आपण जगतो, कारण आपण जिवंत असतो.
आणि आपल्याला जगायचंही असतं.
पण जगतो आपण कुणासाठी?
कुणाकुणाचा विचार करतो जगताना?
कितीतरी माणसं आपल्यासाठी महत्त्वाची असतात.
कितीतरी माणसांचा,
पण त्या माणसांच्या यादीत एक नाव असतं का सर्वात पुढे?
ते नाव असतं, आपलं स्वत:चं!
आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं,
सगळ्यात प्रेमाचं नाव आपलं स्वत:चं असलं पाहिजे!
हे मान्य करणं तसं अवघडच असतं.
पण एक हाक स्वत:ला माराच,
आणि त्या हाकेला ओ देत सांगा स्वत:ला की,
इतरांसाठी मी स्वत:ला विसरणार नाही!
मी तडजोडी करीन, मी माघार घेईन,
मी प्रसंगी त्यागही करीन,
पण हे सारं करताना मी स्वत्व विसरणार नाही.
जगायचं सा:यांसोबत,
मायेनं आपलीशी करायची माणसं
तर असं स्वत:आधी इतरांचा विचार करणं चूक नसतंच,
ते करावंच लागतं. पण ते करताना
आपण स्वत:लाच पायंदळी तुडवत नाही ना,
हे जरा बघितलं पाहिजे!
आणि ते करायचं तर
आपल्या चुकांची जबाबदारी आपण घ्यायला हवी!
चुकांचं प्रायश्चित्त घ्यायला हवं.
आणि त्यांच्यापासून शिकायलाही हवं!
पण ते करताना इतरांकडे मदतीची भीक मागत बसू नका,
आधी स्वत:चे मार्ग शोधा. स्वत: उत्तरं शोधा.
मदत मागा ती मार्गदर्शनाची.
कुणीतरी येईल आणि
आपल्याला संकटातून वाचवेल ही अपेक्षा केली,
तशी मदत मागितली की,
पुन्हा एकदा आपण स्वत:ला हरवून बसतो!
त्यामुळे ताठ मानेनं जगा,
इतरांसाठी काहीतरी चांगलं करा,
समाजासाठी मनापासून जे जे शक्य ते ते करा
आणि जे आयुष्य आपल्याला जगावंसं वाटतं,
ते जगायला लागा.
तरच कदाचित आपण आपल्याला भेटू.
आणि स्वत:कडेही प्रेमानं,
आनंदानं पाहू.
मजेत राहू!
जगणं महत्त्वाचं,
तितकंच प्रेमानं, आनंदानं जगणंही महत्त्वाचं!
(तरुण मुलांसाठी नेटवर उपलब्ध असलेल्या अनामिक प्रेरणादायी गोष्टींचा अनुवाद)