लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रारंभीच्या अल्प पावसावर पेरणी केलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.२०१८-१९ या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर हे तीन्ही महिने कोरडेठाक गेले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली होती. त्या शेतकºयांचे पीक जागेवरच करपून गेले.उसणवारी व बँकांच्या दारामध्ये उभे राहून मिळालेल्या पैशांतून शेतकºयांनी बी-बियाणे व कीटकनाशकांची खरेदी केली होती; परंतु, कोणतेच पीक हाती न लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीच्या दुष्काळाला मागे सारुन शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातून पेरणी केलेल्या पिकातून भरपूर उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने तयारी केली.मृग व आर्द्रा हे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांच्या चिंतेत आणखीच भर पडली; परंतु, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या सर्वदूर पावसावर शेतकºयांनी पेरणीस प्रारंभ केला. १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण केली आहे. म्हणजेच एकूण पेरणीच्या ८७.३६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र पावसाने पुन्हा एकदा या हंगामात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांची पिके जागेवरच ऊन धरत आहेत.येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला तरच शेतकºयांची पिके तरणार आहेत; अन्यथा शेतकºयांना याही वर्षी खरीप हंगामातील उत्पादनावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.१ लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबिनचा पेरा४जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर भूईमुग, सूर्यफुल व कापूस ही पिके घेतली जातात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अहवालानुसार १६ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २३ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे.४उडदाची ६ हजार ४१७ हेक्टरवर तर तुरीची ४० हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर तर सर्वाधिक १ लाख ९२ हजार ६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर १ लाख ८६ हजार २१९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली आहे.सोयाबीन : कापसावर किडीचा प्रादुर्भाव४जिल्ह्यात अल्प पावसावर प्रारंभी पेरणी केलेली पिके बºयापैकी आली आहेत. पावसाचे उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकावर पैसा व करडे भुंगे या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडी कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.४पैसा ही कीड कपाशीचे सर्वाधिक नुकसान करते. त्यामुळे शेतात व बांधावरील पैसा कीड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. शेत तृण विरहित ठेवावे. तसेच बांधावरील तृणाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले आहे.४ तसेच करडे भुंगे ही कीड साधारणत: कमी महत्त्वाची असून ती नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु, कधीकधी या किडीचा उपद्रव अधिक प्रमाणात दिसून येतो. ही कीड पानांना गोलाकार छिद्र पाडून कोवळी रोपे खाऊन टाकते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल २५ मि.लिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी, असे आवाहन वनामकृविचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.पी.आर. झंवर व सहायक प्रा. डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे....तर दुबार पेरणीचे संकट४पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही एकही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीत ओलावा टिकून नाही.४जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या बहुतांश ठिकाणी पिकांनी ऊन धरले आहे. हीच परिस्थिती आणखी आठ दिवस राहिली.४ दमदार पाऊस झाला नाही तर शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. त्यातच पेरणीचा कालावधी संपलेला असल्याने दुबार पेरणी होते की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे.
परभणी जिल्ह्यात खरिपाच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:39 AM