शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

तरुण मुलांनाही व्हायचंय गोरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:35 AM

अभिनव मुकुंदला रंगावरून लोकांनी छळलं. हे अलीकडचं. पण काळ्या रंगाचा तरुण आणि गोरी मुलगी अशा जोडप्याचे फोटो टिंगल करत व्हायरल होतात.

-आॅक्सिजन टीम

अभिनव मुकुंदला रंगावरून लोकांनी छळलं.हे अलीकडचं.पण काळ्या रंगाचा तरुण आणि गोरी मुलगीअशा जोडप्याचे फोटो टिंगल करत व्हायरल होतात.मुलींना तर रंगावरून कायम अपमान सोसावे लागतात.पण आता तरुण मुलांनाही गोरं होण्याच्याभुतानं पछाडलंय.ते का?कशासाठी व्हायचंय गोरं त्यांना?

निमित्त अभिनव मुकुंदभारतीय क्रिकेट संघाचा नवाकोरा सलामीवीर. रंगानं काळाच. तर तो उत्तम खेळला याचं लोकांना कौतुक नाही, त्याचे फोटो अनेकांनी व्हायरल केले. त्याच्या रंगावरून त्याची टवाळी करत त्याला सल्ले दिले. गोरं होण्याच्या क्रीम लाव म्हणाले..यावर संतापलेल्या अभिनवने सोशल मीडियात पत्रच लिहून अशा वर्णद्वेषी लोकांना आपली जागा दाखवून दिली. ठणकावून सांगितलं की, काळं असणं काही चूक नाही. आणि गोरं असणं म्हणजेच हॅण्डसम असणं नव्हे. जरा कमी करा हा असा अट्टहास..हे सारं एका क्रिकेट प्लेअरला या काळात सांगावं लागतं? कुठं चाललोय आपण समाज म्हणून? गोºया रंगाचं वेड आपल्या समाजाला नवीन नाही. आजवर मुलींच्या अनेक पिढ्यांनी ‘रंगात मार खाते’ म्हणत अपमान सोसले. आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडवल्या लोकांनी तरी मुकाट अपमान सोसले. आपण काळ्याच आहोत म्हणून सुंदर नाही, लग्नाच्या बाजारात खपत नाही असा बोल लावून घेतला.आणि मग आल्या सात दिवसांत गोरं करून देणाºया क्रीम्स. काळ्यासावळ्या माणसांच्या उदंड बाजारपेठेत त्या मुबलक खपल्या. उलट त्यांनी काळं असण्याचा न्यूनगंड वाढवला. तुम्ही काळ्याच आहात म्हणून चांगली नोकरी, मनासारखं जगण्याचा हक्क, चांगला नवरा तुम्हाला मिळत नाही म्हणत मुलींना गोरं होण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडलं. आणि कोट्यवधी रुपयांची बाजारपेठ उदयास आली. पाच रुपयांच्या पाउचमध्ये मग गोरं होण्याच्या क्रीम्स विकल्या जाऊ लागल्या.आणि हे सारं होताना टिपिकल ‘गोरीच मुलगी पाहिजे’ हा लग्नाच्या बाजारातला मोठा अडथळा कायमच राहिला. तरुण मुलांना मुलगीच काय त्यांची आई गोरी असणंही लग्नाच्या बाजारात महत्त्वाचं वाटत होतं, ते कायमचं राहिलं.इथवर गोष्ट तशी जुनाट वळणाची. टिपिकल. आणि रडूपडूच होती. काहीच बदललं नाही असं वाटणारी. अर्थात काही मुलींनी धुडकावून लावली ही गोरेपणाची मक्तेदारी आणि जगू लागल्या त्या बिंधास्त.मात्र इथंच काळानं भलताच टर्न घेतला. कारण बाजारपेठेनं या वळणावर वेगळीच हवा भरली सौंदर्याच्या फुग्यात.पूर्वी लोक म्हणत मुलाचे गुण पाहावेत, रूप पाहू नये. पण आता तरुण मुलांनाच ही बाजारपेठ सांगू लागली की, तुम्ही गोरे नाही? तुमच्या अंगाला घामाचा वास येतो? तुमच्या केसात कोंडा झालाय? मग तुम्ही आउटडेटेड आहात? तुम्हाला कुणी नोकरी देणार नाही? कुणी छोकरी देणार नाही?तुम्ही गोरे व्हा..आणि तेही कसे? मुलींच्या लालीपावडरवाल्या क्रीम लावू नका. पुरुषांसाठीची मॅनली क्रीम लावा.आणि मग तरुण मुलांनाही वाटू लागलं की, आपण गोरे नाही काळेसावळे आहोत म्हणून मागे पडतोय. आपला आत्मविश्वास कमी आहे. लोक आपल्याला मोजत नाहीत. आपलं लग्न ठरत नाही. आपलं नशीब फळफळत नाही.म्हणून मग तरुण मुलांनी गोरं होण्यासाठीच्या क्रीम्स फासायला सुरुवात केली. बाजारपेठेनं हा न्यूनगंड पोसला, वाढवला. आणि पुन्हा पुन्हा सांगितलं गोरं व्हा, मॅनली व्हा, मग तुमचं नशीब फळफळेल. तुम्ही स्टार व्हा. मोठमोठे स्टार या प्रॉडक्टच्या जाहिराती करू लागले आणि पार खेड्यापाड्यात तरुण मुलांचं गोºया रंगाचं आॅबसेशन वाढलं.‘आॅक्सिजन’ला येणारी पत्रं गेल्या काही काळात हेच सांगतात. अनेक तरुण मुलं लिहितात की, मी काळा आहे, रंग पक्का. मला कॉलेजात मुलं चिडवतात. छत्रीचं कापड म्हणतात. डांबर म्हणतात. निगेटिव्ह म्हणतात. काय काय बोलतात. मला गोरं व्हायचंय!काहीजण तर कुठकुठल्या बड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात, कुणी स्किनच्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेण्ट घेतात.कशासाठी? तर फक्त गोरं होण्यासाठी!आणि यासाºयात त्यांच्या आत्मविश्वासाचा पार चक्काचूर झालेला असतो.हे सारं काय आहे?उष्ण कटिबंधातल्या आपला देशात बहुसंख्य लोक काळे सावळेच आहेत. आणि काळासावळा रंगही सुंदरच असतो. सौंदर्याची व्याख्या रंगावर ठरत नाही, हे आपण कधी मान्य करणार? कधी हा गोरेपणाचा हव्यास झुगारून देणार?-विचारा स्वत:लाच?गोरं होण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे तरुण मित्र असाच आटापिटा करतात का?का करतात?तरुण मुलांच्या डोक्यावर हे गोरं होण्याचं काय भूत बसलंय? मान अपमानाची ही काय गणितं आहेत?अधिक तपशिलात कळवा आम्हाला.ई- मेल oxygen@lokmat.com