परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज जवळपास १ हजार रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी २ हजार ६३२ कोरोना संशयित व्यक्तींचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यामध्ये ९२८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जिल्ह्यात १७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जिल्हा रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७, जिल्हा परिषद रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांचा खासगी दवाखान्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३६३ कोरेानाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील २७ हजार २९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८८९ जणांचा मृत्यू झाला असून, ८ हजार १८४ जण विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआयमध्ये १५२, जि.प. हॉस्पिटलमध्ये २५१, अक्षदा मंगल कार्यालयात १६८, रेणुका मंगल कार्यालयात १४८ आणि होम आयसोलेशनमध्ये ६ हजार ६७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
९२८ नवे रुग्ण ; १७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:16 AM