लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालकमंत्री पांदण, शेत रस्ता योजनेंतर्गत जिल्ह्यात ११३ शेत रस्त्यांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही कामे प्रगतीपथावर असल्याने आगामी पावसाळ्यात शेतमाल वाहून नेण्याची शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे़ग्रामीण भागातील शेत रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते़ अनेक भागात शेत रस्ता खराब असल्याने मोठी वाहने अथवा बैलगाडी देखील शेतापर्यंत नेणे जिकरीचे झाले होते़ अशा शेतकऱ्यांची शेत रस्त्यांची कामे व्हावीत, या उद्देशाने राज्य शासनाने पालकमंत्री पांदण/शेत रस्ता योजनेची अंमलबजावणी सुरू केली़ फेब्रुवारी २०१८ पासून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात सुरुवातीच्या काळात योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला़ मात्र या वर्षी या योजनेची बºयापैकी जनजागृती झाल्याने रस्त्यांच्या कामासाठी प्रस्ताव दाखल झाले असून, जिल्हा प्रशासनाने ११३ रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे़ या पैकी अनेक कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत़पालकमंत्री पांदण, शेत रस्त्याच्या योजनेला पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे़ या तालुक्यातील वझूर येथील पाच कामे पूर्ण झाली असून, ४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ आहेरवाडी येथील ९ पैकी ८ कामे पूर्ण झाली असून, ६ लाख ४० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ कात्नेश्वर येथील ८ पैकी दोन कामे पूर्ण झाली असून, १ लाख ६० हजार रुपये, बरबडी येथील एक काम पूर्ण झाले असून, ८० हजार रुपये, पिंपळगाव येथील दोन कामे पूर्ण झाली असून, १ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ उर्वरित ठिकाणी शेत रस्त्यांच्या कामाला अंतीम मान्यता देण्यात आली असून, ही कामे सुरू करण्यात आली आहेत़नरेगा अंतर्गतही शेत रस्त्यांची कामे४पालकमंत्री पांदण, शेत रस्ते योजनेंतर्गत भाग अ मध्ये शेत रस्त्याचे माती काम केले जाते़ परंतु, ज्या रस्त्यांचे मजबुतीकरण करावयाचे आहे, अशी कामे भाग ब मध्ये समाविष्ट करून नरेगा अंतर्गत ही कामे केली जात आहेत़४ त्यात आलेगाव येथील १, पालम तालुक्यातील उमरथडी, धनेवाडी, गुळखंड, खपाट पिंप्री, गवळी पिंप्री, परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी, मिरखेल आदी गावांमधील शेत रस्त्यांची कामे नरेगा अंतर्गत केली जात आहेत़४शेत रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाल्याने पावसाळ्यापूर्वी शेत रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत़१ कोटी ३५ लाख परतपालकमंत्री पाणंद व शेत रस्ते योजनेसाठी मागील आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्याला दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ मात्र या योजनेची पुरेशी प्रसिद्धी झाली नसल्याने योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला़केवळ १४ लाख ६० हजार रुपयांचाच निधी या योजनेवर खर्च झाला़ उर्वरित १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांचा निधी शासनाला परत करण्यात आला असून, यावर्षीच्या निधीची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे़अशी आहे योजना४पालकमंत्री पाणंद व शेत रस्ते योजनेंतर्गत ज्या शेतकºयांना शेतापर्यंत रस्ता खुला करून हवा आहे, अशा शेतकºयांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेणे, गाव नकाशावर शेत रस्ता नमूद करणे तसेच शेजारील शेतकºयांचे संमतीपत्र असलेला प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल करावा, उपविभागीय अधिकाºयांच्या उपस्थितीत छाननी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना समितीच्या माध्यमातून प्रस्तावास अंतीम मंजुरी दिली जाते.२०३ प्रस्ताव प्राप्त४मार्च २०१९ पासून ते आतापर्यंत या योजनेंतर्गत तब्बल २०३ शेत रस्त्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत़ विशेष म्हणजे, त्यामध्ये एकट्या गंगाखेड तालुक्यातील १७२ प्रस्तावांचा समावेश आहे़ तर पालम तालुक्यातील १८ आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव आहेत़४छाननी समितीच्या बैठकीत हे प्रस्ताव ठेवले जाणार असून, त्यास लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ शेत रस्त्यांची कामे वाढणार आहेत.
परभणी जिल्ह्यात ११३ शेत रस्त्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:03 AM