मानवत (परभणी): राष्ट्रीय महामार्ग 61 वर निष्काळजीपणाने उभ्या केलेल्या ट्रकवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( दि.14) रात्री 9:30 वाजता घडली. सुधाकर कनके असे मृत पोलिसाचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी आहे, मालवाहू ट्रक ( एपी 16 टीजे 6626) वजन झाल्यानंतर चालकाने जिनींगच्या बाहेर हायवेवर उभा केला. दरम्यान, यावेळी परभणीहून मानवतकडे हायवेवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचारी सुधाकर कनके यांची दुचाकी ( एमएच 22 ए क्यू 2381) उभ्या ट्रकवर धडकली. यात सुधाकर कनके यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सपोनि आनंद बनसोडे, गोविंद वड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. आज सकाळी पोलीस नाईक नारायण सोळंके यांनी पंचनामा केला.