कलीम अजीम
गेल्या दोन महिन्यांपासून युवक पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहूच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.गेल्या शनिवारी तब्बल 10,000 तरुणांनी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलीस व सैन्याची अतिरक्त कुमक तैनातही केली.तरुणांचा हा निषेध मार्च शक्तिशाली आहे असं टाइम्स ऑफ इस्नयल म्हणतो. गेल्या दहा वर्षातली सर्वात मोठी लोकचळवळ असल्याचं वर्णनही हे वृत्तपत्रं करतं.इस्नयलच्या राजधानीत शनिवारी दोन मोठी जनआंदोलनं झाली. त्यात पहिलं पंतप्रधानाचा राजीनामा मागणारं होतं, तर दुसरं होतं एका अल्पवयीन मुलीवर 20जणांनी केलेल्या सामूहिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ, दोषींना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी.
दिवसभरात विविध ठिकाणी सुमारे 15,000 सरकारविरोधी प्रदर्शनं झाली, असं टाइम्स ऑफ इस्नयलचं वृत्त आहे.राजधानीतील महापालिकेबाहेर झालेल्या एका निषेध आंदोलनात लहान मुलांपासून तरुणी, महिला व वृद्धांचा समावेश होता. तरुण मुलींनी सरकारविरोधी घोषणा देत बलात्कार शिक्षेसंदर्भातला जुना कायदा बदलण्याची मागणी केली. मोरन नावाची तरु णी यनेट न्यूजला सांगते, ‘मी वक्ता किंवा कार्यकर्ता नाही. माङया आयुष्यातला हा पहिला निषेध आहे. मी कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधित्व करत नाही. हा एक वैयक्तिक मेळावा आहे, कारण आम्हाला आता अजून अधिक हल्ले किंवा बलात्कारांच्या घटना सोसायच्या नाहीयेत.’महापालिकेबाहेर झालेल्या निदर्शनात तेल अवीवचे उपमहापौर टिज्पी ब्रँड म्हणतात, ‘यंत्नणोच्या उदासीनतेमुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्हाला भाषा, पाठय़पुस्तकं आणि इतिहासातील पुस्तकं - सर्वकाही बदलण्याची गरज आहे.’प्रामुख्याने, दोषींना शिक्षा द्यावा तसंच नवा कायदा करावा, अशी मागणी आंदोलक करत होते. महिलांवरील हिंसाचार, न्यायव्यवस्थेतील बदल आणि लैंगिक अत्याचार पीडितांना वैद्यकीय साहाय्य यासारख्या कार्यक्र मांसाठी अर्थसंकल्पात वाढ करण्याची मागणी निदर्शक करीत होते.या एका घटनेमुळे संपूर्ण इस्नयल अस्वस्थ झाला आहे. राजकारण, समाजकारण आणि मल्टिनॅशनल कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. लोकांनी सामूहिकरीत्या संप केला असून, ते दोषींना शिक्षा द्या, अशी मागणी करत आहेत.दुसरीकडे त्याचदिवशी काही पोलीस अधिकारी एका ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करणा:या निषेध मोर्चातला हा व्हिडिओ होता. व्हायरल व्हिडिओवरून सध्या इस्नयलचं राजकारण चांगलंच तापलं आहे.दुसरीकडे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहूंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरू आहे. याच मुद्दय़ावरून शनिवारी पंतप्रधान निवासाबाहेर भलंमोठं आंदोलन झालं. या विकली प्रोटेस्ट मार्चमध्ये तब्बल दहा हजार तरुण सामील झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून जेरूसलेम आणि तेल अवीवमध्ये ही आंदोलने सुरू आहेत. हजारो युवक आंदोलनाचं नेतृत्व करत असून, सत्ताबदलांची मशाल त्यांनी हातात घेतली आहे.बालफौर स्ट्रीट म्हणजे पंतप्रधानाच्या निवासस्थानाजवळ निदर्शकांनी ठिय्या मांडला असून, देशभरातून हजारो युवक त्यात सहभागी होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्र म, भाषणं आणि मेळावे भरवून सरकारचा निषेध केला जात आहे. पंतप्रधान भ्रष्ट असून, त्यांनी तात्काळ खुर्ची रिकामी करावी, अशी त्यांची मागणी आहे.शनिवारच्या ‘विकली प्रोटेस्ट मार्च’ला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही तरुणांचे हजारो गट इथे एकत्न आले. विशेष म्हणजे निदर्शनात नेतन्याहू सरकारमधील माजी संरक्षण मंत्नी यालोन हजर होते. ते म्हणाले, ‘‘मी पूर्णपणो तुमच्यासोबत (म्हणजे आंदोलकांच्या) आहे.’’रात्नी उशिरा पोलिसांनी मेळावा बेकायदा ठरवत लाठीहल्ला केला. हायकोर्टाच्या संरक्षण देण्याच्या आदेशाला न जुमानता निदर्शकांना मारहाण झाली. पोलिसाकडून सर्व ताकदीचा वापर करण्याची धमकी दिली. आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. पोलिसांनी शहरातील बेन मैमन स्ट्रीटवर बंदी घातली. दुसरीकडे पॅरिस चौक बंद करून तिथूनही आंदोलकांना पिटाळून लावले.सरकार समर्थक गटांनीदेखील आंदोलकावर हल्ले केले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. पाण्याचा मारा, अश्रुधूर सोडण्यात आले. त्यात अनेकजण जखमी झाले. तर सात जणांना अटक झाली. विरोधी पक्षनेते यश अतीद यांनी सरकारच्या वर्तनावर जाहीर टीका केली. देशभरातून घटनेच्या निषेधार्थ प्रतिक्रि या येत आहेत. 26 वर्षीय दाना अब्राहम म्हणतो, ‘ते आमचा निषेध प्रत्येक प्रकारे मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आम्ही थांबणार नाहीत.’पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र इस्नयलच्या शहरात सोशल मीडियावर व निषेध मेळाव्यात ‘गुन्हेगार मंत्नी’ आणि ‘तुरुंगात जा’ असे बॅनर आता ठायीठायी दिसतात. येत्या काळात इस्नयली तारुण्याचा हा लोकशाही हक्कासाठीचा हा संघर्ष किती तग धरेल, हे कळेलच. मात्र सध्या तरी इस्नयली तरु णाईंचा लोकशाही बचावच्या लढय़ाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आणि विशेष म्हणजे हजारो तरुण रस्त्यावर उतरत नीडर होत व्यवस्थेचा सामना करत आहेत.
यूएई आणि इस्रायल कराराला विरोध
एकीकडे पंतप्रधानांवर गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे आंदोलकांनी यूएई आणि इस्रायल यांच्यात नुकत्याच झालेल्या समझौत्याला विश्वासघात म्हटले आहे. या कराराच्या तिस:या दिवशी जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये मोठे आंदोलन झाले. ‘ज्यू शेख’, ‘भाकरी नाही पण दुबईला उड्डाण’ असे फ्लेक्स घेऊन अनेक तरुण पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. युद्ध नको, आम्हाला शांतता हवी, अशा मागण्या निदर्शक करत होते. या करारातून नेतन्याहू यांना राजकीय प्रोत्साहन मिळू शकेल, अशी भीती आंदोलकांना वाटते.