जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णालयात दाखल झालेला रुग्णावर कॅज्युअल्टी वाॅर्डात उपचार केले जातात. या वॉर्डात महिनाभरात ३३ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आयसीयू किंवा ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.
महिनाभरातील या मृत्यूंमध्ये सारी, कोरोना व इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
आयसीयू बेड वाढविले...
परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त आयटीआय, जिल्हा परिषद इमारतीतील रुग्णालय आदी ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविले आहेत.
कॅज्युअल्टीमधील मृत्यूला जबाबदार कोण
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वाॅर्डात रुग्णावर तातडीने उपचार केले जातात. या कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला आयसीयू वाॅर्डात भरती करून उपचार केले जातात.
मात्र कॅज्युअल्टी वाॅर्डातच महिनाभरात ३३ जणांचे मृत्यू झाले आहेत. या रुग्णांना आयसीयू वाॅर्डात बेड मिळाला नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर कॅज्युअल्टी वाॅर्डातच उपचार केले जातात. आयसीयूमध्ये बेड मिळणे मुश्कील झाले आहे.