- मयूर पठाडे
कानठळ्या बसवणारे आवाज, रस्त्यावरचा गोंगाट, गडबड-गोंधळ, प्रत्येक ठिकाणाहून हरघडी येणारे कर्णकर्कश आणि कंठाळी आवाज..
त्यासाठी जबाबदार अनेक कारणं असली तरी यात तरुणांचाही वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
हा तर आमच्या जगण्याचाच एक भाग आहे.
त्यामुळे काय एवढं बिघडतं, असं कोणी म्हणेल, पण.
या कंठाळी आवाजांचा आपल्याला सराव झाला असला आणि या आवाजासह जगण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेतली असली तरी यामुळे खूप काही बिघडतं.
आज दिनांक 26 एप्रिल 2017. ‘जागतिक ध्वनि प्रदुषण जागरुकता दिवस’.
त्यानिमित्त आवाजानं नेमकं काय बिघडतं यावर हा प्रकाशझोत.
यासंदर्भाचा जागतिक अभ्यास सांगतो, जगातले तब्बल 360 दशलक्ष लोक कानांच्या विकारांनी त्रस्त आहेत. त्यात ‘आवाज’ हेच प्रमुख कारण आहे. कारण इतर कुठल्याही कारणानं त्यांच्यात बहिरेपणा आलेला नाही, तर रोज कानावर आदळणार्या आवाजांनी त्यांना बहिरेपण आणलं आहे.
जगाचं जाऊ द्या, भारताच्या संदर्भात ही आकडेवारी काय सांगते?..
भारतात तब्बल 63 लाख लोक कमी ऐकू येण्याच्या किंवा संपूर्ण बहिरेपण आल्याच्या समस्येनं त्रस्त आहेत.
हजार माणसांमागे प्रत्येकी किमान चार माणसांना कमी ऐकू येतं किंवा ते बहिरे आहेत. बहिरेपणाची ही समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.
भीती वाटावी अशी आकडेवारी आणखी पुढेच आहे.
जन्माला येणारी नवजात बाळं.
त्यांचा काय दोष?
पण एक अभ्यास सांगतो, भारतात दरर्षी सुमारे एक लाख बाळं कमी किंवा अजिबात ऐकू न येण्याची समस्या घेऊनच जन्माला येतात.
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं, असा प्रo्न विचारणार्यांनी लक्षात घ्यायला हवं, की.
समजा एखाद्या मुलात जन्मत: बहिरेपण असेल, तर ते बोलूच शकत नाही आणि भाषाही त्याला समजत नाही.
वाढीच्या पहिल्याच टप्प्यावर एवढी मोठी समस्या असेल तर त्या मुलाच्या संपूर्ण आयुष्यातच अंधार असणार हे उघड आहे.
वयाच्या साधारण पहिल्या वर्षीच ही समस्या लक्षात आली तर काही उपाय करता येऊ शकतात, पण दुर्दैव म्हणजे आपल्याकडे बर्याचदा मूल तीन-चार वर्षांचं होईपर्यंंत पालकांनाही या समस्येचा पत्ता लागत नाही किंवा त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही.
नंतर सुरु केलेल्या उपचारांनी फरक पडत नाही असं नाही, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
नॅशनल सॅम्पल सव्र्हे तर यापुढे जाऊन सांगतं, भारतीय लोकांत जे काही व्यंग आहे, त्यातल्या तब्बल दुसर्या क्रमांकाचा वाटा बहिरेपणाचा आहे. शहरी भागात कानाचं हे अपंगत्व नऊ टक्के आहे, तर ग्रामीण भागात ते दहा टक्के आहे.
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं? - हा प्रo्न आता तरी कोणी विचारणार नाही.
तरीही या कंठाळी आवाजाविरुद्ध काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे. किमान तेवढं तरी आपण करायला हवं.
काय करता येईल?
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
वाचा इथेच.
उद्या.