नैसर्गिकरीत्या होणाऱ्या गर्भपाताला वैद्यकीय भाषेत ‘मिसकॅरेज’ असे म्हणतात. २२ व्या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी जर गर्भ गर्भाशयाच्या बाहेर पडला तर तो गर्भपात समजला जातो. जनुकीय यंत्रणेतील बिघाड, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, संप्रेरकांचे असंतुलन, जंतूसंसर्ग, गर्भाशयातील विकृती, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, खूप शारीरिक कष्ट, मानसिक ताण, मद्यपान, तंबाखूचे सेवन आदींमुळे ‘नैसर्गिक गर्भपात’ होऊ शकतो. परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अंतर्गत २०१९ मध्ये १४ २०२० मध्ये ४६ तर २०२१ मध्ये १५ जुलै अखेरपर्यंत ३७ गर्भपात झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे कोरोना काळात गर्भपाताची संख्या वाढल्याचे जिल्हा स्त्री रुग्णालय मध्ये असलेल्या नोंदीवरून दिसून येत आहे. त्यामुळे गरोदर मातांनी कोरोना काळात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
कोरोना काळात गर्भपात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:14 AM