- डॉ. प्रियदर्श
‘सर, हमारा अॅक्सिडेंट हो गया है. मुङो चोट लगी है. खून निकल रहा है. बाकी लोग को भी चोट आई है’सकाळी 4 वाजता आलेल्या या फोनने मी हादरलो. थोडा सतर्कझालो. डिटेल्स विचारले. गाडी सध्या कुठे आहे? कुणाला किती लागलं, इत्यादी.लगेच झारखंडच्या कंट्रोल रूममध्ये निलेशजीला फोन करून माहिती दिली. त्यानेही पहाटे चार वाजता फोन उचलला. तिथल्या अधिका:यांना सांगतो म्हणाला.बांद्रा (मुंबई) ते छत्तीसगढ बॉर्डर्पयत श्रमिक मुलींचा एक गट रात्नी 9 च्या सुमारास पोचला. ते सगळे झारखंडमधील सिमडेगा येथील वेगवेगळ्या गावाचे मजूर होते. मुंबईत कामाच्या शोधात आले होते. लॉकडाउननंतर एक महिना कसाबसा काढला. जवळ काही पैसे नव्हते. शेवटी पायीच निघाले. नशिबाने त्यांना महाराष्ट्र शासनाची बस मिळाली. त्यांना घेऊन बस महाराष्ट्र-छत्तीसगढच्या सीमेवरील बाघनदी नाक्यावर आली. एकूण 16 मुली आणि 7-8 प्रौढांचा ग्रुप होता तो. किरण त्याच्यातील पुढारी म्हणा. ती 23 वर्षाची. ते रात्नी 9 वाजता नाक्यावर पोहोचले. शक्यतो रात्नी पोलीस प्रवाशांना पाठवत नाहीत. किंवा मुलं असतील तर काही ट्रक थांबवून त्याच्याने पुढे पाठवतात.येथे तर बहुतांश मुली होत्या. त्यासुद्धा वय 18 ते 23 या वयोगटातील. लगेच तेथील पोलिसांचा आम्हाला कॉल आला. त्यांनी परिस्थिती सांगितली. त्यांच्याशी बोलून माहीत झाले की या मुलीना सिमडेगा, झारखंडला जायचे आहे. छत्तीसगढ-झारखंड सीमेवर 3 नाके आहेत. पहिलं रायगढजवळ, दुसरा जशपूरचा लोडाम आणि तिसरा बलरामपूरचा रामानुगंज. लागलीच झारखंडच्या अधिका:यांना रात्नी फोन लावला. सिमडेगाबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की यांना जशपूरच्या नाक्यार्पयत पोहोचावा आणि पुढची व्यवस्था ते करतील. लागलीच गाडी शोधायला सुरु वात केली पण कुणीच दाद देत नव्हते, एवढय़ा रात्नी कुणीच तयार होईना. शेवटी एक गाडी तयार झाली. त्यांनी प्रवाशांना बसवले. सर्व कागद तयार झाले, परंतु ड्राइव्हर अचानक म्हणाला की, मी फक्त रायपूर्पयत सोडून देईल, पुढे जाणार नाही. आता परत पंचाईत झाली. एव्हाना 11 वाजले होते. परत शोधाशोध सुरू झाली आणि एक गाडी सापडली. किंमत त्याने बरीच जास्त सांगितली. पण आता या वेळेस काही पर्याय पण नव्हता. शेवटी एकदाची गाडी निघाली. पण रात्नी महासमुंद नावाच्या जिल्ह्यात जाऊन एका ट्रकला धडकली. धडक मोठी नव्हती. पण 4-5 लोकांना थोडा मार लागला होता. एव्हाना गाडीचा ड्राइव्हर भीतीपायी पळून गेला. तेथील काही लोकांनी पोलिसांना कळवून जखमी लोकांना जवळच्या दवाखान्यात पाठवले. मी गाडीच्या मालकाला रात्नी फोन केला पण त्याने काही फोन उचलला नाही. शेवटीसकाळर्पयत या सर्व लोकांवर उपचार झाले. तोर्पयत आम्ही गाडी मालकाशी बोलून दुसरी गाडी यांच्याकरिता पाठवली आणि यांना स्पेशल ओरिसा सरकारची परवानगी मागून ओरिसामधून संबलपूर मार्गे अगदी सिमडेगाला पोहोचवून दिले.बाघनदी सीमा महाराष्ट्राला छत्तीसगढ सोबत जोडते. छत्तीसगढ, ओरिसा, बंगाल, बिहार, झारखंड इत्यादी ठिकाणी याच नाक्यावरून जावे लागते. येथून झारखंडची सीमा 600 किमी, ओरिसाची सीमा 300 किमी, बिहार/बंगालची सीमा 1000 किमी आहे. त्यामुळे या राज्यामधील मजूर त्यांचा घरी परतीचा प्रवास करू लागले तेव्हा मजुरांचे जत्थेच्या जत्थे या नाक्यावर धडकू लागले. 5 ते 10 हजार लोक रोज पोहोचू लागले. मुळात छत्तीसगढची स्वत:ची परिवहन व्यवस्था नसल्यामुळे तिथे आलेल्या लोकांना ट्रक, लॉरी, टेम्पो आदी वाहनांमध्ये भरून कोंबून दुस:या ठिकाणी पाठवणो सुरू झाले. रणरणत्या उन्हात लोक पायी, सायकलने निघाली होती. काही लोक महाराष्ट्र, तेलंगणा येथूनच ट्रक, टेम्पो भाडय़ाने घेऊन सरळ आपल्याघरार्पयत निघाले होते. एका ठाण्याच्या 190 लोकांच्या गटाने 3 ट्रकमध्ये 4 हजार रु पये प्रतिव्यक्ती याप्रमाणो 9 लाख रुपये देऊन मुंबई ते बोकारो, झारखंडर्पयत प्रवास सुरू केले होते.असे अनेक लोक होते. अनेक लोकांना मालवाहक ट्रकच्यावरती बसवून झारखंड किंवा ओरिसार्पयत जात होते.मे महिन्याच्या सुरु वातीलाच पायी जाणा:या मजुरांबद्दल माहिती कानावर पडत होती. आम्हाला वाटले की काही शे-दोनशे लोक जवळपास निघाले असतील. पण गडचिरोलीतील डा अभिजित गादेवारचा फोन आला. त्यांने सांगितले की, तेलंगणावरून अनेक लोक पायी किंवा सायकलने छत्तीसगढकडे येत आहेत. अभिजित त्यांच्या काही सहका:यांसोबत आणि सर्चमधील सहका:यांनी या लोकांची जेवणाची व्यवस्था आणि पुढील प्रवासाची सोय करणं सुरूकेलं. आम्ही मग लागलीच ठरवले की गडचिरोली बॉर्डरवर जाऊन शहनिशा करू. मी डॉ. जाना सरांकडे परवानगी मागितली. सरांनी श्रमिकांसाठी आजर्पयत पूर्ण जीवन समर्पित केलंय. या कठीण काळात ते मागे कसे राहतील. त्यांनी लागलीच परवानगी दिली. 8 मे ला शाहिद हॉस्पिटलची अॅम्ब्युलन्स घेऊन मग मी, प्रेरणा राऊत आणि रंजीत म्हस्के (शाहिद कम्युनिटी टीम) आम्ही निघालो. सोबत काही मास्क, सॅनिटायझर आणि 1क् डझन केळी सोबत घेतली. मानपूरच्या तहसील ऑफिसमध्ये पोहोचलोच होतो. तिथे एक बस पोहोचली. लागलीच तिथल्या प्रवाशांना माहिती विचारायला सुरुवात केली. त्यातील काही लोक झारखंड, ओरिसा तर काही रायपूरचे होते व ते सर्व तेलंगणा येथे काम करीत होते. पायी पायी मुले शहरार्पयत पोहोचली. तिथून ही बस 3क् हजार रुपयांमध्ये केली होती. एकूण 5क् ते 6क् प्रवासी दाटीवाटीने बसले होते. प्रेरणा आणि रणजितने केळी त्यांना दिली. त्यांच्यापैकी काही लोकांचे नंबर घेतले. त्यांना राजनांदगावर्पयत पाठविण्यात येणार होते. पुढे रस्त्यात ठिकठिकाणी आम्हाला चालणारे लोक दिसू लागले. एक मोठय़ा ग्रुपसोबत काही लहान मुले होती. आम्ही अॅम्ब्युलन्स थांबविली. त्यांना माहिती विचारली. प्रेरणा आणि रणजितने मागून येणा:या ट्रकला थांबविले. आणि त्यांना पुढे जाण्याची सोय करून दिली. सोबत काही बिस्कीटे आमच्या बॅगमध्ये होते. ते मुलांच्या स्वाधीन केले.
मानपूरला खोका बॉर्डरवर पोहोचून तहसीलदारांची भेट घेतली. ते मागील 5-10 दिवसांपासून इथे थांबून काम बघत होते. येणा:या मजुरांना जेवण आणि ट्रक थांबवून पुढील वाहतुकीसाठी मदत करीत होते. त्यांनी सांगितले की, मागील 5 दिवसांपासून रोज 500-600 मजूर या बॉर्डरवर येत आहेत. पुढे निघत आहेत. त्यांचा नंबर घेतला. त्यांना व तिथल्या पोलिसांसाठी मास्क आणि सॅनिटायझर्स दिले. आणि आम्ही परत आलो. अस्वस्थ होतो. मग आम्ही सर्वानी ठरविले की या मजुरांना जमेल तसं मदत करू. लागलीच युमेत्ता फाउंडेशनच्या बोर्डला माहिती दिली. नुकतीच ही युवकांची संस्था कोरोनाबद्दलच्या अनेक कामात उतरली होती.तिथून मीटिंगमध्ये ठरले की, काही फंड गोळा करू. या प्रवाशांसाठी प्रायव्हेट बस छत्तीसगढ- महाराष्ट्र बॉर्डरपासून सुरू करू. एक पूर्ण दिवस लागला बस शोधायला आणि परवानगी घ्यायला. तेथील तहसीलदारांनी त्यासाठी मदत केली. आणि 9 तारखेपासून आम्ही मानपूरपासून राजनांदगावर्पयत बससेवा सुरू केली. दिवसाला दोन बसेस प्रवाशांची ने-आण करणार होते. राजनांदगाव येथे छत्तीसगढ प्रशासनाने प्रवाशांसाठी निवारा, अन्न आणि पुढील प्रवासासाठी काही बस उपलब्ध केल्या होत्या. काहीच नाही मिळाले तर ट्रक आणि इतर वाहनाने मजुरांना रायपूर किंवा पुढे पाठवण्यात येत होते.असं आमचं काम सुरू झालं.त्यातल्या अनुभवांविषयी पुढच्या अंकात.बाकी, त्यादिवशी पहाटे चार वाजता अपघातात सापडलेली किरण आता सिमडेगाच्या क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये आहे. मजेत आहे. बरं वाटलं.
(प्रियदर्श डॉक्टर असून, तो आणि त्याचे मित्र छत्तीसगढमध्ये मजुरांना गावी पोहचवण्यासह कोरोना जनजागृतीसाठी काम करीत आहेत.)