कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. बाजारपेठेसह इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची पूर्वीप्रमाणेच गर्दी होत आहे. या काळात कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. दरम्यान, रुग्णसंख्या कमी असल्याने दिलासा मिळाला असला तरी ७ जुलै रोजी मात्र बाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात वाढली आहे. आरोग्य विभागाला २ हजार ८१९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार ६८६ अहवालांमध्ये १७ आणि रॅपिड टेस्टच्या १३३ अहवालामध्ये तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह नोंद झाले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५१ हजार १३ झाली असून, ४९ हजार ५४९ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने १ हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८० रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात ३४ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
कोरोनाचे २० रुग्ण ; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:13 AM