शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:33 PM

२०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६  टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६  टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसताना आपले कर्तव्य चोख बजावणार्‍या या दोन्ही ठाण्यांनी जिल्ह्यात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात १९ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची नोंद घेऊन या गुन्ह्यांचा तपास करणे, आरोपी निश्चित करणे आणि या आरोपींना जेरबंद करून प्रकरण न्यायालयांकडे निकालासाठी सोपविण्याचे काम तपासी अधिकार्‍याचे असते. अनेक वेळा गुन्हे दाखल होतात. मात्र त्यातील आरोपी हाती लागत नाहीत. वर्षानुवर्षांपासून ही प्रकरणे खितपत पडतात आणि प्रकरणाचा संपूर्ण तपास न लागल्याने फिर्यादी अथवा पिडीत न्यायापासून वंचित राहतो. 

२०१७ या वर्षात जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली २ हजार ७९१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार २८८ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून पोलीस प्रशासनाने त्यांची कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या तपासाचा आढावा घेतला तेव्हा दैठणा आणि ताडकळस  या दोन पोलीस ठाण्यांची कामगिरी नजरेत भरते. दैठणा पोलीस ठाण्यात मागील एक वर्षात १०९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १०५ गुन्हे पोलिसांनी उघड केले असून या प्रकरणांचा तपासही पूर्र्ण झाला आहे. तर पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस  ठाण्यात ८३ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ८० गुन्हे उघड करण्यात आले आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघड करण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे. त्या खालोखाल पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षभरात ९० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ८६ गुन्ह्यांची उकल (९५ टक्के) तपासी अधिकार्‍यांनी केली आहे. बामणी पोलीस ठाण्याने देखील दाखल गुन्हे उघड करण्याची लक्षणीय कामगिरी केली आहे. या पोलीस ठाण्यात वर्षभरात ५९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५६ गुन्हे उघड करून प्रकरणे हातावेगळी केली आहेत. गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी करणारे हे सर्वच्या सर्व पोलीस ठाणे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या ठाण्यांमध्ये काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील इतर अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आदर्श ठरणारी आहे. 

नवामोंढा पोलीस ठाण्याची सुमार कामगिरीवर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यात नवामोंढा पोलीस  ठाण्याला अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षात नवामोंढा पोलीस  ठाण्यामध्ये २६० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १५६ गुन्हे उघडकीस आले आहेत. नवामोंढा पोलीस ठाण्याने केवळ ६० टक्के गुन्हे उघड केले असून जिल्ह्यातील इतर ठाण्यांच्या तुलनेत मोंढा पोलीस ठाण्याची कामगिरी सुमार ठरली आहे.

कमी मनुष्यबळात अधिक कामजिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये नेहमीच मनुष्यबळाचा अभाव असतो. अनेक पोलीस ठाण्यांना तर पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीही उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीतही ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तपास कामी चोख भूमिका बजवली. सर्वाधिक यशस्वी तपास करणार्‍या दैठणा आणि ताडकळस पोलीस ठाण्यांचा कारभार तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे आहे. ४विशेष म्हणजे पुरेशी वाहने, इंटरनेट, मोबाईलची रेंज व इतर तांत्रिक बाबी उपलब्ध नसतानाही या ठाण्यांनी आपली चुनूक दाखवून दिल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून त्यांचे कौतूक होत आहे. शहरी भागातील पोलिस ठाण्यांना मात्र त्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करावे लागणार आहे.

ग्रामीण भागातच तपासाला गतीजिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास उघड करण्याच्या कामात शहरी विभागातील पोलीस ठाणे मागे पडले आहेत. तर ग्रामीण विभागातील पोलीस ठाण्यांनी मात्र सरस कामगिरी करीत शहरी भागावर मात केल्याचे दाखवून दिले आहे. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याने ७९ टक्के, कोतवाली ठाण्याने ८३ टक्के, परभणी ग्रामीण ८६ टक्के, सेलू ७९ टक्के, मानवत ८० टक्के, पाथरी ८३ टक्के, जिंतूर ७८ टक्के, पूर्णा ७९ टक्के आणि गंगाखेड पोलीस ठाण्याने एका वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ८३ टक्के गुन्हे उघड केले आहेत. 

गुन्हे उघड करण्याची टक्केवारी

शहरी पोलीस ठाणेनानलपेठ -         ७९ टक्केनवामोंढा-        ६० टक्केकोतवाली-        ८३ टक्के

परभणी ग्रामीण-     ८६ टक्केसेलू-         ७९ टक्केमानवत         ८० टक्केपाथरी-         ८३ टक्केजिंतूर-         ७८ टक्केगंगाखेड         ८३ टक्केसोनपेठ         ८९ टक्केपूर्णा-         ७९ टक्केपालम-         ८४ टक्के

ग्रामीण पोलीस ठाणेदैठणा -         ९६ताडकळस-     ९६बोरी-         ८७बामणी-         ९५चारठाणा-     ८३पिंपळदरी-     ९५

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी