शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

२ बायपास, ५ नवीन रस्ते; नितीन गडकरींचा परभणीसाठी १२८५ कोटींचा भरघोस निधी

By मारोती जुंबडे | Published: February 25, 2023 5:18 PM

नविन पाच रस्त्यांना दिली मंजूरी; दोन बाह्य वळण रस्तेही मिळणार

परभणी: जिल्ह्यात १४५ किलोमीटरची सुरु असलेली रस्त्यांची सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करुन परभणीकरांना नवीन चारठाणा ते जिंतूर,गंगाखेड ते लोहा,इंजेगाव ते सोनपेठ, इसाद ते किनगाव या चार प्रमुख महामर्गाच्या कामासह गंगाखेड रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पुलाकरिता भरघोस निधीचा शब्द देत गडकरींनी परभणीकरांच्या पुढ्यात १२८५ कोटी रुपये टाकले आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे. 

परभणी जिल्ह्यातील पारवा-असोला बाह्यवळण रस्ता, जिंतूर-शिरड शहापूर आणि पाथरी ते सेलू या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरण आणि सुधारणेच्या भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील,डॉ. रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर-साकोरे,सुरेश वरपुडकर, विप्लव बाजोरिया,माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फड, सुरेश देशमुख, जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुरु डॉ. इंद्र मणी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रशांत हेगडे, संतोष शेलार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

गडकरी यांनी या कार्यक्रमात ९७२ कोटी रुपयांची १४५ किलोमीटरची ४ कामे जी राष्ट्रीय महामार्ग विभाग करत असून ती प्रगतीपथावर आहेत. त्यात काही अडचणी होत्या, परंतू त्या आता सोडविण्यात आल्या आहेत. कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा आणि परळी ते गंगाखेड ही १ हजार कोटीची १४५.२९ किलोमीटरची ही सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार आहेत. जिंतूर ते परभणी या ३६० कोटी रुपयांच्या महामार्गाचे ९० टक्के काम झाले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जी महत्वाची नवीन महामार्गाची कामे करावयाची आहेत. त्यात चारठाणा ते जिंतूर या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २५० कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली. गंगाखेड ते लोहा ४५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या कामास, इंजेगाव ते सोनपेठ हा चार पदरी २५.५ किलोमीटरच्या काँक्रीट रस्त्यासाठी २६० कोटी, इसाद ते किनगाव दुपदरी २७.७ किलोमीटर रस्त्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या कामाची मंजुरी दिली.तसेच परभणी - गंगाखेड रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पुलाकरिता १५० कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे नितीन गडकरींनी परभणीकरांच्या पुढ्यात नवीन रस्त्यासाठी १२८५ कोटी रुपये टाकले आहेत. त्यामळे गडकरींचा शनिवारचा दौरा परभणीकरांसाठी फलदायी ठरला.

परभणीसह गंगाखेडला मिळणार बाह्यवळण रस्तापरभणी शहराला लागून जाणारा पारवा –असोला या बाह्यवळण रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले असून, दुसऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांनी पुढील सहा महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लक्ष दिल्यास वर्षभरात त्याचेही काम सुरू करण्यात येईल,तसेच गंगाखेड बायपासची मागणी करण्यात आली असून, त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करुन हे काम करण्यात येईल. तसेच परभणी शहरात जाणारा मुख्य रस्त्याचे देखील विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी केली.

लोकप्रतिनीधींचे टोचले कानजिल्ह्यातील रस्ता बांधकामासाठी गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ही कामे वेळेत का होत नाहीत, याचा गांभिर्याने विचार करण्याचे सांगत, जिल्ह्यात कमी किमतीत रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवले पाहीजे. त्यांनी चांगले रस्ते बांधावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला पाहीजे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात १२ रस्ते बांधणी प्रकल्प पूर्ण झाले असून, ऊर्वरित ११ रस्त्यांचे कामही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी दिला.

या कामाचे झाले भुमीपुजन- पारवा -असोला परभणी बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (२२२) च्या १५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येत असून, त्यासाठी ४९६.६४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.- जिंतूर - शिरड शहापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ - १ च्या ४८ किलोमीटरची सुधारणा करण्यात येणार असून, या प्रकल्पाची किंमत ४१४.८१ कोटी रुपये आहे.- पाथरी -सेलू रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब च्या १२.५ किलोमीटरच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येणार असून त्यासाठी १४५.७६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीparabhaniपरभणी