जिल्ह्यात दीड हजार खाटा रिक्त
परभणी : कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने १ हजार ८९६ खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यापैकी १ हजार ५८८ खाटा सध्या रिक्त आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या दोन्ही संस्थांमधून उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयातील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.
जिल्ह्यात १ लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार १२२ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७५ हजार १४० नागरिकांच्या तपासण्या आरटीपीसीआरच्या साह्याने, तर ६० हजार ८१ नागरिकांच्या तपास रॅपिड टेस्टच्या साह्याने करण्यात आल्या आहेत. एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी १ लाख २५ हजार ६६४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ५९२ नागरिकांचे अहवाल अनिर्णयाक असून, १४० जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.