लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़; परंतु, अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे़ २ जुलैपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३४़१० टक्के पेरणी झाली आहे़गतवर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजित केलेल्या जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पुर्णपणे पेरणी झाली होती; परंतु, जून व जुलै या दोन महिन्यात झालेल्या कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांची पिके चांगलीच बहरली़ त्यानंतर मात्र पूर्ण पावसाळा कोरडा गेला़ त्यामुळे शेतकºयांची बरहलेली पिके जागेवरच करपून गेली़ रबी हंगामात तर शेतकºयांनी पेरणीच केली नाही़ त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळी यादीमध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश झाला़ त्यानंतर उर्वरित तीन तालुक्यांत सर्वसाधारण दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले़ दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांचा आर्थिक संकटाशी सामना सुरूच असताना यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला़ उसणवारी व बँकांच्या दारात उभे राहून शेतकºयांनी खरीप हंगाम २०१९-२० मधील पेरणीसाठी बाजारपेठेतून बी-बियाणे खरेदी केले आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ आतापर्यत जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी १०० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु, जून महिना पूर्णत: कोरडा गेला आहे़ जुलै महिन्याचे सात दिवस उलटले आहेत़ तरीही अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे जिल्ह्यात २ जुलैपर्यंत केवळ १ लाख ७७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३४़१० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़यामध्ये ९७ हजार ५३५ हेक्टरवर कापूस तर ५८ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे़ अजूनही ६५ टक्के शेतकरी पेरणीपासून वंचित आहेत़ येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर दुष्काळी स्थिती यावर्षीही निर्माण होते की काय? असा प्रश्न शेतकºयांना पडू लागला आहे़शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षापावसाळा सुरू होवून जून महिना पूर्ण उलटला आहे़ जुलै महिना सुरू होवून सात दिवस पूर्ण झाले आहेत; परंतु, दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ येत्या चार दिवसांत जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस व्हावा, यासाठी शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ काही ठिकाणी तर पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही़
परभणी जिल्ह्यात महिनाभरानंतर खरीप हंगामातील ३५ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:07 PM