्टी तिथे आहेत. फक्त, नेहमीच्या धबडग्यातून बाहेर पडून तिकडे जायची गरज आहे.थोडक्यात काय तर ‘बेटर इंटरनेट’ बनण्यासाठी इंटरनेटनं काही करायची गरज नाही आहे तर आपण स्वतर्‍ला थोडं बेटर बनवायची गरज आहे. आणि या महाजालावरील प्रत्येक क्लिक पूर्वी थोडा विचार करण्याची कारण ‘एव्हरी क्लिक मॅटर्स.’.