शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

17 वर्षाची ओल्गा आणि 21 वर्षाचा येगॉर: तोंड उघडायला बंदी असलेल्या रशियात 'ते'  बोलतातच कसे ?

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 7:58 AM

पुतीन यांच्या रशियात मनात येईल ते उघड बोलायची लोकांना मुभा नाही. तो नियम तोडायची हिंमत या दोघांनी केली आहे!

ठळक मुद्देत्यांच्यासारखे इतर अनेक लोकशाहीसाठी उभे ठाकलेत, त्यांचं करणार काय, हा प्रश्न सत्तेपुढे आहेच.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम 

येगॉर झुकॉव्ह.  Yegor Zhukov 21 वर्षाच्या रशियन तरुणाचं हे नाव आहे. तुम्ही साधं गुगल करून पाहा. त्याचे जगभर चाहते आहेत. तो काही फार मोठा नेता नाही, एक साधा ब्लॉगर आहे. मात्र त्यानं अपील करायचा अवकाश अनेक रशियन विद्यार्थी आंदोलन करायला तयार होतात. आज त्याचं नेतृत्व स्वीकारल्यासारखे रशियन तरुण शांतपणे फलक हातात घेऊन मेयरच्या घरासमोर अनेक शहरांत जाऊन उभे राहतात. तो रशियामधल्या पुतीन सरकारबद्दल उघड बोलतो. आंदोलनाची हाक देतो. त्याला शिक्षा होते. मग पुन्हा आंदोलनं होतात. तो काही काळ बाहेर येतो.मॉस्कोतही सतत विद्यार्थी आंदोलनात अनेक मुलं-मुली त्याचे फोटो हातात घेऊन उभे असतात. त्या आंदोलकांपैकी एक मुलगी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देताना सांगते, ‘जे इतर लोक बोलायला घाबरतात, माझ्यासारखे अनेकजण तर मनातल्या मनातही बोलत नाही, ते येगॉर झुकॉव्ह बोलतो. सहज बोलतो. आम्ही घाबरतो, तो घाबरत नाही हीच त्याची ताकद आहे!’

तो घाबरत नाही म्हणजे किती घाबरत नाही तर तो ठणकावून सांगतो आहे की, ‘एक दिवस मला रशियाचा अध्यक्ष व्हायचं आहे!’हे स्वप्न वेडगळ नाही. आज त्याला मिळणारा तरुणांचा पाठिंबा पाहता आणि आंदोलनं पाहता त्याला ‘हलक्यात’ घेण्याची चूक राजसत्ता करत नाही. त्याचे पाठीराखेही तरुण विद्यार्थी, केस रंगवलेले, अंगावर टॅटू अशा अवतारात ते आंदोलनं करतात. लोकशाहीची मागणी करत राहातात. लोकशाही हे स्वप्न आहे, जे सत्यात येणं अवघड आहे हे माहिती असून, आंदोलनं करतात. 

त्यातलीच एक ओल्गा. काही दिवसांपासून या रशियन तरुणीचे दोन फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाले होते. त्यातल्या पहिल्या फोटोत ती मुलगी सशस्त्र पोलिसांच्या घोळक्यात जमिनीवर शांतपणे बसलेली दिसते. हातात पुस्तकाची प्रत असून, ती काहीतरी वाचते आहे. दुसर्‍या फोटोत त्या तरुणीला पोलीस हात-पाय पकडून उलटं लटकवून फरफटत घेऊन जात आहेत.ओल्गा मिसिक. . ती फक्त 17 वर्षाची असून, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीत शिक्षण घेते आहे. रशियाच्या लोकशाही समर्थक चळवळीचा चेहरा म्हणून आज तिची ओळख आहे.सप्टेंबर महिन्यात रशियातील मॉस्कोत सिटी असेम्बलीच्या (डय़ूमा) निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना तांत्रिक कारणामुळे अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. या निषेधार्थ 27 जुलैला हजारो लोकशाही समर्थक रस्त्यावर उतरले. पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, असा या आंदोलकांचा आग्रह होता. मात्र सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला आहे. त्याचवेळी आपले संविधानिक अधिकार मिळावेत म्हणून ओल्गा दंगल रोखणार्‍या  सशस्त्र पोलिसांच्या गराडय़ात जमिनीवर फतकल मारून बसली. बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या ओल्गाच्या हातात देशाची राज्यघटना होती, ती शांतपणे ती वाचत बसली. लोकशाही अधिकारांसाठी सत्याग्रह करणारी ही तरुणी बंदुका व रायफलच्या गराडय़ात अतिशय शांतपणे बसून राहिली.ओल्गाच्या निषेधाचे हे फोटो सोशल मीडियावर हजारो वेळा शेअर केले गेलेत. काही जणांनी तिची तुलना बीजिंगमधील तियाननमेन स्क्वेअरच्या टँक मॅनशी केली आहे, जो 1989 मध्ये एका लष्करी रणगाडय़ाच्या समोर उभा होता. भारतातील काही नेटकर्‍यांना तिला पाहून मणिपुरात महिलांनी केलेल्या नग्न आंदोलनाची आठवण झाली. प्रत्येकजण आपल्या स्थानिक परिस्थितीशी ओल्गा मिसिकची हिंमत जोडून पाहत होता. अर्थात ओल्गालाही पोलिसांनी अटक केलीच. तिला तीन महिन्यांत 4 वेळा ताब्यात घेण्यात आलं. मात्र 17 वर्षाची ओल्गा आणि 21 वर्षाचा येगॉर आणि त्यांच्यासारखे इतर अनेक लोकशाहीसाठी उभे ठाकलेत, त्यांचं करणार काय, हा प्रश्न सत्तेपुढे आहेच.