लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली़ छाननी अंती १६ अर्ज बाद ठरविले असून, ८१ उमेदवारांचे १०९ अर्ज वैध ठरले आहेत़जिंतूर विधानसभा मतदार संघात १७ उमेदवारांचे २३, परभणी मतदार संघात २७ उमेदवारांचे ३४, गंगाखेड मतदारसंघात २३ उमेदवारांचे ३५ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवारांचे १७ अर्ज वैध ठरले आहेत़ जिंतूर विधानसभा मतदार संघामध्ये चार, पाथरीमध्ये ३, गंगाखेडमध्ये ७ आणि परभणी विधानसभा मतदार संघात २ असे १८ अर्ज छाननी अंती अवैध ठरविण्यात आले़ त्यामुळे वैध ठरलेल्या अर्जदारांमधून किती उमेदवार अर्ज माघारी घेतात? यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये १५ उमेदवारांचे १९ अर्ज प्राप्त झाले होते़ छाननी अंती या पैकी मेघा मोहनराव फड यांचे दोन्ही अर्ज बाद ठरविण्यात आले़ त्यामुळे आता १४ उमेदवारांचे १७ अर्ज या मतदार संघात आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी व्ही़एल़ कोळी यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली़ यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ अशिषकुमार बिरादार, सहाय्यक निवडणूक अधिकारी उत्तम कागणे, डी़डी़ फुफाटे आदींचे सहकार्य लाभले़परभणीत ३ अर्ज ठरले बादपरभणी विधानसभा मतदार संघामध्ये ३७ नामनिर्देशनपत्र निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते़ छाननी अंती ३ नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले़ डॉ़ संप्रिया राहुल पाटील यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने बदली उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते़ मात्र या पक्षाचे प्रथम उमेदवार राहुल पाटील यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले़ तसेच संप्रिया पाटील यांच्या नामनिर्देशन पत्रात एकच सूचक असल्याने दोन्ही नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले़सुरेश कुंडलिकराव नागरे यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले हाते़ एका अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने त्यांचा हा अर्ज अवैध ठरविण्यात आला़ तर अपक्ष म्हणून आलेला अर्ज वैध ठरविण्यात आला़परभणी मतदार संघातील ३ अर्ज अपात्र ठरल्याने आता छाननी अंती २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे यांच्या छाननी समितीने हा निर्णय घेतला़ त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विद्याचर कडावकर यांचे सहकार्य लाभले़गंगाखेड, जिंतूरमध्ये ११ अर्ज अवैधजिंतूर आणि गंगाखेड या दोन मतदार संघातील ११ अर्ज छाननी समितीने अवैध ठरविले़ गंगाखेडमध्ये चंद्रशेखर साळवे तसेच अपक्ष नागनाथ चाटे, अंबादास कदम यांचा अर्ज अवैध ठरला़ तसेच अपक्ष संजय कदम यांचे ३ पैकी २ आणि तुकाराम वाव्हळे यांचे २ पैकी १ आणि गजानन गिरी यांचा २ पैकी १ अर्ज अवैध ठरला आहे़ जिंतूर मतदार संघात रामभाऊ कचरू भिसे, भागूबाई गंगाधर काळे यांच्यासह इतर दोघांचे दोन पैकी प्रत्येकी १ अर्ज अवैध ठरविण्यात आले़ एबी फॉर्म नसणे, शपथ पत्र न घेणे आणि केवळ एक सूचक असल्याच्या कारणाने अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली़
परभणी जिल्ह्यातील ८१ उमेदवारांचे १०९ अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:36 AM