८४० नागरिकांची दिवसभरात तपासणी
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना शोधण्यासाठी आरटीपीसीआर तपासण्या केल्या जात आहेत. रविवारी दिवसभरात ८४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात १९४, गंगाखेड तालुक्यात १३८, पूर्णा तालुक्यात १४, सोनपेठ १३३, पाथरी ८२, सेलू ८७, मानवत ८४ आणि जिंतूर तालुक्यात १४ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
एक लाख ९७ हजार नागरिकांची आतापर्यंत तपासणी
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार १४९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आरटीपीसीआरच्या साहाय्याने १ लाख २२ हजार २१४ आणि रॅपिड टेस्टच्या साहाय्याने ७४ हजार ८३५ नागरिकांची तपासणी झाली. त्यात १ लाख ७५ हजार ९७२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, तर २० हजार ४४२ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ५९५ अहवाल अनिर्णायक असून, १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.