३१ नागरिकांची शहरात तपासणी
परभणी : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी शहरात ३ आरोग्य केंद्रांवर ३१ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
सिटी क्लब येथे १६, जायकवाडी येथील मनपा रुग्णालयात २, खानापूर येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात १३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
पॉझिटिव्ह आढळल्यास पाच दिवस शाळा बंद
परभणी : ज्या शाळेतील शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तेथील शाळा पाच दिवस बंद ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
जिल्ह्यात २ डिसेंबरपासून दहावी आणि बारावी वर्ग सुरू केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. यात ज्या शिक्षकांचे अहलवाल पॉझिटिव्ह आहेत, तेथील शाळा पाच दिवस बंद ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत, त्यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करावी, अशा सूचना मुगळीकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत. २ डिसेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील. त्यानंतर नववी आणि अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळेत उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.