जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, भोगाव, खोलगाडगा, चारठाणा, दुधगाव, बोर्डी, मुडा, मानकेश्वर या ८ ग्रामपंचायतींमध्ये १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधी, २५१५, दलित वस्ती सुधार योजना, तीर्थक्षेत्र विकास योजना आमदार, खासदार विकास निधी, पाणी पुरवठा योजना आणि नरेगाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या कामांची तत्काळ चौकशी करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात यावी, दोषींवर ८ दिवसांत कारवाई करावी, अशीही मागणी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात उपाध्यक्ष चौधरी यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद सीईओ टाकसाळे यांनी बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारित येत असलेल्या कामांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या गावांची ८ दिवसांत खरोखरच चौकशी होते का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
८ ग्रामपंचायतींच्या कामांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:28 AM