याहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे . 1998 साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता. एके काळी लोकिप्रयतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर.
युझर्सला स्वत:च्या चाट रूम तयार करता येणो तसेच वेगवेगळे इमोशन्स पाठविता येणो यामुळे नेटकरी लोकांमध्ये याहू मेसेंजरने एक वेगळे स्थान निर्माण केले होते .
मात्न जसजसा काळ बदलला तसतसा मेसेंजर मध्ये स्पर्धा निर्माण होत गेली . फेसबुक मेसेंजर ,व्हॉट्सअॅप,आदी मेसेंजरच्या स्पर्धेत याहू मेसेंजर काहीसे मागे पडल्याचे चित्न निर्माण झाले . त्यामुळे याहू मेसेंजर चे अनेक युझर्स इतर मेसेंजरकडे शिफ्ट झाले . याचाच परिणाम म्हणून याहू मेसेंजर ने स्वत:मध्ये अनेक बदल घडवत नवीन याहू मेसेंजर डिसेंबर 2क्15 साली लॉंच केले . हे नवीन याहू मेसेंजर गुगल प्ले तसेच अॅप स्टोअर वर उपलब्ध आहे.
आता मात्न याहूने त्यांचे 18 वर्ष जुने याहू मेसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याजागी नवीन याहू मेसेंजर अधिक फीचर्स सह आणणार आहे. त्यासाठी याहूने युझर्स ला 5 ऑगस्ट 2क्16 पर्यंत नवीन याहू मेसेंजरला अपडेट होण्याचा सल्ला दिला आहे. 5 ऑगस्ट 2क्16 पर्यंत चे मेसेज अर्काइव्ह करता येईल असे समजते . त्यानंतर मात्न जुन्या मेसेजला अक्सेस मिळणार नाही. 5 ऑगस्ट नंतर तुमचे जुने याहू मेसेंजर वापरता येणार नाही
अनिल भापकर