पाथरी (परभणी) - लाडनांदर येथे सुरू असलेल्या यात्रेतील अवैध धंदे बंद करण्याच्या कारणावरून पोलिसांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना 3 मार्चला रात्री 10 वाजेच्या सुमारास झाली. अवैध धंदे चालक आणि पोलिसांत वाद निर्माण होऊन पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. तसेच इतर पाच कर्मचारी ही जखमी झाले आहेत.
सेलू तालुक्यातील लाड नांदरा हे गाव पाथरी पोलीस ठाण्या अंतर्गत येते. या गावात पाच दिवसाची यात्रा भरते यात्रेत अवैध धंदे ही जोमाने चालतात. कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर यावर्षी यात्रा जोरात भरली गेली यात्रेत मोठी गर्दी जमा झाली होती. यात्रा काळात बंदोबस्त साठी पाथरी पोलीस ठेवण्यात आले होते , यात्रेत अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी तयार कारवाई सुरु केली होती ,3 मार्च रोजी रात्रौ 9.40 ते 10 च्या सुमारास यावरून वाद निर्माण झाला आणि एकच गोंधळ उडाला , अवैध धंदे चालकांनी पोलिसांवर दाहफेड करून पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद जाफर, पोलिस नाईक सुरेश वाघ, हवलदार मुजमुले, होमगार्ड बिकड ,पोलीस कर्मचारी सुरेश कदम कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रसंगी पोलीस कर्मचारी सुरेश वाघ हे आपल्या मोबाईल मध्ये घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना अवैध धंदे चालकांनी त्यांचे मोबाईल घेतले. दरम्यान या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.