शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 6:25 PM

मजूर चालत निघाले, प्रचंड संख्या, आपण कितीजणांना मदत करणार? -असा प्रश्न पडला तेव्हा आठवली एक गोष्ट

ठळक मुद्दे खवळलेला समुद्र आणि स्टारफिश

- गुंजन खोरगडे

छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, प. बंगाल या राज्यातले अनेक मजूर तेलंगणा राज्यात ठिकठिकाणी मिरची तोडण्यासाठी, बांधकाम मजूर म्हणून काम करतात. अचानक काम थांबलं. लॉकडाउन.  घरी परत जायचं तर किमान अकराशे किलोमीटरचा प्रवास. वाहनांची सोय नाही.मग हे मजूर रणरणत्या उन्हातही प्रवास करायला लागले. या माणसांचे प्रश्न आपण काही प्रमाणात सोडवू शकू का ? आणि हे सोडवताना माझी भूमिका काय याचं उत्तर शोधायचं म्हणून सर्च संस्थेमध्ये चर्चा झाली.चालत निघालेल्या मजुरांसाठी रिलीफ वर्क सुरू करण्याचं ठरलं. या उपक्रमात मी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. सर्च समोरून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग 630  वरून तेलंगणा राज्यातील स्थलांतरितांचे लोंढे गडचिरोली मार्गे छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, प. बंगालकडे पायी निघाले होते. या लोकांकरता जेवणाची व त्यांना छत्तीसगढ राज्याच्या सीमेर्पयत पोहचवण्याचं काम आम्ही सुरू केलं. सकाळी 6 ते रात्नी 10 र्पयत आळीपाळीने आम्ही कामावर असायचो.एकदा  आठ-दहा मजूर या मार्गाने पायी चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. उन्हाच्या झळा जाणवत होत्या. पिंजारलेले केस, तहानेने सुकलेले ओठ, चालून चालून पातळ जीर्ण झालेल्या नाम मात्न चपला, रस्त्यात जाताना सामानाचं ओझं नको म्हणून अर्धे सामान वाटेत टाकून फक्त एक गाठोडे घेऊन या मजुरांचा प्रवास सुरू होता. मला भेटले, विचारलं तर कळलं छत्तीसगढमध्ये घर असलेले हे मजूर तेलंगणाहून चालत आले होते. दोन दिवसांपासून त्यांना काही खायला मिळालं नव्हतं. आम्ही जेवणाची सोय केली. सोबत न्यायला फूड पॅकेट्स देऊन छत्तीसगढच्या सीमेर्पयत त्यांना रवाना केलं. त्याचवेळी सोशल मीडियात अमुक तमूक खाल्लं किंवा अमुक मिळालंच नाही असं लिहिलेल्या पोस्टही मी वाचत होते.समाजाचे दोन उभे भाग मला दिसत होते. अस्वस्थ वाटत होतंच.रस्त्यात पोलीस पकडून क्वॉरण्टाइन करतील, घरी जाता येणार नाही या भीतीने आडवळणाच्या वाटेने जंगलातून या मजुरांची पायपीट सुरू होती.  घरी का जायचं विचारल्यावर ते म्हणाले, काम बंद है, एक महिना तक इंतझार किया. फिर मालिकने पैसे नही बोलकर निकाल दिया. कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे.’अकराशे किलोमीटरचा प्रवास. वाटेत अन्न पाण्याची सोय नाही, घरी कधी पोहोचणार? काम परत मिळेल का? पैसे असतील का? कशाची शाश्वती नाही पण त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, बस घर जाना है.  एक दिवस दहा-बारा लोकांचा घोळका पायी चालून येत होता. सकाळचे सात वाजले असतील म्हणून त्यांना चहा वगैरे दिला. कुठून आले, कुठे जात आहे अशी चौकशी केल्यावर कळलं की ही मंडळी झारखंडला जायला निघाली होती. चहा पिऊन मजूर म्हणाले, हम सब मिलके पैसे देते है!- माङया डोळ्यातच  पाणी आलं.  पैसा नसून, इतक्या त्नासात असूनही त्यांच्या मनाची श्रीमंती दिसली. त्यांना सांगितलं की आम्ही पैसे घेत नाही. एकीकडे भणंग झालेल्या या मजुरांच्या मनाची श्रीमंती आणि दुसरीकडे या मजुरांच्या अगतिकतेचा फायदा घेत हजारो रु पये उकळून थोडय़ा अंतरार्पयत सोडून पाहून जाणारे वाहनचालक.. हा उपक्रमात काम करताना सध्याच्या परिस्थतीचा या मजुरांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत असावा याचाही अंदाज आला. कोरोनामुळे अचानक हातातून गेलेलं काम, हातात पैसे नसल्यामुळे येणारा ताण, पुढे काम मिळण्याची अनिश्चितता, कोरोना आजारामुळे वाटणारी भीती, घरी पोहचू शकू की नाही याची शाश्वती नाही, गावी परत गेल्यावर हाती काम असेल का या विचाराने  येणारी अपराधीपणाची भावना, त्यातून ‘‘उपाय’’ म्हणून सुरू झालेलं दारूचं व्यसन, निर्माण होणारे मानसिक आजार. हे सारं भयाण आहे.मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोनाचा धोका वाढत होता मी मुंबईत कॉलेजला (टीआयएसएसमध्ये)  होते. आईचा फोन आला होता. तिचं रडणं सुरू होतं की लवकर घरी ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, एक दोन दिवसात मी घरी आले. मला कुणापासून लपून यावं लागलं नाही, ना मला शेकडो मैलांचा प्रवास पायी  करावा लागला. पण हे मजूर? त्यांच्यासाठी घरी जाणं इतकं सोप्पं आहे का? त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचा हा प्रवास सोयीस्कर का नसावा? प्रश्न फार आहेत.पण सर्चमधल्या कामानं एक सांगितलं की, आपल्याला जे शक्य ते करावं. लॉरेन ऐसेली यांची  एक गोष्ट तेव्हा आठवली. एक मुलगा वादळानंतर समुद्राच्या काठावरील स्टारफिशेस समुद्रात टाकत असतो. एक माणूस ते बघतो आणि त्या मुलाला म्हणतो हा समुद्रकिनारा इतका दूरवर पसरला आहे. समुद्रकाठावर वाहत आलेल्या या लाखो स्टारफिशेस परत समुद्रात टाकणं शक्य नाही. याने काहीही बदल होणार नाही. ते ऐकून छान हसत त्या मुलानं एक दुसरा स्टारफिश उचलला, समुद्रात टाकला.त्या माणसाकडे बघून म्हणाला,  सगळ्यांना सही, या एक माश्याच्या आयुष्यात तर बदल होईल.