शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

झुकरबर्गचं अकाऊण्ट हॅक होतं, तिथं तुमचं आमचं काय ?

By admin | Published: June 10, 2016 11:42 AM

फेसबुक सर्व्हेसर्वा झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झालं तिथं तुमचं आमचं काय ? बातमी वाचलीच असेल तुम्ही. अलिकडेच झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झालं आणि आपलं अकाऊण्ट हॅक झालं हे त्याला जगजाहीर सगळ्यांना सांगावं लागलं.

फेसबुक सर्व्हेसर्वा झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झालं तिथं तुमचं आमचं काय ?
बातमी वाचलीच असेल तुम्ही.
अलिकडेच झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झालं आणि आपलं अकाऊण्ट हॅक झालं हे त्याला जगजाहीर सगळ्यांना सांगावं लागलं.
सोशलमीडीया मधला एवढा  मोठा बाप माणूस. त्यानं आणि त्याच्या टीमनं जगभराला सोशल मीडीया म्हणजे काय हे शिकवलं. त्याच्यावर ही वेळ यावी? 
विशेष म्हणजे सोशल मीडीयातली प्रायव्हसी, सिक्युरिटी सेटिंग्ज याविषयी झुकरबर्गसोबत निष्णात टीम काम करते. जगभरातल्या नेटीझन्सना ते सिक्युरिटीचे धडे देतात.
आणि हे सारं असूनही हॅकर्स इतके पोहचलेले की त्यांनी डायरेक्ट झुकेरबर्गचंच अकाऊण्ट हॅक करत आपली ताकद दाखवून दिली. 
हे जर झुकेरबर्गच्या बाबतीत होऊ शकतं तर आपण ऑनलाइन किती सुरक्षित आहोत याचा विचार करायला हवा. आणि हॅकर्स इतके शक्तीशाली आहेत म्हणून शक्य तितके प्रय} करुन आपलं अकाऊण्ट सुरक्षित करायला हवं.
म्हणून आपापल्या सोशल अकाऊण्ट्स संदर्भात म्हणजेच फेसबुक, ट्विटर, लिंकडीन, संदर्भात ही काळजी घ्या.
 
1) तुमच्या  सोशल मीडीया अकाऊण्टवर आलेला अनोळखी माणसाचा मेसेज शक्यतो ओपन करू नका. जर मेसेज ओळखीच्या व्यक्तीनं पाठवला असेल आणि संशयास्पद वाटत असेल तर क्लिक करण्यापूर्वी ज्यानं तो पाठवला आहे त्याच्याशी संपर्क करून कन्फर्म करा. आणि फार महत्वाचं नसेल तर अशा लिंक्सवर क्लिक करू नका.  
2. एखाद्याला ट्विटर वर फॉलो करताना किंवा फेसबुक वर मैत्नीचा स्वीकार करताना ते अकाऊण्ट फेक तर नाही ना याची खात्री करा.
3. फ्री ऑफर असणारी लिंक कुठंही त्यावर शक्यतो त्यावर क्लिक करू नका .
4. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पासवर्ड नियमीत बदलत रहा. पूर्वी कधी दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नका.
5. तुमचं नाव किंवा तुमच्या नातवाईकांचं नाव पासवर्ड मध्ये वापरू नका. असे पासवर्ड लवकर हॅक होतात.
 6. पासवर्ड जेवढा अवघड ठेवता येईल तेवढं चांगलं.
7. तुमच्या  अकाऊण्टवरुन काही विचित्र माहिती पुढे जात असेल, काही अलि क्लिप्स, व्हीडीओ, फोटो कुणाकुणाला जात असतील तर तुमचं अकाऊण्ट हॅक झालेलं आहे असं समजा. आणि तातडीनं तुमचा पासवर्ड बदला.  
8.  प्रत्येक सोशल साईटचा पासवर्ड वेगवेगळा ठेवा.  ट्विटर चा पासवर्ड वेगळा, फेसबुक चा वेगळा आणि आपल्या इमेलचाही वेगळा. एकच एक पासवर्ड सर्वत्र वापरणं धोकादायक आहे.
 
-अनिल भापकर