कोरोना रुग्णांसाठी दीड हजार खाटा उपलब्ध
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही. शासकीय आणि खाजगी रुग्णायलांमध्ये मिळून १ हजार ५४५ खाटा रुग्णांसाठी रिक्त आहेत. आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार ९०६ खाटांचे नियोजन केले आहे. जिल्हा रुग्णालयात २६, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १२४, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ४५, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, सेलूतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १००, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, गंगाखेड येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात ६०, जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ८० आणि इतर तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयात खाटा रिक्त आहेत.
१ लाख ३१ हजार नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील १ लाख ३१ हजार नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ८० हजार ३३ नागरिकांची तपासणी आरटीपीसीआरच्या साह्याने झाली आहे. त्याचप्रमाणे रॅपिड ॲन्टीजन टेस्टच्या साह्याने ६० हजार ९१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. एकूण प्राप्त झालेल्या अहवालात ५९२ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक आहेत. त्याचप्रमाणे १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रायोगशाळेेने नाकारले आहेत.