शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

'लिव्ह-इन'मधील प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिला, चिडलेल्या तरुणाने तिच्या आईला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 3:24 PM

तरुण चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने लिव्ह-इन- रिलेशनशिप मध्ये राहणारी प्रेयसी आईकडे घरी आली होती

- सुभाष सुरवसेसोनपेठ: लिव्ह-इन- रिलेशनशीपमध्ये राहणारी प्रेयसी घरून परत येत नसल्याने चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 10 वाजता तालुक्यातील करम येथे घडली. तरुणाच्या हल्ल्यात प्रेयसीच्या आईचा मृत्यू झाला तर तिचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.

सोनपेठ तालुक्यातील करम येथे विमलबाई उजगरे या त्यांचा प्रियकर पंडित लोंढे यांच्या सोबत लिव्ह-इन- रिलेशनशीप राहत. विमल उजगरे यांची मुलगी मंगल गायकवाड ही मागील 8 वर्षांपासून प्रियकर बाळू मुंडे याच्यासोबत लिव्ह-इन- रिलेशनशीपमध्ये परळी येथे राहत असे. मात्र, मुंडे चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने मंगल आईसोबत राहण्यास करम येथे आली होती.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी बाळू मुंडेने करम येथे येऊन मंगलला सोबत येण्यास बळजबरी केली. मात्र, मंगलने येण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या मुंडेने विमलबाई यांना तुम्ही मुलीस माझ्यासोबत पाठवत नाहीत म्हणत हुज्जत घातली. तर सोमवारी ( दि. 15) सकाळी मंगलला फोन करून तुझ्या आईच्या जीवावर तू राहतेस, तिला संपवून टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता मुंडेने विमलबाई व त्यांचा प्रियकर पंडित लोंढे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. 

हल्ल्याची माहिती मिळताच विमलबाई यांची सून मायाने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी विमलबाई आणि पंडित लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. विमलबाई यांचा जागीच मृत्यू झाला होता तर लोंढे यांची प्रकृती गंभीर आहे. सून माया उजगरे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात बाळू मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड हे करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी