देवगावफाटा (परभणी) : गुगळी धामणगाव येथील माणिक डख हे दुचाकीने सेलू येथून गावाकडे जातांना कुंडी पाटीनजीक अचानक त्यांच्या धवत्या दुचाकीला हरीण येऊन धडकले. या अपघातात हरीण व दुचाकीस्वार दोघेही ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ११ वा. वा.घडली.
गुगळी धामणगाव येथील माणिक भगवान डख ( वय ५२) हे शेती व्यावसाय करतात.ते मुलांच्या शिक्षणासाठी सेलू येथे राहतात. ते दररोज शेतीसाठी ते दुचाकीने गुगळी धामणगाव येथे दुचाकीने ये जा करत असत . ते मंगळवारी दुचाकी क्रं.एम.एच. २२ ए.के.१३९१ ने सेलू येथून गुगळी धामणगाव कडे दुपारी ११ वा.दरम्यान जातांना कुंडी पाटी नजीक एक हरीण त्यांच्या धावत्या दुचाकीवर येऊन आदळले.
या अपघातात हरिण जागीच ठार झाले. तर माणिक डख हे घटनास्थळी पडून होते. नागरिकांनी माणिक डख यांना सेलू येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून डख यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-भाऊ, पत्नी-दोन मुले असा परिवार आहे. ही घटना धामणगाव येथे समजताच गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोउपनी अशोक जटाळ, सपोउपनी ग्यानदेव बेंबडे घटनास्थळी दाखल झाले.