लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५०२ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ३ हजार ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते़ यापैकी १७८५ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़ १३ मार्च रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दुपारी १२ वाजता आॅनलाईन स्वयंचलित सोडत होणार आहे़राज्य शासनाच्या वतीने दुर्बल व वंचित घटकातील बालकांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्या अंतर्गत १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली होती़ ११ मार्च रोजी अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत होती़ जिल्ह्यातील १५२ शाळांनी २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली होती़ जिल्ह्यात १५२ शाळांमध्ये १ हजार ५०२ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या़ यातील पहिलीसाठी १ हजार ४६३ तर पूर्व प्राथमिकच्या ३९ जागांचा समावेश आहे़ ११ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत गंगाखेड तालुक्यातील २६१ अर्ज दाखल झाले होते़ त्यापैकी ६१ अर्ज अपात्र ठरले आहेत़ तर २०० अर्ज पात्र ठरले आहेत़ जिंतूर तालुक्यातील १४६ अर्जांपैकी १०३ अर्ज पात्र ठरले असून, ४३ अर्ज अपात्र ठरले आहेत़ मानवत तालुक्यातून २८ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ७ अर्ज अपात्र ठरले आहेत़ पालम तालुक्यामध्ये ९१ अर्जापैकी ५ अर्ज अपात्र ठरले आहेत़ परभणी शहरातून ४८९ अर्जांपैकी १२६ अर्ज अपात्र ठरले आहेत़ परभणी ग्रामीणमधून ७६८ अर्जांपैकी २०५ अर्ज अपात्र ठरले आहेत़ पाथरी तालुक्यातून ४४ अर्जांपैकी १२ अर्ज तर पूर्णा तालुक्यातून ८१ अर्जांपैकी २८ अर्ज अपात्र ठरले आहेत़ सेलू तालुक्यातील २४१ अर्जांपैकी ६५ अर्ज अपात्र ठरले आहेत तर सोनपेठ तालुक्यातील २०७ अर्जांपैकी १९ अर्ज अपात्र ठरले असून, १८८ अर्ज पात्र ठरले आहेत़जनजागृतीमुळे वाढले अर्जयावर्षी सुरुवातीला जनजागृती नसल्याने २५ टक्के प्रवेशासाठी म्हणावे तेवढे अर्ज दाखल झाले नव्हते़ परंतु, महापालिका व शिक्षण विभागाच्या वतीने जनजागृती संदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांना नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ तसेच बॅनरही लावण्यात आले होते़ त्यामुळे यावर्षी जागेच्या तुलनेत अर्जांची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे़
परभणीत १५०२ जागांसाठी १७८५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:59 PM