परभणी : महापालिकेमार्फत नळधारकांचे सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांसाठी अधिकृतरित्या नळ जोडणी घेण्यासाठी अभय योजना लागू केली आहे. मंगळवारपर्यंत शहरात १६२ नागरिकांनी जोडणी अधिकृत करून घेतली आहे. अजून सहा दिवसांच्या मुदतीत नळ जोडणी घेता येणार असल्याची माहिती आयूक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.
मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. अनधिकृत नळ जोडणी धारकांना अधिकृतपणे नळ जोडणी करण्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत अभय योजना लागु केली आहे. अभय योजनेमध्ये अनधिकृत नळ जोडणी धारकांना नळ जोडणीस सदर योजनेचे शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत. जोडणीसाठीचे शुल्क भरणाकरून नळ जोडणी अधिकृत करून घेता येत असल्याने नागरिकांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. शेवटचे सहा दिवस शिल्लक असल्याने योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्तांनी केले.
असे आहेत प्रभागनिहाय जोडणीप्रभाग समिती अ ५२प्रभाग समिती ब ४१प्रभाग समिती क ६९एकूण जोडणी १६२
अन्यथा पाच हजार दंडमहापालिका हद्दीत अनधिकृत नळ धारकांनी सहा ऑगस्टपूर्वी आपली जोडणी अधिकृत करून योजनेचा लाभ घ्यावा. अन्यथा ७ ऑगस्टरपासून महापालिकेमार्फत अनधिकृत नळ जोडणी धारकांकडून पाच हजार रुपये दंड वसुल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.