जिल्ह्यात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण कोरोनापूर्वी अधिक होते. हे प्रमाण कोरोनाच्या काळात कमी झाले आहे. मागील दीड वर्षात मुले आणि मुली मिळून बेपत्ता झाल्याचे एकूण ११० गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ६८ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये काही अल्पवयीन मुली किरकोळ कारणावरून पळून गेल्याचे समजते.
प्रेम प्रकरणातून घटना अधिक
ग्रामीण भागात असो की शहरी भागात अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणाचे अनेक प्रकार समोर येतात. त्यातून काही मुले-मुली घरी न सांगता पळून जाण्याचे पाऊल उचलतात. याची पुसटशी कल्पनाही आई-वडिलांना नसते. यानंतर घरातील सदस्य मुले किंवा मुलगी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करतात.
मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक
अल्पवयीन मुले आणि मुली यांच्यात बेपत्ता होणे तसेच पळून जाण्याच्या प्रकारात सर्वाधिक गुन्हे हे मुलींचे दाखल होतात. यामध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. पोलीस दलातील आकडेवारीवरुन हे दिसून येते. पोलिसांच्या विविध शाखांकडून यात दिरंगाई न करता मुला-मुलींचा शोध घेतला जातो.
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
२०२० - ५०
२०२१ मे पर्यंत २७
अन्य गुन्हेही मोठ्या प्रमाणात
जिल्ह्यात मागील दीड वर्षात कोरोना काळात खून, बलात्कार, आत्महत्या, खुनाचा प्रयत्न, भृणहत्या, मारहाण, अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सायबर क्राईम यासह चोरी, दरोडे असे अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. याबाबत अधिकृत आकडेवारी मिळू शकली नसली तरी या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.