जिल्ह्यात २०२० या वर्षात दरोड्याचे ५२ गुन्हे नोंद झाले आहेत. याशिवाय विश्वासघात केल्या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, मालमत्तेच्या कारणावरून ९२४ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. खंडणीचे जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६८२ चोऱ्यांची नोंद झाली असून, त्यात १७९ घरफोड्या, २५६ वाहनांची चोरी आणि इतर ४२६ चोरीच्या घटनांचा समावेश असल्याची माहिती नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालात देण्यात आली आहे.
वर्षभरात जिल्ह्यात ४४३९ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद
जिल्ह्यात २०२० या वर्षात एकूण ४ हजार ४३९ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये दंगली प्रकरणी ९६ गुन्हे घडले आहेत.
त्यामध्ये वर्षभरात ३५ जणांचा खून झाला असून, मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे १२१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ११९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे १२५ गुन्हे दाखल झाले आहेत. शस्त्राने हल्ला केल्याचे १ हजार ९७ गुन्हे नोंद आहेत.