शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी पोउनि नागनाथ तुकडे, मुंजाभाऊ पायघन, नारायण ठमके , माधवराव नानेकर ,उद्धवराव हारकळ, कचरूलाल बारहाते ,केशव शिंदे, गोविंद घांडगे , सत्यशील धबडगे , विलास बारहाते, किशन बरहाते ,राजेभाऊ होगे , महारुद्र काळे, प्रशांत काळे , हनुमान भोंबे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामप्रसाद काळे, माऊली चांगभले, अमीर अन्सारी, मोहन महिपाल, कैलास दळवे , सुनील कापसे, बालाजी कापसे आकाश काळे यांची उपस्थिती होती. रक्त संकलित करण्यासाठी रक्तपेढीचे निळकंठ देशमुख, हनुमान वाणी, राजेंद्र नाटकर , सिद्धार्थ सोनकांबळे यांनी प्रयत्न केले.
१०२ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:23 AM