सेलू (जि.परभणी) : वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची इच्छा पण १२ वी विज्ञान शाखेतील अभ्यासाच्या ताणामुळे सेलू शहरातील गायत्री नगरातील युवतीने मंगळवारी रात्री पत्राच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बुधवारी सकाळी सातला ही घटना घडली असून पूनम धर्मा पवार (१७) असे मृत युवतीचे नाव आहे. घटनेमुळे गायत्रीनगर भागात शोककळा पसरली आहे.
धर्मा कठाळु पवार यांनी सेलू ठाण्यात खबर दिली की, मुलगी पुनम हिचे वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्याचे स्वप्न होते. पण तिला १२ विज्ञान शाखेचा अभ्यास झेपत नसल्याने नेहमी तणावात राहत असे. मंगळवारी नेहमीप्रमाणे ती कुटुंबातील सदस्यांमध्ये झोपली पण रात्री केंव्हातरी उठुन तिने घराच्या बाजुस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये जाऊन लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास गळफास घेतला. हा प्रकार बुधवारी सकाळी कळाला. घटनास्थळी पो.नी. प्रभाकर कवाळे, पोउपनी अशोक जटाळ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सेलू ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान सेलू उपजिल्हा रुग्णालया शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. जमादार मधुकर हे तपास करीत आहेत.
मन हेलावणारी चौथी घटनासेलूमध्ये अशा घटनेची पुनरावृत्ती होत आहे. यापुर्वी बारावीत नापास होण्याच्या भितीने एक युवतीने गळफास घेऊन जिवन संपवीले होते. पण ही युवती जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झाली होती. तर दुसऱ्या घटनेत सीईटी परिक्षेत कमी गुण पडल्याने अभियंता होण्याचा स्वप्नभंग झाल्याने रेल्वे खाली उडी घेऊन युवतीने आत्महत्या केली. अन् अशीच मन हेलावणारी तिसरी घटना ७ जानेवारीला शहरात घडली होती. त्यानंतर मंगळवारी गायत्री नगरातील घटनेची पुनरावृत्ती ही शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी संकेत म्हणावे लागेल.