गौर येथील किशनराव विठ्ठलराव पारवे यांच्या मुलाचा सेलू येथे रविवारी रात्री विवाह सोहळा झाला. लग्न समारंभ झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास वऱ्हाडी मंडळी वेगवेगळ्या वाहनाने गौरकडे परत येत होती. यातील इनोव्हा गाडीत (क्र. एम. एच. ३६/ ए के ९७००) सात जण पूर्णेकडे येत होते. कात्नेश्वर ते लक्ष्मीनगर या गावादरम्यान पहाटे ३ वाजेच्या सुमारास इनोव्हा गाडी, ट्रॅक्टरचा (क्र एम. एच.२२/ एएन १०५७) आणि ट्रकचा (एम.एच./एडब्लू ८१६१) विचित्र अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीचा चकनाचूर झाला. अपघातात नवरदेवाचे वडील किशनराव विठ्ठलराव पारवे यांचा मृत्यू झाला, तर कारचालक कालिदास केशव पारवे (वय २३) , कोंडीराम विठ्ठलराव पारवे (वय ६७), सुरेश धोंडीराम पारवे (वय ३८), धोंडीराम नानाराव पारवे (वय ५५), वैजनाथ रामराव पारवे (वय ४५), प्रभाकर नारायण पारवे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पूर्णा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.
वऱ्हाडाच्या जीपला अपघात; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:20 AM